लोकअदालतीत ४६९ प्रकरणे निकाली ; १० कोटी वसुली
इचलकरंजी : प्रतिनिधी
इचलकरंजी येथे आज हातकणंगले तालुका विधी सेवा समिती इचलकरंजीचे अध्यक्ष तथा जिल्हा न्यायाधीश एम.आर. नेरलेकर यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय लोकअदालत झाली. यामध्ये दाखलपूर्व आणि न्यायालयात प्रलंबित अशी
४६९ प्रकरणे निकालात काढून १० कोटी रुपयांची वसुली करण्यात आली.
या लोकअदालतीमध्ये ग्रामपंचायत, महावितरण आणि बँकांची दाखलपूर्व ३ हजार ३८२ आणि न्यायालयातील प्रलंबित २ हजार ७१९ प्रकरणे तडजोडीसाठी ठेवली होती. त्यातील दाखलपूर्व प्रकरणातील २१९, न्यायालयातील प्रलंबित २५० अशी एकूण ४६९ प्रकरणे निकाली काढण्यात आली. या लोकअदालतीसाठी ६ पॅनेल ठेवले होते. जिल्हा न्यायाधीश एम. आर. नेरलेकर, दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर एच.ए. वाणी, सह दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर एस.ए. इंगळे, सह दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर एम.एम. चौधरी, सह दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर एस.डी. वानखेडे, सह दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर एस.एस. पेडणेकर यांनी पॅनेल प्रमुख म्हणून तर न्यायालयातील पॅनेल सदस्य म्हणून विधीज्ञ राजेश घोरपडे, निता परीट, राहुल काटकर, सुनिल देसाई, सोनल कदम, दत्तात्रय कांबळे यांनी काम पाहिले. लोकअदालत यशस्वीतेसाठी इचलकरंजी न्यायालयातील पॅनेलवर नेमलेले न्यायाधीश, इचलकरंजी वकील संघटनेचे अध्यक्ष अॅड. शिवराज चुडमुंगे तसेच सदस्य, न्यायालयीन कर्मचारी, पक्षकारांचे सहकार्य लाभले.
*संवाद मिडिया*
*प्रवेश देणे चालू आहे !!*
१० वी १२ वी(सायन्स, आर्ट ,कॉमर्स) किंवा ग्रॅज्युएशन नंतर वैद्यकीय क्षेत्रातील शॉर्ट टर्म कोर्स करा आणि शासकीय निमशासकीय हॉस्पिटल व डायग्नोस्टिक सेंटर येथे घडवा आपलं करिअर!
*आरोग्य क्षेत्रात नौकरीची सुवर्ण संधी!!!!!*
*शिकविण्यात येणारे कोर्सेस :-*
💀 *रेडिओलॉजी डिप्लोमा कोर्सेस :-*
१. एक्सरे टेक्निशियन
2.सी टी स्कॅन
३.एम.आर.आय. टेक्निशियन
४. डी एक्स आय टी
🧪 *पॅथोलॉजी डिप्लोमा कोर्सेस :-*💉
१.एम.एल.टी
२.डी. एम. एल. टी
३. ऍडव्हान्स डी. एम. एल. टी*
*इतर कोर्सेस :-*
१.ओ.टी टेकनॉलजी.
२. डिप्लोमा इन ओ टी.
३.डायलेसिस टेकनॉलजी
४. डिप्लोमा इन डायलेसिस टेक्नॉलॉजी
५. डिप्लोमा इन इ. सी जी टेक्नॉलॉजी
६. डिप्लोमा इन इ. इ. जी. & इ.एम. जी. टेक्नॉलॉजी
७. नर्सिंग केअर
● *फी मधे आकर्षक सूट*
● *अनुभवी प्रशिक्षक*
● *प्रात्यक्षिकसाठी दवाखान्यात प्रक्षिशण उपलब्धता*
*पत्ता* :-
*उत्कर्ष अकॅडमी ऑफ ग्लोबल करीअर*
*पहिला मजला,देवरुख एस.टी.स्टॅण्ड, देवरुख*रत्नागिरी-४१५८०४*
*मोबाईल- 8369106430/8291348515*
*जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/109085/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*