कणकवलीतील पुरोहित शैलेश करंबेळकर यांचे निधन…
कणकवली
शहरातील बांधकरवाडी येथील रहिवासी व पुरोहित सिद्धेश्वर उर्फ शैलेश गुरुदास करंबेळकर (वय ३५) यांचे सोमवारी सायंकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. श्री देव काशी विश्वेश्वर देवस्थानचे पौराहित्य ते करत असत. त्यांच्या पश्चात आई, वडील, दोन भाऊ, पुतणे, भावजय असा मोठा परिवार आहे. शहराचे ग्रामपुरोहित गुरुदास करंबेळकर यांचा सिद्धेशवर हा मुलगा होता. आचरा येथील काॅलेज ऑफ मॅनेजमेंट स्टडीच चे प्राचार्य म्हणूनही त्यांनी काही वर्ष काम केले होते. त्यांच्या दुःखद निधनाबद्दल सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.