You are currently viewing कुडाळ येथे मोठ्या दिमाखात रंगणार दहीहंडी उत्सव

कुडाळ येथे मोठ्या दिमाखात रंगणार दहीहंडी उत्सव

दादा साहिल यांची माहिती; उत्सवाला सिनेकलाकारांची उपस्थिती

 

कुडाळ / प्रतिनिधी :

भाजप नेते तथा माजी खासदार निलेश राणे यांच्या माध्यमातून येत्या शुक्रवार, ८ सप्टेंबर २०२३ रोजी कोकणातील सर्वात मोठा दहीहंडी उत्सव कुडाळ नवीन एसटी स्टँडच्या मैदानावर मोठ्या दिमाखात रंगणार आहे. या दहीहंडी उत्सवासाठी मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधदुर्ग जिल्ह्यातील पथके दाखल होणार असल्याची माहिती भाजप कुडाळ तालुकाध्यक्ष दादा साईल यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी विजेता संघाला ५,५५,५५५ असे बक्षीस असेल तर या दहीहंडी उत्सवाचा खास आकर्षण म्हणून सिने अभिनेत्री प्राजक्ता माळी, सिने अभिनेत्री मानसी नाईक, प्रसिद्ध विनोदी अभिनेता भाऊ कदम, प्रसिद्ध अभिनेता देवदत्त नागे हेही उपस्थित राहणार आहेत. या व्यतिरिक्त प्रसिद्ध बॉलीवूड गायक आणि संगीत दिग्दर्शक सचिन गुप्ता आणि त्यांचे सहकलाकार यांचा लाईव्ह संगीत शो आणि प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्री रीवा अरोरा सुद्धा कुडाळमध्ये दहीहंडी उत्सवाला उपस्थित राहणार आहे

शुक्रवार ८ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजल्यापासून कुडाळ नवीन एसटी बस स्टँडच्या मैदानावर हा उत्सव रंगणार असून यामध्ये लेझर शो मुख्य आकर्षण ठरणार आहे

तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी “मेरी माटी, मेरा देश” ही संकल्पना दहीहंडी उत्सवात असेल यामध्ये प्रत्येक बूथ मधून प्रत्येकी एक कलश माती आणून कुडाळ एसटी मैदानावर मोठ्या कलशात एकत्र करण्यात येईल हा मोठा कलश प्रथम राज्यात आणि नंतर दिल्लीत जाईल अशी माहिती दादासाहेब यांनी दिली

आतापर्यंत या दहीहंडी उत्सवासाठी 26 पथकांची नोंदणी झाली असून मुंबई, ठाणे, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग या जिल्हा मधून गोविंदापथके सहभागी होणार आहेत. उद्या नाव नोंदणीची शेवटची तारीख असून अजून ज्यांना नाव नोंदणी करायचे आहे त्यांनी संदीप कांबळे यांच्याशी संपर्क साधावा.

प्रतिक्रिया व्यक्त करा