You are currently viewing संदीप सावंत राज्यस्तरीय”काव्यभूषण गौरव” पुरस्काराने सन्मानित …

संदीप सावंत राज्यस्तरीय”काव्यभूषण गौरव” पुरस्काराने सन्मानित …

युवा कवी व साहित्यिक श्री. संदीप सुरेश सावंत गाव तळेखोल यांना भजन सम्राट तथा समाजभूषण स्वर्गीय ह.भ.प.विठोबा अ.मरवडे सामाजिक पप्रतिष्ठान, रायगडचा राज्यस्तरीय”काव्यभूषण गौरव” -२०२०पुरस्कार नुकताच प्राप्त झाला.
भजन सम्राट तथा समाजभूषण स्वर्गीय ह.भ.प.विठोबा अ.मरवडे यांच्या सहाव्या स्म्रुती दिनानिमित्त स्व.विठोबा अ.मरवडे सामाजिक प्रतिष्ठान यांच्या वतीने गेल्या पाच वर्षांची यशस्वी परंपरा राखत याही वर्षी नवोदित कवी/कवयित्री यांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्यस्तरीय काव्यभूषण पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या वर्षाच्या कोरोना महामारीचे पार्श्वभूमीवर यंदाचा सोहळा हा आँनलाईन पद्धतीने संपन्न करण्यात आला.
या पुरस्कारासाठी सावंत यांच्या वेदना अंतरीची या स्वरचित कवितेची सर्वोत्तम काव्यरचना म्हणून निवड करण्यात आली.
त्यांना आकर्षक ऑनलाईन सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. या यशाबद्दल त्यांचे सर्व स्तरावरून अभिनंदन होत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

twelve + 6 =