देवगड:
देवगड येथे सिंधुदुर्गातील सर्वात मोठे इमिटेशन ज्वेलरीचे दालन होत असून यासाठी कणकवली विधानसभा मतदारसंघाचे आमदार नितेश राणे उपस्थित राहणार आहेत.
आमदार नितेश राणे यांच्या हस्ते श्री इमिटेशन ज्वेलरी या दुकानाचा शुभारंभ होणार आहे. यावेळी देवगड जामसांडे नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा श्रीमती साक्षी प्रभू, माजी आमदार अजित गोगटे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. संजय सोमण यांनी देवगड मध्ये पहिले सराफी दुकान श्री महालक्ष्मी ज्वेलर्स सुरू केले. त्यांच्या पत्नी स्वाती सोमण यांनी श्री इमिटेशन ज्वेलरी च्या निमित्ताने त्यांच्या बरोबरीने उद्योगात पाऊल टाकले आहे. हा शुभारंभ उद्या रविवार दुपारी साडेबारा वाजता देवगड कॉलेज नाका येथे होणार आहे. या कार्यक्रमासाठी सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन श्री संजय सोमण व त्यांच्या पत्नी स्वाती सोमण यांनी केले आहे