तपासणीसाठी शासनाकडून खास पथक बोलवा, रुग्णांना वाचवा
जिल्हाधिकार्यांना पत्र लिहून वेधले लक्ष
सिंधुदुर्ग
कोरोना विषाणूचे रूग्ण सिंधुदुर्गात सापडले असताना कोरोना बाबत रूग्ण बरे होण्यासाठी त्यांची काळजी घेतलीत. कोरोना रूग्ण बरेही होत आहेत. मात्र सिंधुदुर्ग जिल्ह्यात आतापर्यंत 80 रूग्ण लेप्टोचे सापडले आहेत. यातील 15 पेक्षा अधिक व्यक्तींचा मृत्यू झाला आहे.
त्यात लहान मुलांचाही समावेश आहे. कोरोना विषाणूचे रूग्ण संपत नाहीत. तोपर्यंत लेप्टोच्या रूग्ण संख्येत वाढ झाली आहे. हि चिंतेची बाब आहे. शासनाकडून खास पथक मागवून लेप्टोच्या रूग्णाचे प्राण वाचवावेत, यात आपण लक्ष घालावे असे एका पत्राद्वारे जिल्हाधिकारी यांना खा. नारायण राणे यांनी कळविले आहे.