*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य तथा संस्थापक अध्यक्ष महाकवी कालिदास प्रतिष्ठान पुणे लेखक कवी वि. ग. सातपुते लिखित अप्रतिम कथा*
*भुतांखेतांच्या कथा*
*(भाग 25 वा)*
मित्रहो ,
माझ्या व्यवसायाच्या निमित्ताने माझी महाराष्ट्रात सतत भ्रमंती होती. माझा ड्रायव्हर नेहमी बरोबर असे. पण एक दिवस मी काही अर्जन्सी मुळे एकटाच बसने मुंबईस गेलो . तिथली कामे उरकली म्हणून दादरहून माझ्या नेहमीच्या सवयी नुसार मी शक्यतो बाहेर हॉटेलचे खात नसल्यामुळे दामोदर स्वीट मधून मिठाईचे बॉक्स घेवून सरळ मुंबई सेन्ट्रलला आलो. मला रात्री 9 ची मुंबई मेंगलोर एशीयाड मिळाली. माझ्या आधीच माझ्या सीटवरील शेजारील पॅसेंजर येवून बसला होता. सहाजिकच बसल्यावर बोलणे सुरू झाले ” मी म्हणालो आप कहासे हो ? ते म्हणाले मी मराठी बोलू शकतो. *मी मूळचा धारवाडचा असून माझे नाव भानुप्रताप मंदर्गी आहे*
पण सध्या बेळगावला असतो. माझा आर्किटेक्टचा व्यवसाय आहे.
त्यांनी मला विचारले आपण कुठले ? ते अगदीच अपरिचित असल्यामुळे मी मुद्दामच म्हटले मी इथला मुंबईचाच आहे….
त्यावरून ते गृहस्थ मला लगेचच म्हणाले नाही तुम्ही खोटे सांगता आहात ! त्याचे हे वाक्य ऐकूनच मला तर एकदम आश्चर्य वाटले. कारण ज्या माणसाला मी अगदी पहिल्यांदाच पहातो आहे ती व्यक्ती असे कसे तुम्ही खोटे बोलता आहात असे म्हणू शकते हा प्रश्न मला पडला . त्यांनी ते ओळखले आणि मला म्हणाले ” *मी आर्किटेक्ट असलो तरी माझा वास्तूशास्त्राचा , भविष्याचा तसेच अन्य काही इतर शास्त्रांचाही माझा अभ्यास आहे.*
त्या अभ्यासशास्त्रातून जेवढे सत्कार्य करता येईल किंवा एखाद्या दूषित वास्तूत असणारे बाधित दोष जर दूर करता आले तर त्यासाठी मी निरपेक्ष काम करण्याचा मी प्रयत्न करीत असतो.
या विद्येतुन गूढार्थ शोधता येतो. जर काही दूषित वातावरण असेल तर ते दूर करता येते. त्याचे योग्य मार्गाने निराकरण करता येते आणि हे काम मी गेली 20 वर्षे करीत आहे. असे त्यांनी मला सांगितले. मला कर्णपिशाच्य विद्या माहिती आहे.
तेंव्हा माझे कुतूहल मात्र वाढले. मला मनातून आधीच असे जाणवले होते की या व्यक्तीला तंत्रमंत्र विद्या किंवा शाक्त किंवा कर्णपिशाच्य विद्या अवगत असावी. हे पॅन्टशर्ट मध्ये जरी असले तरी त्या व्यक्तीचा एकूण पेहराव त्यांच्या हातातील अंगठ्या , मनगटावरील गोपदोरे , कपाळावरील बारीक कुंकू पाहून माझ्या लक्षात आले होते तेंव्हाच मला त्यांच्या अवगत असलेल्या विद्येबद्दल समजून गेले होते , कारण अशा गोष्टी मी तर अगदी लहानपणापासून पाहिल्या होत्या.
आमचे बोलणे चालू असतानाच चेंबूर आले. मी आपला मिठाईचा एक बॉक्स काढला त्यांना मी घ्या म्हटलो त्यांनी दोन पेढे घेतले , मी म्हटले हा बॉक्स आपल्याला संपवायचा आहे. ते म्हणाले तुम्ही संपवा मला बास , पण दुसरा सुद्धा तुम्ही संपवणार आहात हेही मला माहिती आहे. मला तर आता अजून आश्चर्य वाटले. बोलत बोलत प्रवास सुरु होता. आता बस हायवेला लागली होती. मी माझा पेढ्याचा बॉक्स संपवला होता…..
रात्रीचे 12 कधीच वाजून गेले होते. आता मात्र *प्रताप मंदर्गी* बोलण्याचे थांबले होते पण त्यांच्या चेहऱ्यावर विचित्र भाव मला बसच्या नाईट डीमर लॅम्प मध्ये दिसत होते. ते अगदी असंबद्ध कुणाशी तरी सांकेतिक बोलत होते. मी ते अगदी शांततेने , सावधतेने पहात होतो….मला काही त्रास नव्हता किंवा ते काय बोलत होते तेही मला कळत नव्हते. पण मला उत्सुकता होती .
15/20 मिनिटांनी ते नॉर्मल झाले… मला म्हणाले ” *पुढे रस्त्यावर मोठा आपघात झाला आहे आपल्याला पुढे जाता येणार नाही , थांबावे लागणार आहे.*
मला तर काही कळेना एशियाड बस तर रात्री सुसाट चालली आहे , सर्व प्रवासी साखरझोपेत आहेत …
पण विशेष म्हणजे अचानक हळूहळू बसचा वेग कमी झाला होता रोडवरील सर्वच गाड्या थांबल्या होता. पोलीस गाड्याही आल्या होत्या.. आणी *त्या प्रताप मंदर्गी या माणसाने सांगितलेले खरे झाले होते..*
रोडवर रात्री गाड्यांची समोरासमोर जोरदार टक्कर होवून त्या अपघातात 5 माणसे मृत्यूमुखी पडली होती.
3 तासानंतर रस्ता मोकळा झाल्यावर आम्ही यथावकाश सातारला पोहोचलो उजाडले होते…..मंदर्गी पुढच्या प्रवासाला पुढे गेले आणि मी माझ्या घरी पोहोचलो..हाही एक *अविस्मरणीय असा अनुभव..!!!*
*महत्वाचे म्हणजे भूत-खेतांच्या जुन्या काळातील सत्य अनुभवकथा हा विषयच खूपच वेगळा आहे.*
या मध्ये प्रत्येकाचे स्वानुभव आहेत त्यामुळे या कथा रंजकतेबरोबर पुर्वीच्या काळातील लोकांची मनधारणा, प्रत्येकाची विविध मते , अनुभव यांची माहिती होते.
माझ्या वाचनात आलेले आणि मी ऐकलेले भूतांचे काही प्रकार आहेत…..
१) कूष्मांड…अफ्रिकन झोंबी…
२) चकवा….
३) खवीस….
४) समंध….
५) ब्रह्मसंबंध
६) वीर ….. ईर…
७)अप्सरा …. आसरा..
८) हडळ
९) देवाचार
असे अनेक प्रकार आहेत. प्रत्येक प्रांतात त्यांची वेगवेगळी नावे , त्यांचे दोष , त्यांची बाधा होण्याचे किंवा झपाटण्याचे वेगवेगळे प्रकार आहेत. त्यावरील उपायही आहेत. या शास्त्राचे व योनीचे जाणकार व्यक्तीकडून याची माहिती मिळते…!!
पण आता विज्ञानयुगात या शक्तींची तीव्रता कमी झालेली आढळली तरी काही ठिकाणी याचा प्रादुर्भाव जाणवतो हेही खरे आहे.
*परंतु आपले नैतिक, अध्यात्मिक , अधिष्ठान आपण सात्विक ठेवले तर अशा अशौचनिय , दुष्ट , अघोरी शक्तींचा त्रास आपल्याला होत नाही.*
*हेही तितकेच खरे आहे.*
मी माझ्या या *भुताखेतांच्या गोष्टी*
या 25 भागांच्या लेखमालिकेत उत्सुकते पोटी आणि केवळ रंजनासाठी म्हणून या मी ऐकलेल्या आणि मला आलेल्या अनुभवानुसार हे शब्दांकन करून *संक्षिप्त गोष्टीरूप कथा* आपणां सर्व रसिक वाचकांच्या पुढे ठेवल्या आहेत.
मला अनेकांनी याचे पुस्तक काढा असे सांगितले आहे. काहींनी तर या बाबत मला त्यांच्या समस्येवर देखील प्रश्न विचारले आहेत. ,पण मी या कुठल्याही शात्राचा किंवा विद्येचा अभ्यासक नाही हे मुद्दाम नमूद करीत आहेत.
*आपल्या प्रचंड प्रतिसादाबद्दल मी आभारी आहे.*
*(ही लेखमाला समाप्त)*
*©️#वि.ग.सातपुते.*
*( 📞9766544908).*
*संवाद मिडिया*
*आतुरता गणपती बाप्पाच्या आगमनाची – ओंकार ट्रेडर्स*
*लिंक वर क्लिक करा 👇*
————————————————–
*आतुरता गणपती बाप्पाच्या आगमनाची…*🙏🏻😇
*सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकमेव☝️ ठिकाण जिथे गणपतीसाठी लागणारे सर्वकाही मिळेल एका छताखाली 😇 तेही अगदी माफक दरात..*
🌐 https://sanwadmedia.com/105547
🎨 *ओंकार ट्रेडर्स*📿
👉 जिल्ह्यातील होलसेलर आणि रिटेलर शॉप
👉 गणपतीसाठी लागणारे सर्व प्रकारचे रंग 🎨, ज्वेलरी👑📿, ब्रश🖌️, कॉम्प्रेसर, क्ले टूल्स, इतरही सर्व साहित्य होलसेल दरात मिळतील.😇
👉 शाडू माती व प्लास्टर(POP) मिळेल.
🎴 *ओंकार ट्रेडर्स*
*माणगाव तिठा, ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग*
*प्रो. प्रा. श्रीम. योगिता तामाणेकर*
☎️ *संपर्क :* ०२३६२ – २३६२६१
📱 *मो.९४२३३०४७९६,* *७७७४९००५०१,* *९४२१२६१०८९,* *९८३४३४३५४९*
————————————————–
_संवाद मीडिया जगभर घडणाऱ्या घडामोडींचा ताजा व निष्पक्ष वृतांत आपल्यासाठी दिवसभर प्रसारीत करते. साइटवर बातमी प्रसारीत झाल्याबरोबर सूचना मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटवर “सूचना (notifications)” ला परवानगी द्या. आम्ही कायम आपल्याला अपडेटेड ठेवू!_
——————————————————-
*वेबसाईट :*
www.sanwadmedia.com
——————————————————-
*फेसबुक पेज :* https://www.facebook.com/snvadmedia
——————————————————-
*इन्स्टाग्राम पेज :*
https://www.instagram.com/sanvadmedia
——————————————————-
*ट्विटर :* https://twitter.com/@mediasanwad
——————————————————
*चॅनेल :* https://www.youtube.com/c/sanvadmedia
——————————————————
📰 *व्हॉट्सऍप* 👇🏻
https://chat.whatsapp.com/BiRiAdzopHTFNHNh3QcKvJ
—————————————————–
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क : *8356929616*