जालना येथील मराठा समाजावरील लाठीचार्ज प्रकरणाचा वेंगुर्ले येथे निषेध; पोलिसांना निवेदन सादर
चौकशी करुन केली कारवाईची मागणी
वेंगुर्ले
जालना येथील मराठा समाजावरील लाठीचार्ज प्रकरणाचा आम्ही निषेध व्यक्त करतो. मात्र प्रकरणातुन विरोधी पक्षातील विरोधक केवळ राजकारण करण्याचा कुटील प्रयत्न करीत असुन जाणीवपुर्वक मुख्यमंत्री व दोनही उपमुख्यमंत्री यांची बदनामी करीत आहेत. तसेच गोरगरीब यान आवश्यक असलेल्या मराठा आरक्षण या प्रकरणाची ढाल करुन विरोधी पक्षातील नेते तसेच कार्यकर्ते राजकारण करीत आहेत. त्याची सखोल चौकशी करुन कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी वेंगुर्ले मराठा समाजाच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन आज वेंगुर्ले पोलिस ठाण्यात दिले.
सहाय्यक पोलिस निरीक्षक विद्या जाधव यानी हे निवेदन स्विकारले. यावेळी मराठा समाजाचे प्रसन्ना देसाई, रामकृष्ण सावंत, बिटू गावडे, उदय गावडे, सुनिल धोंडू धाग, सत्यवान परब, दिलीप परब, नारायण गावडे, सत्यविजय गावडे, किशोर परब, श्रीकृष्ण परब, मयुरेश शिरोडकर, महादेव गावड़े, दयानंद येरेम, बालकृष्ण येरम, नारायण गावडे, समिर गोसावी, निलेश गवस, विष्णु परब, बंड्या पाटिल, रमेश राणे, शितल आंगचेकर, सोमा मेस्त्री, प्रितम सावंत, गोविंद नाईक, संतोष गावडे, सूर्यकांत परब, सुजाता देसाई, तातोबा पालयेकर, गुरुनाथ घाडी, राहुल गावड़े, रामसिंग राणे, विजय नाईक, प्रीतम सावंत, प्रकाश गावड़े, जगन्नाथ राणे, सूर्यकांत परब यांच्या सह समाज बांधव यावेळी उपस्थित होते.

महाराष्ट्रातील मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून गेली अनेक वर्षे महाराष्ट्रातील मराठा समाज विविध आंदोलनाच्या माध्यमातून आपल्या मागणीकडे शासनाचे लक्ष वेधून घेत आहे.यापुर्वी मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्र भर अनेक मोर्चाने आयोजन करण्यात आले होते. तरीही मराठा आरक्षणाबाबत शासनाकडून कोणतीही ठाम भूमिका व निर्णय झालेला नसल्याने समाजामध्ये मोठ्या प्रमाणात असंतोष निर्माण होत आहे. अजूनही मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अनेक ठिकाणी आंदोलन चालू असतात. त्याच प्रमाणे जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी या गावामध्ये शांततेमध्ये आंदोलन सुरू होते. पण सदर आंदोलकांवर शुक्रवार दिनांक १ सप्टेंबर २०२३ रोजी पोलीस यंत्रणेमार्फत लाठीचार्ज करण्यात आला, त्यामध्ये अनेक आंदोलक जखमी झाले आहेत. या घटनेचा आम्ही वेंगुर्ला तालुक्यातील समस्त मराठा समाज निषेध व्यक्त करतो. तसेच शांततेने सुरु असलेल्या आंदोलनाला हिंसक वळण मिळालेल्या या प्रकरणाची शासनाने वरिष्ठ स्तरावर चौकशी करावी व दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करत असल्याचे या निवेदनात म्हटले आहे.
*संवाद मिडिया*
*_–🧤–साई वॉटरप्रुफिंग–💧–_*
*साई वॉटर प्रुफिंगची संपूर्ण महाराष्ट्रसह गोव्यात अग्रेसर सर्व्हिस*
*🙏आमची वैशिष्ट्ये : 👇*
✔️🏬 इमारतीची तोडफोड न करता पावसाळ्यात १०० टक्के संरक्षण,
✔️गराऊंटिंग इंजेक्शन.
✔️ उन्हाळ्यात थंड, हिवाळ्यात उबदारपणा,
✔️पाच वर्षाची हमी.
*श्री आशिष लोके*
*संपर्क : 8080493894 /9420208100*
———————————————-
-वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*