*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच समूह प्रमुख लेखक कवी पांडुरंग कुलकर्णी लिखित अप्रतिम लेख*
*आजचे आत्मचिंतन*
*दैनंदिन जीवनात आपण अध्यात्म जगतो का?*
*आपण सतत कार्यशील असतो. सतत काही ना काही कर्म करीत असतो. अगदी झोपेतसुद्धा आपले श्वसनाचे, रक्ताभीसरणाचे कार्य चालू असते. दिवसा अगदी निवांत बसलेलो असलो तरी मनात विचार करीत असतो. म्हणजे आपण जन्मभर कार्यरत असतोच. हे सर्व खरंच आपण स्वतः करत असतो का? कि कुणाकडून तरी ते होत असते? श्वसन, रक्ताभिसरण हे सर्व कसे होत राहते, ते अपल्याला कळतही नाही. मग या साऱ्याचे कर्तेपण सुद्धा आपण घ्यायला नको आहे. अगदी देवाला जी आपण फुले वाहतो ती तरी आपण स्वतः थोडीच तयार केली आहेत? आपण त्या फुलझाडाची थोडीफार निगा राखली असेल एव्हढच. पण आपण त्या झाडावर फुल निर्माण नक्कीच केले नाही. त्याचा निर्माता कर्ता करवीता कुणीतरी वेगळाच आहे. मी नाही एव्हढे निश्चित. आपण दैनंदिन जीवनात अश्या बऱ्याच आपण न केलेल्या कार्याचे कर्तेपण घेत असतो. हे अगदी पूर्णपणे चुकीचे आहे, असे आपणास वाटत नाही का? म्हणजे नकळतपणे का होईना पण आपण खोटेपणाने वागतो. हे मात्र निश्चित. हे आपण खरंच न केलेल्या गोष्टीचे कर्तेपण घेणे आपण सोडून दिले पाहिजे. आपल्याला वाटते कि आपण कर्मे करतो पण खरंच ज्या साधनाच्या साहाय्याने आपण ती कर्मे करतो ती साधने तरी आपली आहेत का? आपले शरीर, मन तरी आपले आहे का? तेही परमेश्वराने आपणाला साधन म्हणून दिले आहे. पंचप्राण, ज्ञानेद्रिये, कर्मेंद्रिये ही सर्व देवाने आपणास दिली आहेत. मग आपण त्याचा व्यर्थ अभिमान का बाळगावा? निदान ती साधने ज्यांनी आपणास दिली त्या परमेश्वराचे आपण एकदा तरी आभार मानले पाहिजेत. त्याच्याप्रती कृतज्ञता भाव व्यक्त करणे आपले कर्तव्य आहे. ते आपण करतो का ? नसेल करत तर ते केले पाहिजे. थोडक्यात काय, तर त्या सर्व गोष्टीचे कर्तेपण आपण घेऊ नये. त्या कार्याचे फळसुद्धा मग त्याचेच आहे. . तेही आपण त्यालाच समर्पित केले पाहिजे. म्हणजे मग त्या परमेश्वरालाही कितीतरी बरे वाटेल. त्याची साधने वापरून आपण कार्य केले. त्या साधनाचा सदुपयोग केला तर तोही आपल्याप्रती कृतज्ञता भाव निश्चितच ठेवणार आणि आपल्यावर त्याची सदैव कृपा राहणार आहे. पण अट एकच. त्या साधनाचा सदुपयोग व्हायला हवा. आपण दैनंदिन जीवनात असे वागलो तर त्यालाच म्हणावे कि आपण अध्यात्मिक जीवन जगलो.होय ना?*
*••••• पांडुरंग वसंत कुलकर्णी*
*संवाद मिडिया*
*आतुरता गणपती बाप्पाच्या आगमनाची – ओंकार ट्रेडर्स*
*लिंक वर क्लिक करा 👇*
————————————————–
*आतुरता गणपती बाप्पाच्या आगमनाची…*🙏🏻😇
*सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकमेव☝️ ठिकाण जिथे गणपतीसाठी लागणारे सर्वकाही मिळेल एका छताखाली 😇 तेही अगदी माफक दरात..*
🌐 https://sanwadmedia.com/105547
🎨 *ओंकार ट्रेडर्स*📿
👉 जिल्ह्यातील होलसेलर आणि रिटेलर शॉप
👉 गणपतीसाठी लागणारे सर्व प्रकारचे रंग 🎨, ज्वेलरी👑📿, ब्रश🖌️, कॉम्प्रेसर, क्ले टूल्स, इतरही सर्व साहित्य होलसेल दरात मिळतील.😇
👉 शाडू माती व प्लास्टर(POP) मिळेल.
🎴 *ओंकार ट्रेडर्स*
*माणगाव तिठा, ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग*
*प्रो. प्रा. श्रीम. योगिता तामाणेकर*
☎️ *संपर्क :* ०२३६२ – २३६२६१
📱 *मो.९४२३३०४७९६,* *७७७४९००५०१,* *९४२१२६१०८९,* *९८३४३४३५४९*
————————————————–
_संवाद मीडिया जगभर घडणाऱ्या घडामोडींचा ताजा व निष्पक्ष वृतांत आपल्यासाठी दिवसभर प्रसारीत करते. साइटवर बातमी प्रसारीत झाल्याबरोबर सूचना मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटवर “सूचना (notifications)” ला परवानगी द्या. आम्ही कायम आपल्याला अपडेटेड ठेवू!_
——————————————————-
*वेबसाईट :*
www.sanwadmedia.com
——————————————————-
*फेसबुक पेज :* https://www.facebook.com/snvadmedia
——————————————————-
*इन्स्टाग्राम पेज :*
https://www.instagram.com/sanvadmedia
——————————————————-
*ट्विटर :* https://twitter.com/@mediasanwad
——————————————————
*चॅनेल :* https://www.youtube.com/c/sanvadmedia
——————————————————
📰 *व्हॉट्सऍप* 👇🏻
https://chat.whatsapp.com/BiRiAdzopHTFNHNh3QcKvJ
—————————————————–
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क : *8356929616*