You are currently viewing प्रेम..आधी स्वतःवर

प्रेम..आधी स्वतःवर

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्य लेखिका कवयित्री अंजली दीक्षित-पंडित लिखित अप्रतिम लेख*

 

*प्रेम..आधी स्वतःवर*

‘श्यामची आई’ हे साने गुरुजींचं पुस्तक वाचताना असो किंवा ती फिल्म बघताना असो रडला नसेल असा मराठी माणूस शोधून सापडला नसता… अगदी अलीकडच्या काळापर्यंत. अलिकडच्या काळापर्यंत असं म्हणायचं कारण हेच की आता सगळ्याच मुलांमधे इतकी संवेदनशीलता क्वचितच आढळते. त्यावेळी नकळत का होईना आपल्या आपल्या आईची श्यामच्या आईबरोबर आपण तुलनाही केली असेल, अर्थात सोयीस्करपणे आपली स्वतःची श्यामच्या व्यक्तिमत्वाशी तुलना नक्कीच केली नसेल. कारण आपण ते पुस्तक अगदी लहान असताना वाचलं असेल किंवा ती फिल्म खूप लहानपणी पाहिली असेल आणि लहान मुलांचा हा सहज स्वभावधर्म आहे. पहिले ते आपला स्वतःचा विचार करतात. आपलं पोट भरावं, आपल्याला चांगला खाऊ मिळावा, आपल्यालाच चांगले कपडे मिळावेत, नवीन खेळणी दुसऱ्याला नाही आपल्यालाच मिळावीत, आईनं बाबांनी माझेच लाड करावेत, मलाच जवळ घ्यावं असे सांगण्यासारखे कितीतरी प्रसंग आहेत आणि हे खूप नैसर्गिक आहे. जसजशी समज वाढत जाते आणि संस्कारांचा प्रभाव जाणवू लागतो तसतसं दुसऱ्याचा सुद्धा विचार करायचा असतो याचं आकलन होऊ लागतं. पण हे दुसऱ्याबद्दल विचार करणे तसे अंगवळणी पडणं महाकठीण असतं. दोन-तीन भावंड असतील तर या गोष्टीतली सत्यता पडताळता येतेच येते. चॉकलेट बिस्कीट खेळणी यासाठी तर तुझं माझं होतच असतं पण इतरही गोष्टी जशा आईजवळ कोण झोपणार, आजीच्या मांडीवर पहिले कोण बसणार, कपड्यांसाठी, पेन पेन्सिल साठी, कंपास साठी, नव्या दफ्तरासाठी, नव्या सायकल साठी अशी खूप खूप उदाहरणं आहेत की जेव्हा लहानपणी आपण फक्त आपलाच विचार केला एवढं खरं. त्यावेळी एकुलता एक असण्याचा प्रश्न फारसा कुठं दिसत नव्हता म्हणून या गोष्टींचीही मजा लुटता आली.

किती सहज असतं ना स्वतःवर प्रेम करणं? जन्माला आल्यापासूनच माणूस स्वतःच्या शरीरावर, दिसण्यावर, बोलण्यावर स्वतःच्या वस्तुंवर प्रेम करायला लागतो. प्रशंसेची अपेक्षा करायला लागतो. प्रसंगी त्या प्रशंसेसाठीच काही ना काही युक्त्यीचीसुद्धा योजना बनवायला लागतो. हे स्व प्रेम म्हणजे माणसाला मिळालेली देणगीच आहे खरंतर. जगातला प्रत्येक सजीव प्राणी स्वतःवर पहिलं प्रेम करतो. मला काय वाटतंय, काय आवडतं याचा विचार प्रथम करतो. मग जेव्हा त्याला सहजपणे हे स्व प्रेम कुरवाळणारा, आनंद देणारा, सुखावणारा कोणी भेटतो तेव्हा त्याच्याशी मनाच्या तारा आपोआप जुळून येतात. यालाच आपण ट्यूनिंग म्हणू शकतो. मनाच्या तारा जुळल्या की मैत्री जुळते. त्यातून मग अधिकाधिक स्वतःबरोबर दुसऱ्याचही स्व प्रेम फुलवलं जातं. हा स्वार्थ मुळीच नाही, ही एक उपजत प्रवृत्ती आहे. स्वतःवर प्रेम करणारी व्यक्ती दुसऱ्यावर ही प्रेमाचा वर्षाव करू शकते. जशी की ती एक आत्मझळाळी आहे. या झळाळीचं तेज पुन्हा पुन्हा सर्वत्र पसरत जाते. फक्त इथं स्व प्रेम आणि स्वार्थीपणा या गोष्टींची गल्लत होऊ द्यायची नाही. खूप पुसटशी सीमारेषा असते ही. मी आणि माझंच, फक्त मलाच, माझ्यापुरतंच हा झाला स्वार्थीपणा. येथे दुसऱ्याचा विचार बहुतेक असत नाही किंबहुना नसतोच. स्व प्रेम मात्र वेगळं असतं. ते एकाच वेळी खूप अथांग, गहिरं, सखोल भासते तर दुसरीकडे जाणिवेच्या अंधुक अशा पातळीवर अगदी तरलपणे झुलत असलेलं दिसते. ती असते आपल्या इवल्याशा का असेना पण स्व अस्तित्वाची जाणीव. मी कोण आहे या प्रश्नाचं स्वतःसाठी शोधलेलं स्वतःचं प्रामाणिक उत्तर. आपण केलेल्या कृतीचा प्रामाणिक ऊहापोह.
हे म्हणजे स्वतःच स्वतःचे उत्तम निरीक्षक बनण्यासारखं आहे म्हणा हवं तर. आपल्या मनात अविरत चाललेल्या द्वंद्वामध्ये कधी आपण स्व ला डिफेंड करतो तर कधी विरोध. मी बरोबर आहे असं म्हटलं की दुसरं मन म्हणतं नाही तू बरोबर कसा? अमुक गोष्ट तू चुकीची केलीस….अशी जुगलबंदी चालूच राहते. कधी जगासाठी आपण बरोबर असतो तर त्याचवेळी स्वतःसाठी चुकीचं ठरतो किंवा उलटही असू शकतं. ही मनोवस्था बऱ्याच वेळा येते पण ती अटळ आहे. कुठल्याही हलक्या उथळ मनाची ही चंचलता नाही तर हा एक आंतरिक संवाद आहे जो की प्रत्येक संवेदनशील मनात अखंड चालू असतो. प्रत्यक्ष जगात आपण बुद्धी वापरून निर्णय घेतोच पण आतला कोलाहल आपल्याला अनेकदा अस्वस्थ करत असतो. कुठल्या क्षणी मनाला काय वाटेल, मन कसा विचार करेल याचा थांगपत्ता दुसऱ्यालाच काय आपला आपल्याला देखील लागणं केवळ अशक्य आहे. कधी आपण स्वतःशीच भांडतो, स्वतःवर वैतागतो, कधी चिडतो तर कधी रुसतो देखील. कधी स्वतःलाच बोल लावतो तर कधी स्वतःच्याच कौतुकात स्वतःलाच न्हाऊ घालतो. अनेकानेक रंग स्वतःवर उधळतो, स्वतःवर भाळण्याच्या किती किती वाटांनी स्वतःला खुष ठेवतो. चालूच आहे हा प्रवास जन्मल्यापासून आजपर्यंत अथकपणे. स्वतःच्या अनेकविध रूपांना पारखत स्वतः जवळ व्यक्त होत हे स्व प्रेम आपल्याला रोज नव्याने आपल्याच प्रेमात पाडतं. आपल्याला सुंदर दृष्टिकोन बहाल करते. या दृष्टिकोनामुळेच तर आपली प्रत्येक सकाळ उत्साही, हसरी होते. प्रत्येक दुपार चिंतनशील होते. प्रत्येक संध्याकाळ मावळतीच्या सुंदर रंगात नहाते आणि प्रत्येक रात्र बऱ्या वाईटाच्या अनुभवाची शिदोरी बांधून देते. स्वतःवर प्रेम करता करताच आपण निसर्गातल्या किती गोष्टींवर प्रेम करू लागतो…. खरंच गंमत आहे ना?

अंजली दीक्षित -पंडित
छ.संभाजीनगर
९८३४६७९५९६

 

 

*संवाद मिडिया*

 

👩‍👩‍👧‍👦 *मुक्तांगण (Day Care Centre + Classes)*👩‍👩‍👧‍👦

 

*Advt Link👇*

————————————————–

📝 *प्रवेश सुरु!* *प्रवेश सुरु!*📝

 

👩‍👩‍👧‍👦 *मुक्तांगण ( Day Care Centre + Classes)*👩‍👩‍👧‍👦

 

👉 Ju Kg ते आठवी वर्षांपर्यंतच्या मुलांसाठी जेवण 🍛व क्लासची एकत्रित सुविधा 📚👩🏻‍💻

 

(होमवर्क तसेच Grammer इत्यादीचा परिपूर्ण अभ्यासक्रम समाविष्ट)📑

 

👉 TV, Mobile यापासून दूर ठेऊन मुलाच्या सर्वांगीण विकासासाठी अग्रेशीत

 

⏰ *वेळ: सकाळी 10 ते 5:30 पर्यंत*

 

👉 (मिलाग्रीस हायस्कूल मधील मुलांना पिकअप करण्याची सोय आहे)

 

*पत्ता:* बाबा फर्नांडिस F – 122, बांदेकर मेस समोर, मिलाग्रीस हायस्कूल नजिक, सालईवाडा, सावंतवाडी

 

📱 *संपर्क:*

सौ.सरोज राऊळ मो.नं: 8983757132

सौ.सुरेखा बोंद्रे मो. नं: 8975257453

————————————————–

_संवाद मीडिया जगभर घडणाऱ्या घडामोडींचा ताजा व निष्पक्ष वृतांत आपल्यासाठी दिवसभर प्रसारीत करते. साइटवर बातमी प्रसारीत झाल्याबरोबर सूचना मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटवर “सूचना (notifications)” ला परवानगी द्या. आम्ही कायम आपल्याला अपडेटेड ठेवू!_

——————————————————-

*वेबसाईट :*

www.sanwadmedia.com

——————————————————-

*फेसबुक पेज :* https://www.facebook.com/snvadmedia

——————————————————-

*इन्स्टाग्राम पेज :*

https://www.instagram.com/sanvadmedia

——————————————————-

*ट्विटर :* https://twitter.com/@mediasanwad

——————————————————

*चॅनेल :* https://www.youtube.com/c/sanvadmedia

——————————————————

📰 *व्हॉट्सऍप* 👇🏻

https://chat.whatsapp.com/BiRiAdzopHTFNHNh3QcKvJ

—————————————————–

*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क : *8356929616*

प्रतिक्रिया व्यक्त करा