निलेश राणेंच्या माध्यमातून कुडाळात “मंगळागौर” स्पर्धेचे आयोजन…
२१ हजाराचे पहिले बक्षीस; कुडाळ-मालवणातील ९ संघ सहभागी होणार…
कुडाळ
भाजप युवा नेते निलेश राणे यांच्या माध्यमातून १० सप्टेंबरला सायंकाळी ४ वाजता कुडाळ येथे मंगळागौर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचे प्रथम पारितोषिक २१ हजार, द्वितीय पारितोषिक १५ हजार तर तृतीय पारितोषिक १० हजार असणार आहे. याबाबतची माहिती आज येथे आयोजित पत्रकार परिषदेत भाजपच्या महिला जिल्हाध्यक्ष संध्या तेरसे यांनी दिली. या स्पर्धेचे उद्घाटन नीलम राणे यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून रवींद्र चव्हाण, निलेश राणे व भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत उपस्थित राहणार आहेत, असे त्यांनी सांगितले. आज येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.
यावेळी भाजप कुडाळ तालुका अध्यक्षा आरती पाटील, पिंगुळी शहर अध्यक्षा साधना माडये, जिल्हा सरचिटणीस रेखा काणेकर, जिल्हा कार्यकारिणी सदस्य अदिती सावंत, कुडाळ शहर सरचिटणीस अक्षता कुडाळकर, शहर उपाध्यक्षा विशाखा कुलकर्णी, जिल्हा कार्यकारिणी सदस्य साक्षी सावंत आणि कार्यक्रमप्रमुख प्रज्ञा राणे आदी उपस्थित होत्या

या स्पर्धेसाठी प्रथम क्रमांक २१ हजार रु. आणि चषक, द्वितीय क्रमांक १५ हजार रु. आणि चषक, तृतीय क्रमांक १० हजार रुपये आणि चषक, तसेच उत्तेजनार्थ २ संघांना प्रत्येकी ३ हजार रुपये आणि चषक देऊन गौरविण्यात येणार आहे. तसेच उर्वरित संघांना मानधन आणि प्रमाणपत्र देण्यात येईल. यावेळी लकी ड्रॉ, प्रश्नमंजुषा कार्यक्रम सुद्धा होणार आहेत. या मंगळागौर स्पर्धेसाठी कुडाळ-मालवण मतदारसंघातून ९ संघ निवड करण्यात आले आहेत. यामध्ये सखी फुगडी संघ पावशी, भैरव-जोगेश्वरी संघ कुडाळ, एकता महिला संघ तेंडोली, नवदुर्गा महिला संघ कुडाळ, धनलक्ष्मी आकेरी संघ, सिद्धी गणपती कवीलकट्टे, कुडाळेश्वर महिला संघ कुडाळ आणि भीमगर्जना संघ पाट यांचा समावेश आहे, असे तेरसे यांनी सांगितले.
*संवाद मिडिया*
*सुवर्ण संधी!सुवर्ण संधी!!फिजियोथेरेपी डॉक्टर होण्याची सुवर्ण संधी!!!*
*बॅचलर ऑफ फिजियोथेरेपी(B.P.Th)* करण्याची सुवर्णसंधी.
Affiliated to MUHS,Nashik,DMER व महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त कॉलेज मध्ये
*प्रवेश सुरु -शैक्षणिक वर्ष 2023-2024*
*श्री रामराजे कॉलेज ऑफ फिजियोथेरेपी , दापोली.*
*COLLEGE CODE-6191*
*बॅचलर ऑफ फिजियोथेरेपी(B.P.Th)*
Eligibility- 12th Science (PCB)With NEET and Must Registered with CET Cell can apply.
• Duration : 4.5 Years
*👉मागासवर्गीय विद्यार्थांना शिष्यवृत्ती.(शासन नियमानुसार).*
*पत्ता:*
प्रांत ऑफिस जवळ,दापोली, ता. दापोली, जिल्हा रत्नागिरी, 415712
*संपर्क:*
📲 9145623747/ 9420156771/7887561247*
*जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/107166/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*