मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) :
विनामुल्य मोतीबिंदू शस्त्रक्रियेद्वारे दृष्टीदानाचे देशातील आदर्श उदाहरण ठरावं असं काम सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा क्षेत्रात अग्रेसर राहून सातत्याने काम करणारी अग्रगण्य संस्था ‘आशिर्वाद चॅरीटेबल ट्रस्ट’ यांच्याकडून करण्यात येत आहे. गिरणगावातील ह्या संस्थेसाठी मुंबईतील प्रथितयश नेत्रतज्ज्ञ डॉ. अमित खेडेकर यांनी शस्त्रक्रिया केल्या. आजवर डॉ. खेडेकर यांनी शेकडो शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पाडल्या आहेत आणि शेकडो रुग्णांना दृष्टी प्रदान केली आहे. सदर शस्त्रक्रियेचा विभागातील अनेक गरीब आणि गरजू रुग्णांनी लाभ घेतला.
आशिर्वाद चॅरिटेबल ट्रस्टतर्फे दरवर्षी आरोग्य शिबिर, रक्तदान, गरीब गरजू रुग्णांना सहाय्य तसेच सार्वजनिक रुग्णालयातही मदत दिली जाते. व्हिलचेअर्स, मास्क, पीपीई किट्स, सॅनिटाझर्स इत्यादी साहित्याचे वाटप करण्यात येते. याचवर्षी केईएम रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांच्या सेवेसाठी रुग्णवाहिकेचे लोकार्पण करण्यात आले. त्याप्रसंगी डॉ. प्रवीण बांगर हेमंत, जाधव, शरद शृंगारे, ऍड. बिना शहा आदी मान्यवर उपस्थित होते. या प्रकल्पाचे सहाय्यक संजय देवळकर आहेत. मोतीबिंदू शस्त्रक्रिया उपक्रमाद्वारे संस्थेने रुग्णसेवेत एक पाऊल पुढे टाकलं आहे.
शस्त्रक्रिया उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी आशिर्वाद चॅरीटेबल ट्रस्टचे अध्यक्ष उमेश येवले, सचिव हेन्री लोबो, खजिनदार चंद्रकांत आयरे यांनी अथक परिश्रम घेतले.