You are currently viewing राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करून दाखवाच….

राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करून दाखवाच….

जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांचे विरोधकांना जाहिर आवाहन

सावंतवाडी
राष्ट्रवादी काँग्रेस हा शरद पवार यांचा पक्ष आहे. शरद पवारांनी अनेकांना मोठे केले. मात्र त्यांनी पवारांची साथ सोडली. कोणीही पक्ष सोडून गेले म्हणून संघटना संपणार नाही. जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद वाढत असल्याने भाजपचा पोटशूळ उठला आहे. म्हणूनच पोलीस केसेस करण्याचा व नाहक त्रास देण्याचं ठरवलं जातंय. परंतु राष्ट्रवादीच्या एका तरी कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करून दाखवाच असं थेट आव्हान आज राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी दिलं.

शिल्पग्राम येथे आयोजित राष्ट्रवादीच्या कार्यक्रमात अमित सामंत बोलत होते. यावेळी नवनिर्वाचित तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांना अमित सामंत यांच्याहस्ते नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.

यावेळी प्रांतिक सदस्य काका कुडाळकर ज्येष्ठ नेते शिवाजीराव कुबल, अविनाश चमणकर, सत्यजित धारणकर, दीपक कदम आदी पदाधिकारी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा