गणेशोत्सव काळात बाळासाहेबांचे विचार तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करा – मंत्री दिपक केसरकर
सावंतवाडी
हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने कोकणचा विकास करायचा आहे.आगामी गणेशोत्सव काळात बाळासाहेबांचे विचार जास्तीत जास्त तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करा असे आवाहन शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी आज येथे कार्यकर्त्यांना केले.
शिंदे शिवसेनेच्या सावंतवाडी विधानसभा मतदार संघातील पदाधिकारी कार्यकर्त्यांचा मेळावा आज मळगाव येथे पार पडला
यावेळी उपस्थित पदाधिकारी कार्यकर्त्यांना संबोधित करताना केसरकर बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर जिल्हाप्रमुख अशोक दळवी, माजी उपनगराध्यक्ष राजन पोकळे, महीला जिल्हा प्रमुख ॲड निता कविटकर, सावंतवाडी तालुकाप्रमुख बबन राणे, दोडामार्ग तालुकाप्रमुख गणेशप्रसाद गवस, वेगुर्ले तालुकाप्रमुख नितिन मांजरेकर, विनायक दळवी,राजू निंबाळकर, अनारोजिन लोबो,भारती मोरे, दिपाली सावंत, तानाजी वाडकर, सचिन वालावलकर,शर्वरी धारगळकर,उत्कर्षा गावकर आदी उपस्थित होते.
मंत्री केसरकर म्हणाले शिंदे बाळासाहेबांचा विचार घेऊन विकासात्मक घोडदौड अखंड महाराष्ट्रात सुरू आहे हीच घोडदौड कोकणातही पाहायला मिळेल त्यामुळे बाळासाहेबांचे हे विचार तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न कार्यकर्त्यांनी करावा माझ्या आमदारकीच्या पहिल्या निवडणुकीमध्ये भजनी मंडळांसाठी भजनी साहित्य वाटप केले होते आज जिल्हा परिषदेच्या माध्यमातून हे साहित्य वाटप केले जात आहे याचा लाभ जास्तीत जास्त भजनी मंडळाने घ्यावा. आगामी गणेश चतुर्थी काळात गावागावांमध्ये मोठ्या प्रमाणात चाकरमाने दाखल होणार आहे त्यांचे स्वागतही शिंदे सेनेच्या माध्यमातून करण्यात येणार आहे याशिवाय मतदार संघातील जनतेला वेळ देता यावा यासाठी शुक्रवार शनिवार रविवार हे तीन दिवस आपण मतदारसंघात उपस्थित राहणार आहे. आगामी काळात शिवसेनेची ताकद वाढण्यासाठी प्रवेश करते तसेच पदाधिकारी कार्यकर्त्यांनी आतापासूनच कामाला लागा असे आवाहन त्यांनी केले.
या मेळाव्या दरम्यान पक्षासाठी अहोरात्र काम करणारे पदाधिकारी तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महनीय व्यक्तींचा गौरव मंत्री केसरकर यांच्या हस्ते करण्यात आला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला माजी उपनगराध्यक्ष राजन पोकळे यांनी प्रास्ताविक केले तर आभार प्रदर्शन जिल्हाप्रमुख अशोक दळवी यांनी मानले. यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.