ठाकरे शिवसेनेतर्फे उद्या ओरोसला धरणे आंदोलन
कणकवली
आंबा व काजू पीकविमा योजनेत राज्य व केंद्र शासनाने आपल्या हिश्श्याचा विम्याचा हप्ता विमा कंपनीकडे वर्ग न केल्याने पीकविमा नुकसान भरपाईपासून आहे. शेतकरी वंचित आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या नुकसानीची सुमारे १२० कोटी रुपये रक्कम प्रलंबित आहे. गणेशोत्सव काही दिवसांवर आला आहे. तत्पूर्वी शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची रक्कम मिळावी, यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष व आंबा काजू उत्पादक शेतकऱ्यांच्यावतीने मंगळवार १२ सप्टेंबरला दुपारी १२ वाजता ओरोस येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन छेडण्यात येणार आहे.आंदोलनात जिल्ह्यातील पीक विमाधारक आंबा काजू
उत्पादक शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आमदार वैभव नाईक, जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सतीश सावंत, जिल्हाप्रमुख संदेश पारकर व संजय पडते यांनी केले आहे.
नाईक, सावंत, पारकर, पडते यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, पीकविमा योजनेत राज्य व केंद्र शासनाने आपल्या हिश्श्याचा विम्याचा हप्ता विमा कंपनीकडे वर्ग न केल्याने अद्यापपर्यंत शेतकऱ्यांना विम्याची रक्कम मिळालेली नाही. याबाबत आवाज न उठविल्यास सरकारकडून आंबा-काजू उत्पादक शेतकऱ्यांची फसवणूक केली जाणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना ‘ न्याय मिळवून देण्यासाठी हे आंदोलन छेडण्यात येणार आहे.
संवाद मिडिया*
*सुवर्ण संधी!सुवर्ण संधी!!फिजियोथेरेपी डॉक्टर होण्याची सुवर्ण संधी!!!*
*बॅचलर ऑफ फिजियोथेरेपी(B.P.Th)* करण्याची सुवर्णसंधी.
Affiliated to MUHS,Nashik,DMER व महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त कॉलेज मध्ये
*प्रवेश सुरु -शैक्षणिक वर्ष 2023-2024*
*श्री रामराजे कॉलेज ऑफ फिजियोथेरेपी , दापोली.*
*COLLEGE CODE-6191*
*बॅचलर ऑफ फिजियोथेरेपी(B.P.Th)*
Eligibility- 12th Science (PCB)With NEET and Must Registered with CET Cell can apply.
• Duration : 4.5 Years
*👉मागासवर्गीय विद्यार्थांना शिष्यवृत्ती.(शासन नियमानुसार).*
*पत्ता:*
प्रांत ऑफिस जवळ,दापोली, ता. दापोली, जिल्हा रत्नागिरी, 415712
*संपर्क:*
📲 9145623747/ 9420156771/7887561247*
*जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/107166/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*pink