You are currently viewing एसटी बसचे आरक्षण आता आयआरसीटीसीवरुनही करता येणार

एसटी बसचे आरक्षण आता आयआरसीटीसीवरुनही करता येणार

एसटी बसचे आरक्षण आता आयआरसीटीसीवरुनही करता येणार

मुंबई

एसटी महामंडळाच्या बस प्रवासासाठी आता आयआरसीटीसीवरुनही आरक्षण करता येणार असून यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीमध्ये  सामंजस्य करार करण्यात आला.

            मुख्यमंत्र्यांच्या वर्षा शासकीय निवासस्थानी एसटी महामंडळ व इंडियन रेल्वे कॅटरिंग ॲण्ड टुरिझ्म कॉर्पोरेशन (IRCTC) यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सामजंस्य करारावर सह्या केल्या. महाराष्ट्र राज्य रस्ते परिवहन महामंडळ (एम.एस.आर.टी.सी) अर्थात एस.टी. महामंडळ व रेल्वेच्या आय.आर.सी.टी.सी. यांच्या दरम्यान आरक्षण व्यवस्थापन प्रणाली संदर्भात हा सामंजस्य करार करण्यात आला.

            यामुळे इंडियन रेल्वे कॅटरिंग ॲण्ड टुरिझ्म कॉर्पोरेशनच्या संकेतस्थळावरुन (https://www.bus.irctc.co.inप्रवाशांना एसटीचे तिकीट देखील आरक्षित करता येणार आहे. 

            रेल्वेच्या एकूण प्रवासी संख्येपैकी ७५ टक्के प्रवासी इंडियन रेल्वे कॅटरिंग ॲण्ड टुरिझम कॉर्पोरेशनच्या संकेतस्थळावरुन तिकीट आरक्षित करतात. या सर्व प्रवाशांना आता एसटी बसचे तिकीटदेखील आरक्षित करणे शक्य होईल. त्यामुळे एसटीच्या प्रवासी संख्येमध्ये वाढ होणार आहे. तसेच प्रवाशांना रेल्वे आणि एसटीच्या संयुक्त प्रवासाचे नियोजन करणे शक्य होईल, अशी माहिती एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी दिली.

            या करारप्रसंगी परिवहन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव पराग जैन – नैनुटियाआय.आर.सी.टी.सी. च्या व्यवस्थापकीय संचालक श्रीमती सीमाकुमार आदी उपस्थित होते.

*संवाद मिडिया*

*प्रवेश देणे चालू आहे !!*
१० वी १२ वी(सायन्स, आर्ट ,कॉमर्स) किंवा ग्रॅज्युएशन नंतर वैद्यकीय क्षेत्रातील शॉर्ट टर्म कोर्स करा आणि शासकीय निमशासकीय हॉस्पिटल व डायग्नोस्टिक सेंटर येथे घडवा आपलं करिअर!
*आरोग्य क्षेत्रात नौकरीची सुवर्ण संधी!!!!!*
*शिकविण्यात येणारे कोर्सेस :-*
💀 *रेडिओलॉजी डिप्लोमा कोर्सेस :-*
१. एक्सरे टेक्निशियन
2.सी टी स्कॅन
३.एम.आर.आय. टेक्निशियन
४. डी एक्स आय टी
🧪 *पॅथोलॉजी डिप्लोमा कोर्सेस :-*💉
१.एम.एल.टी
२.डी. एम. एल. टी
३. ऍडव्हान्स डी. एम. एल. टी*

*इतर कोर्सेस :-*
१.ओ.टी टेकनॉलजी.
२. डिप्लोमा इन ओ टी.
३.डायलेसिस टेकनॉलजी
४. डिप्लोमा इन डायलेसिस टेक्नॉलॉजी
५. डिप्लोमा इन इ. सी जी टेक्नॉलॉजी
६. डिप्लोमा इन इ. इ. जी. & इ.एम. जी. टेक्नॉलॉजी
७. नर्सिंग केअर

● *फी मधे आकर्षक सूट*
● *अनुभवी प्रशिक्षक*
● *प्रात्यक्षिकसाठी दवाखान्यात प्रक्षिशण उपलब्धता*
*पत्ता* :-
*उत्कर्ष अकॅडमी ऑफ ग्लोबल करीअर*
*पहिला मजला,देवरुख एस.टी.स्टॅण्ड, देवरुख*रत्नागिरी-४१५८०४*
*मोबाईल- 8369106430/8291348515*

*जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/109085/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा