बंदर जेटी येथे लाईट शो प्रकल्पाला मान्यता द्या
पर्यटन व्यावसायिक महासंघाची मागणी: अध्यक्ष विष्णू मोंडकर यांचे पर्यटन विभागाला निवेदन
मालवण
मालवण बंदर जेटी येथे प्रस्तावित लाईट शो प्रकल्पाला मान्यता द्यावी, अशा मागणीचे निवेदन कोकण पर्यटन व्यावसायिक महासंघाचे अध्यक्ष विष्णू उर्फ बाबा मोंडकर यांनी महाराष्ट्र पर्यटन संचालनालयाचे संचालक बी. एन. पाटील यांना दिले आहे.
मालवण बंदर जेटी येथे लाईट शो प्रस्तावित आहे. ४ डिसेंबर रोजी नौदलाचा नौसेना दिन किल्ले सिंधुदुर्ग येथे साजरा होत आहे. या कार्यक्रमास राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह महनीय व्यक्ती उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे कोकण पर्यटनात मोठा फरक पडणार आहे. म्हणूनच या कार्यक्रमापूर्वी प्रस्तावित लाईट शो प्राधान्य देऊन पूर्ण करावा, असे विष्णू मोंडकर यांनी निवेदनात म्हटले आहे.