You are currently viewing एका वर्षाच्या आत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तालुक्यातील एक नंबरचा पक्ष करणार….

एका वर्षाच्या आत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तालुक्यातील एक नंबरचा पक्ष करणार….

नवनिर्वाचित तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांनी व्यक्त केला विश्वास

सावंतवाडी
राष्ट्रवादी काँग्रेस चे व्यापार व उद्योग विभागाचे जिल्हाध्यक्ष पुंडलिक दळवी यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या सावंतवाडी तालुकाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आल्या नंतर आज आयोजित कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्या हस्ते त्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले. यावेळी मोठ्या प्रमाणात पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी नवनिर्वाचित राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी म्हणाले की, सावंतवाडी तालुक्यातील जुन्या कार्यकर्त्यांना पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यात सक्रिय करणार असून त्यांना पुन्हा प्रवाहात आणणार आहे असे मत व्यक्त केले तसेच तालुक्यातील युवकांचे प्रश्न सोडवण्यासाठी काम करणार असून युवकांना पक्षात सामील करण्यासाठी आपले प्रयत्न असणार असल्याचे देखील त्यानी यावेळी सांगितले आहे. येणाऱ्या निवडणुका मध्ये देखील आपण जास्त उमेदवार निवडून आणण्यासाठी कामाला लागून जास्त उमेदवार निवडून आणू असा विश्वास देखील त्यानी यावेळी व्यक्त केला आहे. एका वर्षाच्या आतच राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाला गतवैभव प्राप्त करून देणार असून, एक नंबरचा पक्ष करणार असल्याचा विश्वास त्यांनी आयोजित कार्यक्रमात केला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा