मराठा समाजाकडून बांद्यात भव्य बाईक रॅली…
लाठी हल्लाचा केला निषेध ; मोठ्या संख्येने मराठा बांधव सहभागी
बांदा
जालना जिल्ह्यातील सकल मराठा आंदोलकांवर पोलिसांनी केलेल्या बेछूट लाठी हल्ल्याचा निषेध करण्यासाठी आज बांदा येते सकल मराठा बंधू-भगिनींनी भव्य बाईक रॅली काढली. यामध्ये शेकडो मराठा समाजाचे कार्यकर्ते सामील झाले होते. सकाळी अकरा वाजता बांदेश्वर मंदिर येथून ही बाईक रॅली निघाली. शहरातील मोर्येवाडा, तेली तिठा, उभा बाजार, गांधी चौक येथून छत्रपती शिवाजी महाराज चौक, एसटी स्टँड मार्गे गडगेवाडी येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ या रॅलीचा समारोप करण्यात आला.
जालना जिल्ह्यातील सरोटे गावात मराठ्यांना आरक्षण मिळण्यासाठी उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील व मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीहल्ल्याचा निषेध यावेळी मराठा महासंघाचे अध्यक्ष राजाराम उर्फ बाळू सावंत यांनी केला. संपूर्ण मराठा समाज हा जरांगे पाटील यांच्या पाठीशी उभा आहे. आम्ही प्रत्येक गावागावातून या घटनेचा निषेध करत आहोत. मराठा समाजाची किंमत आणि हिम्मत आम्ही मराठ्यांवर लाठीहल्ला करून रक्त सांडणाऱ्यांना दाखवून देऊ, असे बाळू सावंत यावेळी म्हणाले.
मराठा समाजाचे सचिव म. गो. सावंत यांनी यावेळी बोलताना, राज्यकर्त्यांनी त्वरित निर्णय घेऊन व विषेश अधिवेशन बोलून मराठा आरक्षणासाठी ठराव पास करावा. त्याचप्रमाणे मराठा आरक्षणाचा शासन निर्णय त्वरित काढून, मराठा समाजाला न्याय द्यावा अशी मागणी यावेळी केली.
या बाईक रॅलीमध्ये राजाराम उर्फ बाळू सावंत, माजी अध्यक्ष निलेश मोरजकर, ज्ञानेश्वर सावंत, गुरु सावंत, स्वप्निल सावंत, विराज परब, साई सावंत, मिलिंद सावंत, जयवंत राणे, विहान राणे, परिमल सावंत, सागर सावंत, मकरंद तोरस्कर, राकेश परब, मयूर चराटकर, दीपक सावंत, संतोष नांदगावकर, सचिन आईर, राजन सावंत, राजा मोर्ये, सर्वेश मोर्ये, निलेश पटेकर, जय पटेकर, शामसुंदर धुरी, रत्नाकर आगलावे, श्याम सावंत, अमेय गवस, जयेश सावंत, प्रथमेश पडवळ, राजू देसाई, श्रीधर सावंत, घनश्याम सावंत, संदेश महाले, महेश मोर्ये, अमेय गवस, हेमंत दाभोलकर, संदेश शेगडे, गणेश सावंत, यश माधव, उर्मिला मोर्ये, जय सावंत, अशोक परब, विनेश गवस, सुचिता धुरी, नितीन राऊळ, अल्पिता गाड, विनिता रायकर, सौ. अर्चना सावंत, शिल्पा सावंत, आकाश देसाई, लक्ष्मी गोविंद सावंत, राखी कळंगुटकर, माधवी गाड, लक्ष्मी सावंत, रेश्मा सावंत यांच्यासह वाफोली, डिंगणे, शेर्ले, इन्सुली व परिसरातील बहुसंख्य मराठा बांधव या बाइक रॅलीमध्ये सहभागी झाले होते.