भाजपाच्या जंबो जिल्हा कार्यकारिणीची घोषणा!
उपाध्यक्ष 10, सरचिटणीस 4, कार्यकारणी सदस्य 73.
आगामी खासदार व आमदार कमळ चिन्हावर निवडून आणणार : भाजपाचा महाविजय संकल्प. – जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत.
सिंधुदुर्गनगरी
भारतीय जनता पक्षाने अध्यक्षपदाच्या निवडीनंतर रविवारी जिल्ह्याची कार्यकारिणीच्या निवडीची घोषणा करण्यात आली. यात 4 सरचिटणीस, 10 उपाध्यक्ष, 10 चिटणीस, कोषाध्यक्ष एक , कार्यालय मंत्री एक व 73 कार्यकारिणी सदस्य यांसह 25 विशेष निमंत्रित, 28 निमंत्रित सदस्य अशी एकूण 153 जणांची कार्यकारिणी असल्याची आल्याची माहिती प्रभाकर सावंत यांनी पत्रकार परिषदेत दिली. यासोबत भाजपाच्या संघटन कामात अत्यंत महत्वाच्या अश्या महिला, युवा, किसान, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, ओबीसी, अल्पसंख्यांक या 7 मोर्चाचे अध्यक्ष सुद्धा जाहीर करण्यात आले. भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर, भाजप नेते माजी आमदार राजन तेली, राजू राऊळ या नेत्यांच्या ही घोषणा करण्यात आली.
गेल्या महिन्यात भाजपा जिल्हाध्यक्ष पदी प्रभाकर सावंत यांची नियुक्ती झाल्यानंतर प्रतीक्षेत असलेल्या भाजपा जिल्हा कार्यकारिणीची घोषणा आज जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी केली. मा. नाम. नारायणराव राणे, मा. रविंद्रजी चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली विधानसभा प्रमुख मा. निलेशजी राणे, आम. निलेशजी राणे, मा. राजनजी तेली यांच्या सहकार्याने कार्यकारिणी रचना पूर्ण करण्यात आलेली असून भाजपाच्या घटनेप्रमाणे मा संघटनमंत्री शैलेंद्रजी दळवी, जिल्हा प्रभारी मा महेश जाधव,प्रदेश उपाध्यक्ष अतुलजी काळसेकर तसेच प्रदेशाध्यक्ष मा चंद्रशेखर बावनकुळे यांची मान्यता घेण्यात आलेली आहे. असेही प्रभाकर सावंत म्हणाले.
आगामी काळात लोकसभा, विधानसभेसह अनेक निवडणुकांचे आवाहन असल्याने संघटनेसाठी वेळ देणाऱ्या कार्यकर्त्यांना पदाधिकारी म्हणून संधी दिलेली आहे. यासाठी गेला महिनाभर संपूर्ण जिल्हाभर प्रवास करून जेष्ठ कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेत या निवडीवर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. जिल्हयातील तीन विधानसभा क्षेत्रातील आठही तालुक्यातील कार्यकर्त्यांना प्रमाणात संधी देत प्रादेशिक समतोल साधण्याचा प्रयत्न केलेला आहे तर महिला वर्ग आणि सामाजिक रचनेचा ताळमेळ सुद्धा साधण्यात आलेला आहे.
या कार्यकारिणी नंतर विविध क्षेत्रातील २८ प्रकोष्ठ संयोजकांच्या नियुक्त्या लवकरच जाहीर करण्यात येणार आहेत. भाजपाकडे मोठ्या संख्येने कार्यक्षम पदाधिकाऱ्यांची फौज आहे, त्या प्रत्येकाला संघटनेच्या कामात सक्रिय करून घेणार आहे.
ही सर्व मंडळी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली संघटनेसाठी जास्तीचा वेळ देत संघटनेच्या घटना आणि ध्येयधोरणांप्रमाणे कार्यरत राहतील, भाजपाचा हा सुवर्णकाळ आहे या काळात ‘कमळ’ निशाणीवर जिंकलेले खासदार आणि तीनही आमदार ही ‘बकेट लिस्ट’ नक्की पूर्ण करतील असा विश्वास मा. प्रभाकर सावंत यांनी यावेळी व्यक्त केला.
जिल्हा पदाधिकारी:-
जिल्हाध्यक्ष – मा. प्रभाकर विजयसिंह सावंत
उपाध्यक्ष – श्री.प्रमोद पुंडलिक रावराणे, श्री. अशोक वासुदेव सावंत, श्री. प्रसन्ना (बाळू) लक्ष्मण देसाई, श्री.संदेश (गोट्या) श्रीधर सावंत, श्री. सच्चिदानंद (संजू) जगन्नाथ परब, श्री. विजय प्रताप केनवडेकर, श्रीम. सुषमा सुर्यकांत खानोलकर, श्रीम. सरोज शिवाजी परब, श्रीम.प्रियांका प्रदीप साळसकर
सरचिटणीस – श्री. महेश रमेश सारंग, श्री. रणजीत दत्तात्रय देसाई, श्री.संदीप प्रकाश साटम, श्रीम. शारदा शरद कांबळे
कोषाध्यक्ष – श्री.चारुदत्त रमाकांत देसाई
जिल्हा कार्यालय मंत्री – श्री. समर्थ शांताराम राणे
चिटणीस – श्री. एकनाथ अनंत नाडकर्णी, श्री. संतोष मनोहर किंजवडेकर, श्री. विनायक देवू राणे, श्री. महेश मोहन धुरी, श्री. संतोष हरिश्चंद्र कानडे, श्री. अनिल दत्ताराम कांदळकर, श्रीम. दीपलक्ष्मी सुशांत पडते, श्रीम.प्राची भानूदास तावडे, सौ. मानसी महेश धुरी , श्री. चंद्रकांत भोजू जाधव
विशेष निमंत्रित सदस्य :- मा. देवेंद्र गंगाधर फडणवीस (उपमुख्यमंत्री), मा. चंद्रशेखर बावनकुळे(प्रदेशाध्यक्ष भाजपा), मा. नारायणराव तातू राणे (केंद्रीय मंत्री), मा. रविंद्र चव्हाण (पालकमंत्री), मा. माधवराव भांडारी (उपाध्यक्ष भाजपा प्रदेश), मा. अतुल सुधाकर काळसेकर (उपाध्यक्ष भाजपा प्रदेश), मा.शैलेन्द्र जिजी दळवी (संघटन मंत्री, कोकण विभाग), मा.प्रमोद शांताराम जठार (लोकसभा निवडणूक प्रमुख), मा. नितेश नारायणराव राणे (आमदार कणकवली विधानसभा), मा. निरंजन वसंत डावखरे (आमदार पदवीधर मतदार संघ), मा. ज्ञानेश्वर म्हात्रे (आमदार शिक्षक मतदार संघ), मा. निलेश नारायणराव राणे (विधानसभा प्रमुख), मा. राजन कृष्णा तेली (विधानसभा प्रमुख), मा. मनोज तुळसीदास रावराणे (विधानसभा प्रमुख), अॅड.श्री.अजित पांडुरंग गोगटे (विशेष निमंत्रित सदस्य प्रदेश), श्री . शरद कृष्णा चव्हाण (विशेष निमंत्रित सदस्य प्रदेश), श्रीम.संध्या प्रसाद तेरसे (प्रदेश कार्य. सदस्य), श्री.देवदत्त (दत्ता) जनार्दन सामंत (विशेष निमंत्रित सदस्य प्रदेश), मा. श्रीम. प्रज्ञा प्रदीप ढवण (प्रदेश उपाध्यक्षा महिला आघाडी), मा. लखमराजे खेमचंद्र भोसले (प्रदेश उपाध्यक्ष युवा मोर्चा), श्री. अविनाश गंगाधर पराडकर (प्रवक्ते भाजपा महाराष्ट्र), श्री.अनिल (बंड्या) वामन सावंत (निमंत्रित सदस्य प्रदेश), श्रीम. रश्मी राजेंद्र लुडबे (निमंत्रित सदस्य प्रदेश), मा. मनीष प्रकाश दळवी (अध्यक्ष सिंधुदुर्ग जिल्हा बँक), मा. गुरुनाथ (राजू) यशवंत राऊळ (माजी जिल्हा उपाध्यक्ष)
निमंत्रित सदस्य:- श्री. विठठलराव सखाराम नाईकधुरे, श्री. राजन दत्ताराम म्हापसेकर, श्री.सदाशिव पुरूषोत्तम ओगले, श्री.राजन बाळकृष्ण चिके, श्री. मंदार दिनकर कल्याणकर, श्री. साईप्रसाद श्रीपाद नाईक, श्रीम.राजश्री राजेंद्र धुमाळे, श्री. मनोज चंद्रकांत नाईक, श्री. प्रकाश बाळकृष्ण राणे, श्री.आरिफ जैनुद्दीन बगदादी, श्री. राजेंद्र
(राजा) रविंद्र राणे, श्री. दिलीप लक्ष्मण गिरप, श्री. केशव (दीपक) रमेश नारकर, श्री. विष्णू (बाबा) सुधाकर मोंडकर, श्री. सुदेश सुबोध आचरेकर, श्री. दीपक गणपत पाटकर, श्री. अशोक लाडोबा तोडणकर, श्री. संतोष वसंत साटविलकर, डॉ. श्री. सर्वेश दत्ताराम नारकर, श्री. गोपाळ तातोबा हरमलकर, श्री. विकास दिलीप कुडाळकर, श्री. मोहन रामचंद्र सावंत, श्री. गजानन सुमंत गावडे, श्री. समीर अनंत नलावडे, श्री . गणेश सोनु हर्णे, श्री . संदीप एकनाथ गावडे, श्री. संतोष दिनकर नानचे, श्री. अजय वसंत गोंदावळे
सदस्य:- श्री . रविंद्र (बाळा ) कांतीलाल जठार, श्री.रविंद्र राजाराम शेटये, श्री. सदानंद (बबन) गोविंद हळदिवे, श्री. दिलीप चिमाजी तळेकर, श्री. सुरेश महादेव सावंत, श्री. परशुराम श्रीधर झगडे, श्री. महेश मनोहर लाड, श्री. शिशिर सुभाष परुळेकर, श्री. भिवा (बाबासाहेब) शंकर वर्देकर, श्रीम. भाग्यलक्ष्मी भालचंद्र साटम, श्रीम.मेघा अजय गांगण, श्रीम. हर्षदा हनुमंत वाळके, श्रीम. प्राची प्रवीण कर्पे, श्री. संजय शांताराम बांबुळकर, श्री. सदाशिव (राजा ) वसंत भुजबळ, श्री. लक्ष्मण (रवी) राजाराम पाळेकर, डॉ. अमोल जनार्दन तेली, श्री. मंगेश गंगाराम लोके, श्री. वैभव बिडये, श्रीम. सावी गंगाराम लोके, श्रीम. मनस्वी महेश घारे, श्री.भालचंद्र अनंत साठे, श्री.जयेंद्र दत्ताराम रावराणे, श्री. संजय शिवाजी रावराणे, श्री.अरविंद भास्कर रावराणे, श्री. लॉरेन्स (म्हातु) रुजाय मान्येकर, श्री. सचिन अरुण तेंडुलकर, श्री. किशोर सखाराम मर्गज, श्री. श्रीपाद (पप्या) पुंडलिक तवटे, श्री. भास्कर (संदेश) वीरेश नाईक, श्री. अभय यशवंत परब, श्री. नित्यानंद विनायक कांदळगावकर, श्रीम. उषा प्रदीप आठले, श्रीम. स्नेहा अशोक सावंत, श्रीम. साधना सतीश माडये, श्रीम. श्वेता स्वप्नील लंगवे, श्री. परशुराम (आप्पा) विद्याधर लुडबे, श्री. चंद्रशेखर (गणेश) रजनीकांत कुशे, श्री. महेंद्र गजानन चव्हाण, श्री. सुनील बाबाजी घाडीगावकर, श्री. सतीश( राजू) दामोदर परुळेकर, श्री. राजन गावकर, श्रीम. ममता मोहन वराडकर, श्री. महानंदा किशोर खानोलकर, श्रीम. नीलिमा नितीन परुळेकर, श्री. संतोष गोपाळ कोदे, श्री. महेश राजाराम बागवे, श्री. मधुकर जगन्नाथ चव्हाण, श्री. दिलीप गंगाराम सावंत, श्री. अनिल शंकर निव्हेकर, श्री. प्रमोद मधुकर कामत, श्री. गुलाबराव नारायण गावडे, श्री. रविंद्र मनोहर मडगावकर, श्री. परिमल गजानन नाईक, श्री. साबाजी देवू धुरी, श्री. हेमंत रमाकांत मराठे, श्रीम. प्रियांका प्रमोद गावडे, श्रीम. रेश्मा रविकांत सावंत, श्रीम. शर्वाणी शेखर गावकर, श्रीम. वंदना किरण किनळेकर , श्री. घन:श्याम विनायक सामंत, श्रीम. स्मिता मिलिंद दामले, श्री. मनवेल गिरबोल फर्नाडीस, श्री. प्रीतेश शंकर राऊळ, श्री. संतोष दशरथ गावडे, श्री. विनायक सदानंद गवंडळकर, श्री. चेतन सुभाष चव्हाण, श्री. श्रीकृष्ण (प्रवीण) तुळशीदास गवस, श्री. लक्ष्मण(बाळा) सखाराम नाईक, श्री. बळीराम विश्वनाथ नाईक, श्रीम. सुनीता कमलाकर भिसे, श्री. सिद्धेश मोहन पांगम, श्रीम. मृणाली सुनील मावळणकर
मोर्चा :-
श्रीम.श्वेता दिलीप कोरगावकर(जिल्हाध्यक्ष महिला मोर्चा), श्री. संदीप चंद्रकांत मेस्त्री (जिल्हाध्यक्ष युवा मोर्चा), श्री.उमेश रघुनाथ सावंत (जिल्हाध्यक्ष किसान मोर्चा), श्री. नामदेव जाधव (जिल्हाध्यक्ष अनुसूचित जाती मोर्चा), श्री. आनंद मेस्त्री (जिल्हाध्यक्ष ओबीसी मोर्चा), श्री. सुरेश संतोष पवार (जिल्हाध्यक्ष आदिवासी मोर्चा), श्री. व्हिक्टर ईशेद फर्नाडिस (जिल्हाध्यक्ष अल्पसंख्यांक मोर्चा)