You are currently viewing सावंतवाडीतील आयुर्वेद महाविद्यालयाला अत्याधुनिक रुग्णवाहिका

सावंतवाडीतील आयुर्वेद महाविद्यालयाला अत्याधुनिक रुग्णवाहिका

*विधानसभा अध्यक्षांचे आश्वासन; शहराच्या विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य*

*संचालक उमाकांत वारंग यांनी घेतली मुंबई येथे भेट*

 

मुंबई :

 

 

राणी जानकीबाईसाहेब सुतिका गृह संचलित भाईसाहेब सावंत आयुर्वेद महाविद्यालयाला अत्याधुनिक रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्याचे आश्वासन राज्याचे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिले. आयुर्वेद महाविद्यालयाचे संचालक उमाकांत वारंग यांनी मुंबई येथे नार्वेकर यांची भेट घेतली. यावेळी त्यांच्या सोबत सावंतवाडी तालुक्यातील न्हावेली येथील मूळ रहिवासी मुंबईतील प्रसिद्ध वेलनेस कोच, प्रोफेशनल एस्ट्रोलॉजर, वास्तु कन्सल्टंट, स्पिरीट्युल हीलर, न्यूट्रिशनिस्ट डॉ. सूर्यकांत राऊळ उपस्थित होते.

भाईसाहेब सावंत आयुर्वेद महाविद्यालयाचे संस्था संचालक उमाकांत वारंग यांनी सावंतवाडी शहराच्या विकासाबाबतही चर्चा केली. रुग्णांना दर्जेदार वैद्यकीय सुविधा मिळायला हव्यात, सावंतवाडी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य राहील, असा विश्वास व्यक्त करताना येत्या ऑक्टोबर महिन्यात आयुर्वेद महाविद्यालयाला भेट देणार असल्याचे राहुल नार्वेकर यांनी स्पष्ट केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा