You are currently viewing झुळूक

झुळूक

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्य ज्येष्ठ लेखिका कवयित्री डॉक्टर शैलजा करोडे लिखित अप्रतिम कथा*

 

 

*झुळूक*

—————————

 

नागपूर स्टेशनवरील सगळ्याच प्लॅटफाॅर्मवर खचाखच गर्दी होती . प्लेटफाॅर्मवर चालायलाही रस्ता मिळत नव्हता . एस्कूज मी , साईड प्लिज , म्हणत आम्ही मार्गक्रमण करीत होतो .चार नंबर प्लेटफार्मवर नागपूर दादर सेवाग्राम एक्सप्रेस 8.30 वाजता होती .गाडी अर्धातास आधीच फलाटावर लागत असल्याने सगळे कसे तयारीतच होते . त्यातच कूली , गाडी यार्डातून फलाटावर येण्यापूर्वीच जागा अडवून बसलेले .मग प्रवाशांकडून पैसे घेऊन ते सीट पुरवत होते . सगळाच संतापजनक प्रकार . पण अगतिक प्रवासी पैसे देऊन सीट घेत होते . लांबचा प्रवास , निदान बसायला मिळाले हे ही नसे थोडके म्हणून समाधानी , मनाची समजूत घालत होते .

एस 7 स्लिपर कोचमध्ये माझे आरक्षण होते . ते ही लवकर मिळत नव्हते .एक आठवड्याचे ट्रेनिंग आटोपून मी आज परतीच्या प्रवासाला लागले होते . आमच्या ट्रेनिंग सेंटरमधूनच आरक्षणाची व्यवस्था करुन दिलेली होती .डिसेंबर महिना , विधानसभेचे हिवाळी अधिवेशन आजच संपलेले . गाडीला भरपूर गर्दी ,अगदी स्लिपर कोचही जनरल बोगीसारखे झाले होते .टी. सी . कडे तक्रार करुनही उपयोग नव्हता .ते ही हतबल होते . प्रवासी ऐकूनही घेत नव्हते . प्रत्येकाचीच धडपड होती आपल्या इच्छितस्थळी पोहोचण्याची कोणत्याही परिस्थितीत .सुदैवाने माझेसोबत ट्रेनींग सेंटरमधील केअर टेकर अंकल आंटीसह होते . आणि त्यामुळेच मी निर्धास्त होते .पेंगुळलेली मी केव्हाच आंटीच्या खांद्यावर मान ठेवून निद्रेच्या आधीन झाले होते .एवढ्या गर्दीमुळे घुसमटताही वाढलेली . गाडी सुरू झाली तशी खिडकीतून येणारी थंड हवेची झुळूक कशी मनमोहक वाटत होती . आणि सोबतीला केअर टेकर अंकल ,आँटी असल्यानेच मी निर्धास्त होते .मायेची ही झुळूकचं मला निद्रादेवीच्या आधीन करीत होती .

 

रेल्वे प्रवास आरक्षण असले कि सुखकर होतो , पण आरक्षण नसते , किंवा वेटींगवर असते तेव्हा मात्र तो प्रवास तापदायकच ठरतो .आणि जेव्हा आपले आरक्षण असूनही इतर प्रवासी आपल्या जागेवर अतिक्रमण करतात , कब्जा मिळवतात तो प्रकार , तो अनुभव त्रासदायक ठरतो .मुंबईला मी व माझे बंधुराज जात होतो . पण आमच्या दोन्ही बर्थवर पंजाबी फॅमिलीने ताबा मिळवलेला . त्यांना उठा सांगितले तर ते ऐकूनही घेत नव्हते . ” अहो , माझे आरक्षण आहे मला बसू द्या ” ” ए कि गल है , होगा तेरा आरक्षण . तेरे आनेसे पहलेसे हम सीटपर बैठे है , नही छोड सकते सीट ,छोटे बच्चे है हमारे साथ ” टी सी ला सांगितले . त्याचेही ऐकून घेतले नाही .शेवटी आमच्या दोन बर्थपैकी एक बर्थ त्यांनी पटकावलाच .

 

जळगावहून चेन्नईचा माझा प्रवासही असा आनंददायी , दक्षिण भारत यात्रेला आम्ही निघालेलो .जवळ जवळ 29 तासांचा प्रवास . आमच्या आरक्षित स्लिपर कोचमध्येही काही अनारक्षित प्रवासी घुसायचेच. अशीच एक तमिळ महिला आमच्या जवळ विसावली .आम्ही मराठी ती तामिळ , पण तरीही आई आणि ती संवादात कमी पडली नाही .

आईला ती म्हणाली कि ” तीर्थयात्रेला निघालीस काय ?

मी माहेरी जातेय .सुंडरू माझे गाव .गाडीतून उतरतांना “तुझा प्रवास सुखाचा होवो ” च्या शुभेच्छा देऊन गेली .भाषेचा अडसर इथे गौण ठरला

 

अलाहाहाबाद , बनारस यात्रा आटोपून आम्ही बनारसहून परतीच्या प्रवासाला लागलो . यात्रा कंपनीतील इतर प्रवासी पुढे जगन्नाथ पुरीसाठी निघून गेले . मी व मुंबईचे एक काका काकू आम्ही मात्र आठ दिवसाच्याच यात्रेचे बुकिंग असल्याने यात्रा कंपनीने आमचे रेल्वेचे आरक्षण केले होते व सोबत यात्रा कंपनीचा माणूस होता . जानेवारी महिना , कडाक्याची थंडी , त्यातून रात्रीची वेळ , कारण मुघलसरायहुन पहाटे चार वाजताची गाडी होती . वाराणसीतून मुघलसरायला येण्यासाठी आॅटोरिक्षाने पाऊणतासाचा रस्ता जवळजवळ अठरा किलोमीटरचा . पण रात्रींची वेळ जानेवारी महिन्यातील थंडी ,  त्यातच गंगा नदीच्या पुलावरून गाडी जातांना थंडीने तर उच्चांक गाठलेला . जणू कुल्फीप्रमाणे शरीर गोठते कि काय क्षणभर वाटून गेले .धुक्यामुळे रिक्षावाल्याला रस्ताही दिसणे कठीण , रस्याने जाणार्‍या गाड्यांचे लाईटातच एकामागोमाग एक वाहने प्रवास करीत होती .

मुघलसरायला गाडी जवळजवळ पाच वाजेला आली .आम्ही आमच्या सीटवर विसावलो व थोडे रिलॅक्स झालो . गाडीतील इतर सह प्रवासी ही साखर झोपेतच होते , स्वेटर , ब्लंकेट तर सोडाच काहीतर अगदी दुलई पांघरून विसावलेले .गाडी सुरु झाली . पहाट झालेलीच होती .मी दात ब्रश करण्यासाठी वाॅश बेसिनकडे निघाले , वाॅश बेसिन , दोन्ही शौचालयांमधील पॅसेज , दरवाज्याजवळचा पॅसेज भिकार्‍यांनी व अनारक्षितांनी अडवलेला . हे सगळे अडथळे पार करून आपले काम साधणे म्हणजे आँलिंपिकमधली अडथळ्यांची शर्यत पार केल्यासारखे मला वाटले .दिवस उजाडला तशी कोचमधील प्रवासीही उठले , कोणी अजूनही झोपलेले .चहा , काॅफी विकणार्‍यांची वर्दळ वाढलेली .माझ्या समोरची फॅमिली भोपाळला जाणारी , पती पत्नी व दोन मुले एक मुलगा , एक मुलगी , चौकोनी कुटुंब . फिरायला निघालेले मुलांच्या उन्हाळी सुटीत. बाईचं माहेर भोपाळ आणि सासर कानपूर .

 

” आप कहासे आ रही है बहनजी ” ” जी मै यात्रापर गयी थी भाईसाब ” त्यांना मी प्रसाद ही दिला ” ” तो, एक साॅफ्टवेअर इंजिनियर होता आणि पत्नी ज्युनियर काॅलेजला प्राध्यापिका होती .

 

आम्ही सोबतच काॅफी प्यायलो . ” आप क्या करती हो दीदी ” ” मै पंजाब नैशनल बैंक मे डेप्युटी मॅनेजर हूॅ । मग बैंक ची कर्ज पालिसी , सरकारचा हस्तक्षेप , वरिष्ठांचे दबाव ,यातूनच घडणारे मोठमोठे आर्थिक घोटाळे व त्यात भरडला जाणारा स्टाफ . बर्‍याच गप्पा रंगल्या .एकमेकांच्या फोन नंबर व पत्त्यांची देवाण घेवाण ,एक आपलेपणा निर्माण झाला .

अशा या प्रत्येक रेल्वे प्रवासात मला मनाला गारवा देणार्‍या झुळूकीसारखी माणसे आयुष्यात भेटली व जीवन सुंदर आहेचा अनुभव देऊन गेलीत . आयुष्यात असे हे गार झुळूकीसारखे क्षण तर आम्हांला नवनवीन ऊर्जा देत राहतात. मनाला प्रसन्नता देत राहतात.

—————————————————————

डाॅ. शैलजा करोडे ©®

नेरूळ नवी मुंबई

मो.9764808391

—————————————————————–

 

*संवाद मिडिया*

 

*आतुरता गणपती बाप्पाच्या आगमनाची – ओंकार ट्रेडर्स*

 

*लिंक वर क्लिक करा 👇*

————————————————–

*आतुरता गणपती बाप्पाच्या आगमनाची…*🙏🏻😇

 

*सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकमेव☝️ ठिकाण जिथे गणपतीसाठी लागणारे सर्वकाही मिळेल एका छताखाली 😇 तेही अगदी माफक दरात..*

 

🌐 https://sanwadmedia.com/105547

 

🎨 *ओंकार ट्रेडर्स*📿

 

👉 जिल्ह्यातील होलसेलर आणि रिटेलर शॉप

 

👉 गणपतीसाठी लागणारे सर्व प्रकारचे रंग 🎨, ज्वेलरी👑📿, ब्रश🖌️, कॉम्प्रेसर, क्ले टूल्स, इतरही सर्व साहित्य होलसेल दरात मिळतील.😇

 

👉 शाडू माती व प्लास्टर(POP) मिळेल.

 

🎴 *ओंकार ट्रेडर्स*

*माणगाव तिठा, ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग*

 

*प्रो. प्रा. श्रीम. योगिता तामाणेकर*

 

☎️ *संपर्क :* ०२३६२ – २३६२६१

📱 *मो.९४२३३०४७९६,* *७७७४९००५०१,* *९४२१२६१०८९,* *९८३४३४३५४९*

 

————————————————–

_संवाद मीडिया जगभर घडणाऱ्या घडामोडींचा ताजा व निष्पक्ष वृतांत आपल्यासाठी दिवसभर प्रसारीत करते. साइटवर बातमी प्रसारीत झाल्याबरोबर सूचना मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटवर “सूचना (notifications)” ला परवानगी द्या. आम्ही कायम आपल्याला अपडेटेड ठेवू!_

——————————————————-

*वेबसाईट :*

www.sanwadmedia.com

——————————————————-

*फेसबुक पेज :* https://www.facebook.com/snvadmedia

——————————————————-

*इन्स्टाग्राम पेज :*

https://www.instagram.com/sanvadmedia

——————————————————-

*ट्विटर :* https://twitter.com/@mediasanwad

——————————————————

*चॅनेल :* https://www.youtube.com/c/sanvadmedia

——————————————————

📰 *व्हॉट्सऍप* 👇🏻

https://chat.whatsapp.com/BiRiAdzopHTFNHNh3QcKvJ

—————————————————–

*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क : *8356929616*

प्रतिक्रिया व्यक्त करा