मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) :
वैभव ज्वेलर्स हा दक्षिण भारतातील अग्रगण्य प्रादेशिक ज्वेलरी ब्रँड आहे, आंध्र प्रदेशातील ८ आणि तेलंगणातील २ शहरांमध्ये १३ शोरूम्स आणि एकूण आंध्र प्रदेश आणि तेलंगणा ज्वेलरी मार्केटमध्ये ~ ४% मार्केट शेअरसह उपस्थिती आहे. आर्थिक वर्ष २०२३ मध्ये या दोन राज्यांमधील संघटित बाजारपेठेतील ~१०% ने त्यांच्या प्रारंभिक सार्वजनिक ऑफरसाठी प्रति इक्विटी शेअर ₹२०४ ते ₹२१५ दरपट्टा निश्चित केला आहे.
कंपनीची प्रारंभिक सार्वजनिक ऑफर (आयपीओ) शुक्रवार, २२ सप्टेंबर २०२३ रोजी सबस्क्रिप्शनसाठी उघडेल आणि मंगळवार, २६ सप्टेंबर २०२३ रोजी बंद होईल. गुंतवणूकदार किमान ६९ इक्विटी शेअर्ससाठी आणि त्यानंतर ६९ इक्विटी शेअर्सच्या पटीत बोली लावू शकतात .
प्रति इक्विटी शेअर ₹१० च्या दर्शनी मूल्याच्या सार्वजनिक इश्यूमध्ये २१० कोटी रुपयांपर्यंतचे इक्विटी शेअर्सचे नवीन जारी करणे आणि २.८ दशलक्ष इक्विटी शेअर्सची ऑफर फॉर सेल (ओएफएस) यांचा समावेश आहे.
सदर ज्वेलरी ब्रँड आंध्र प्रदेशच्या संघटित ज्वेलरी किरकोळ बाजारपेठेतील जुन्या व्यापार्यांपैकी एक आहे आणि आंध्र प्रदेश तसेच तेलंगणाच्या बाजारपेठेतील उच्च-वाढीच्या क्षेत्रांमध्ये प्रादेशिक विस्तारावर लक्ष केंद्रित करत आहे ज्यामुळे ब्रँडेड दागिन्यांसाठी बाजारपेठ तयार केली आहे. २००७ मध्ये, त्यांनी विशाखापट्टणममध्ये २९,९४६ चौरस फूट आणि चार स्वतंत्र मजल्यांवर खरेदीचा सर्वोत्कृष्ट अनुभव घेण्यासाठी फ्लॅगशिप शोरूमची सुरुवात केली.
त्यांच्या किरकोळ शोरूमपैकी ७७% टियर २ आणि टियर ३ शहरात आहेत आणि उर्वरित हैदराबाद आणि विशाखापट्टणम शहरात आहेत. त्यांच्या प्रत्येक शोरूममध्ये सोने, डायमंड, जेम्स, प्लॅटिनम आणि सिल्व्हर ज्वेलरी किंवा आर्टिकल्समधील उत्पादनांच्या विस्तृत श्रेणीतील डिझाइन्सची वैविध्यपूर्ण आणि मोठी यादी आहे. त्यांचा उप-ब्रँड “विशेषा” सोने आणि हिऱ्यांच्या दागिन्यांच्या प्रीमियम सेगमेंटची पूर्तता करतो.
३० जून २०२३ रोजी संपलेल्या तीन महिन्यांसाठी, ऑपरेशन्समधून महसूल ५०८.९० कोटी रुपये होता आणि निव्वळ नफा १९.२४ कोटी रुपये होता. आथिर्क वर्ष २०२३ मध्ये मुख्यतः सोन्याच्या दागिन्यांच्या विक्रीतून त्यांचे उत्पन्न २०२७.३४ कोटी रुपये होते, २००५ मध्ये ते ५०.९ कोटी रुपये होते. ज्वेलरी ब्रँड्सची प्रति रिटेल शोरूम सरासरी कमाई आणि आर्थिक २०२३ साठी इबीआयटीडीए मेट्रिक्स अनुक्रमे ₹१५५.९५ कोटी आणि ₹११ कोटी होते. आर्थिक वर्ष २०२१ ते २०२३ दरम्यान महसूल आणि पॅटमध्ये १८.९२% आणि ८५.८१% ची सीएजीआर वाढ झाली. त्यांची ई-कॉमर्स विक्री आर्थिक वर्ष २०१९ मधील ४.१६ कोटी रुपयांवरून आर्थिक वर्ष २०२२ मध्ये ३६.४० कोटी रुपयांपर्यंत वाढली.
बजाज कॅपिटल लिमिटेड आणि एलारा कॅपिटल (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेड हे बुक-रनिंग लीड मॅनेजर आहेत आणि बिगशेअर सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड ऑफरचे रजिस्ट्रार आहेत. इक्विटी शेअर बीएसइ आणि एनएसइ वर सूचिबद्ध करण्याचा प्रस्ताव आहे.