You are currently viewing मसुरे केंद्र शाळा येथे शिक्षक दिन अनोख्या उपक्रमातून साजरा

मसुरे केंद्र शाळा येथे शिक्षक दिन अनोख्या उपक्रमातून साजरा

मुख्याध्यापिका शर्वरी सावंत यांचा आणखीन एक अनोखा उपक्रम…..

मसुरे :

 

5 सप्टेंबर माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतनिमित्त केंद्र शाळा मसुरे नं.1 मध्ये शिक्षक दिन मोठ्या दिमाखात साजरा करण्यात आला व याचे औचित्य साधून विद्यार्थ्यांनी आवडीने सहभाग घेतला.

शुभम शेडगे , श्रेया मगर, समर्थ दुखंडे , आयुष दुखंडे, सुरज मसुरकर, चैतन्य भोगले, दर्शित पेडणेकर, नेहा शिंगरे, सांजवी जाधव, स्नेहा जाधव, रिया भोगले, यशस्वी कतवणकर, मानसी दीपक पेडणेकर, मोक्षदा कतवणकर, कोमल सावंत , आर्यन परब, यश बागवे, आर्यन चव्हाण अतिशय सुंदर पध्दतीने वर्गावर अध्यापन करुन शिक्षक होण्याचा प्रत्यक्ष अनुभव घेतला .विद्यार्थ्यांसाठी हा एक वेगळा अनुभव होता.. शा.व्य.स..अध्यक्षा सौ,शितल शैलेश मसुरकर,उपाध्यक्ष श्री,.संतोष दुखंडे,माजी अध्यक्ष तथा तरुण भारत चे पत्रकार श्री. दत्तप्रसाद पेडणेकर, श्री.सन्मेश मसुरेकर, मसुरे माजी सरपंच सौ.लक्ष्मी पेडणेकर , ग्रामपंचायत सदस्या सौ.भक्ती भोगले, सौ. ज्योती पेडणेकर, केंद्रशाळा मसुरे नंबर .१.चे केंद्रप्रमुख श्री.नारायण देशमुख ,,मुख्याध्यापिका सौ,शर्वरी सावंत,श्री,विनोद सातार्डेकर .श्री.गोपाळ गावडे श्री.प्रसाद कदम, सौ,रामेश्वरी मगर , शिफा शेख यांनी या कार्यक्रमाचे भरभरुन कौतुक केले . चैतन्य भोगले, यश बागवे, मोक्षदा कतवणकर, श्रेया मगर,नेहा शिंगरे, यशस्वी कातवणकर, आर्यन चव्हान या विद्यार्थ्यांनी शिक्षक दिन हा आमच्यासाठी कसा मजेशीर असतो याविषयी आपले अनुभव देखील मनोगतातून व्यक्त केले. इयत्ता,तिसरीतील मिहिर मसुरकर क्रिशा दुखंडे,अरुंधती चव्हाण, आरुषी चव्हाण,लतिफा शेख,समर्थ दुखंडे, जयश्री यांनी अतिशय सुंदर कविता शिक्षक दिनावर साजरी केली. या वेळी बोलताना मुख्याध्यापिका शर्वरी सावंत म्हणाल्या

शिक्षक हेच भावी पिढीचे शिल्पकार आहेत. शिक्षण हाच खरा विकासाचा मंत्र आहे. शिक्षक हेच समाज परिवर्तनाचे माध्यम आहे. यामध्ये शिक्षकांची भूमिका फार मोलाची आहे. ज्याप्रमाणे माळी झाडांची काटछाट करून त्याला सुंदर बनवतो. त्याचप्रमाणे शिक्षकही आपल्या विद्यार्थ्यांचे दुर्गुण दूर करून त्यांच्यात सदगुणांचा विकास घडवून आणतात. अतिशय उत्साह पूर्ण वातावरणात विविध शैक्षणिक उपक्रमातून शिक्षक दिन कार्यक्रम पार पडला.

प्रतिक्रिया व्यक्त करा