*वीज ग्राहक संघटना सावंतवाडी यांचे आयोजन*
*महावितरणचे सहाय्यक अभियंताच्या अनुपस्थितीने ग्राहक संतप्त*
सावंतवाडी:
वीज ग्राहकांना उद्भवणाऱ्या समस्या सोडविण्याच्या उद्देशाने सिंधुदुर्ग जिल्ह्यात वीज ग्राहक संघटनेची स्थापना झाली असून प्रत्येक तालुक्यात वीज ग्राहकांची तालुका संघटना बांधणी सुरू आहे. सावंतवाडी तालुका वीज ग्राहक संघटनेच्या माध्यमातून तालुक्यातील प्रत्येक उपकेंद्राच्या अंतर्गत येणाऱ्या गावात वीज ग्राहकांना उद्भवणाऱ्या समस्या जाणून घेऊन त्यावर उपाययोजना करण्यासाठी दिनांक ३ सप्टेंबर रोजी श्री.साटम महाराज वाचनालय दाणोली येथे वीज ग्राहकांची महावितरणचे सहाय्यक अभियंता यांच्या उपस्थितीत बैठक आयोजित केली होती. या बैठकीसाठी वीज ग्राहक संघटनेचे जिल्हा व तालुका पातळीवरील पदाधिकारी, सदस्य व सातुळी बावळाट, सांगेली, सावरवाड, देवसू, फणसवडे, पारपोली, माडखोल आदी गावातील सरपंच, उपसरपंच, ग्रामस्थ उपस्थित होते. परंतु पूर्वकल्पना देऊनही महावितरणचे सांगेली व आंबोली उपकेंद्राचे अधिकारी सहाय्यक अभियंता श्री.चव्हाण मात्र अनुपस्थितीत राहिले.
या बैठकीत प्रत्येक गावातल्या सरपंच उपसरपंच आणि ग्रामस्थांनी महावितरणच्या भोंगळ कारभाराचा पोलखोल केला. प्रत्येक गावात वीज ग्राहकांना उद्भवणाऱ्या समस्या या सर्वसाधारणपणे एकसारख्याच असल्याचे एकंदरीत ग्रामस्थांच्या तक्रारीवरून दिसून येत आहे सातोळी बावळट सरपंच सौ पर्व यांनी ग्रामपंचायतीचे वीज देयक कधीच वीज देयक वाटप करणाऱ्या व्यक्तीकडून ग्रामपंचायत मध्ये दिले जात नसल्याने ग्रामपंचायतची इच्छा असूनही वेळेत विज बिल भरता येत नसल्याची खंत व्यक्त केली. प्रत्येक गावातील सरपंचाने महावितरण कडून विजेच्या तारांना अडथळा होत असलेली झाडी तोडली जात नसल्याने ऐन पावसाळ्यात गावांमध्ये दोन दोन चार दिवस विजेचा पत्ताच नसतो आणि अशावेळी वीज वितरण चे सहाय्यक अभियंता आणि लाईनमन वायरमन कोणीही दूरध्वनीवर उपलब्ध होत नसल्याची तक्रार मांडली सर्वच गावातील सरपंच उपसरपंचांनी महावितरणचे सांगली व आंबोली उपकेंद्राचे अधिकारी सहाय्यक अभियंता श्री.चव्हाण यांच्या विरोधात तक्रारीचा सूर लावला. श्री चव्हाण हे महिला सरपंचांना देखील उद्धटपणे उत्तरे देत असल्याचे वीज ग्राहक संघटनेला सांगितले. त्यामुळे याच आठवड्यात पुन्हा एकदा सहाय्यक अभियंता श्री.चव्हाण यांच्या उपस्थितीतच बैठक लावण्याचे ठरविण्यात आले. एकंदरीत आजच्या बैठकीला सहाय्यक अभियंता उपस्थित न राहिल्याने ग्राहकांचा उद्रेक झाला होता. वीज ग्राहक संघटनेने सर्व गावातील वीज ग्राहकांच्या समस्या लेखी स्वरूपात लिहून घेत संघटनेच्या माध्यमातून सर्व समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले.
या बैठकीसाठी वीज ग्राहक संघटना सावंतवाडी तालुकाध्यक्ष संजय लाड, सचिव संजय नाईक, समन्वयक गणेश तथा बाळ बोर्डेकर, जिल्हा उपाध्यक्ष दीपक पटेकर, सातुळी बावळट सरपंच सौ.सोनाली परब, माडखोल सरपंच सौ शृष्नवी राऊळ, पारपोली सरपंच कृष्णा नाईक, सावरवाड उपसरपंच अनिकेत म्हाडगूत, जेरोन रोड्रिक्स, प्रशांत सुकी(ग्रा.प. सदस्य), संदीप सुकी, जॉकी डिसोजा, उल्हास राणे, वायरमन विजय जंगले, सुभाष पांगम, मनोहर मालवणकर, सुयश कुडतरकर, सुधाकर बुराण, योगिता बुराण (ग्रा.प.सदस्या), माधुरी चव्हाण, गोविंद सावंत, दिनेश सावंत (देवसु), दीपा सुकी, बेबी जेवरे, समीर शिंदे, महादेव सावंत, सचिन पारधी आदी उपस्थित होते. प्रास्ताविक बाळ बोर्डेकर यांनी केले, दीपक पटेकर यांनी संघटनेचे उद्देश आणि वीज ग्राहकांचे हक्क यावर प्रकाश झोत टाकला तर आभार अध्यक्ष संजय लाड यांनी मानले.