You are currently viewing “तळेरे हायस्कूल मध्ये कापडी पिशवी घरोघरी , पर्यावरणाचे रक्षण करी ” अभियान

“तळेरे हायस्कूल मध्ये कापडी पिशवी घरोघरी , पर्यावरणाचे रक्षण करी ” अभियान

*”तळेरे हायस्कूल मध्ये कापडी पिशवी घरोघरी , पर्यावरणाचे रक्षण करी ” अभियान*

*तळेरे हायस्कूल स्काऊट गाईड विभागाचा उपक्रम*

*५०० कापडी पिशव्या तयार करून तळेरे परिसरात वाटप*

वामनराव महाडीक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय तळेरे मध्ये स्काऊट गाईड विभागामार्फत व कार्यानुभव अंतर्गत विद्यार्थी पालक वर्गशिक्षक यांच्या सहकार्याने कापडी पिशवी तयार करण्यात आल्या . विद्यालयाचे कलाशिक्षक व स्काऊट मास्टर पी. एन. काणेकर यांच्या संकल्पनेतून व मार्गदर्शनाखाली हा उपक्रम विद्यालयात राबवण्यात आला .यासाठी गाईड प्रमुख डि.सी.तळेकर तसेच इयत्ता ५वी ते १२ वी वर्गशिक्षक यांचे सहकार्य लाभले.
यावेळी पंचायत समिती सर्व शिक्षा अभियानचे सचिन तांबे , मुख्याध्यापक अविनाश मांजरेकर ,शाळा समिती सदस्य संंतोष तळेकर , उद्धव महाडीक , गोपाळ चव्हाण , पत्रकार उदय दुधवडकर , एन. बी. तडवी , ए.बी.तांबे , एन. जी. तर्फे , ग्रामस्थ आदी उपस्थित होते
स्काऊट गाईड पथक व कार्यानुभव अंतर्गत ” Beat plastic pollution 2023″ या जागतिक थिम नुसार वामनराव महाडीक माध्यमिक विद्यालयातर्फे ” कापडी पिशवी घरोघरी ” अभियान राबवण्यात आले . विद्यालयातील विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या जवळपास ५०० पिशव्या तळेरे बाजारपेठ परिसरात वाटण्यात आल्या त्याबरोबर कापडी पिशवी वापराबाबत जनजागृती करण्यात आली यावेळी विविध जनजागृती फलक , घोषणा यानी संपूर्ण परिसर विद्यार्थ्यांनीं दणाणून सोडला .तळेरे परिसरातील ग्रामस्थ, व्यापारी , फळविक्रेते , भाजीविक्रेते , मेडीकल बेकरी वगैरे तसेच सर्व सामन्यापासून ते थोरामोठ्यापर्यत स्काऊट गाईड मार्फत कापडी पिशवी देऊन ती वापराबाबतचा संदेश देण्यात आला .
सचिन तांबे म्हणाले तळेरे हायस्कूलचा हा उपक्रम म्हणजे समाजाला महत्वपूर्ण संदेश देणारा आहे. प्लॕस्टीकचे दुष्परिणाम ओळखून आपल्या वसुंंधरेच्या रक्षणासाठी प्रत्येकाने स्वतःहून प्लॕस्टीक पिशव्या हटाव चा निश्चय केला पाहिजे. यावेळी त्यांनी अनेक घोषणा देत कापडी पिशवी वापराबाबत महत्त्व सांगितले .
स्काऊटगाईडच्या या समाजभिमुख उपक्रमाचे परिसरातील नागरिक स्वागत करतीलच व दिलेल्या संदेशाचे त्यांंच्याकडून नक्कीच पालन होईल अशी अपेक्षा मुख्याध्यापक मांजरेकर यांनी व्यक्त केली . स्काऊट मास्टर पी. एन् काणेकर यांनी उपक्रमाचा उद्देश स्पष्ट करून कापडी पिशवी वापराबाबत महत्त्व विषद केले. यावेळी पत्रकार उदय दुधवडकर , कु. प्रांजल साटम , कु. मृण्मयी तळेकर यानींही आपले मनोगत व्यक्त केले.
या उपक्रमाचे संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीकृष्ण खटावकर , कार्यकारी मंडळ पदाधिकारी , शाळा समिती चेअरमन अरविंद महाडीक , , दिलीप तळेकर , शरद वायंगणकर , प्रविण वरूणकर , संतोष जठार , संतोष तळेकर , निलेश सो रप , उमेश कदम ,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी कौतुक केले.
आभार गाईड प्रमुख डी.सी.तळेकर यांनी मानले.

*काॕलम*

या वर्षी जागतिक पर्यावरण दिनाचा 50 वा वर्धापन दिन आहे, जो #BeatPlasticPollution हॅशटॅग आणि घोषवाक्य वापरून प्लास्टिक प्रदूषणावरील उपायांवर लक्ष केंद्रित करेल. कापडी पिशवी वापराबाबत जनजागृती करून वामनराव महाडीक विद्यालयामार्फत या अभियानास एक कृतीयुक्त जनजागृती करण्याचा प्रयत्न या उपक्रमाच्या माध्यमातून करण्यात आला.
जगभरात दरवर्षी 430 दशलक्ष टनांहून अधिक प्लास्टिक तयार केले जाते, त्यापैकी निम्मे प्लास्टिक फक्त एकदाच वापरण्यासाठी डिझाइन केले जाते. त्यातील 10 टक्क्यांपेक्षा कमी प्लास्टीकचा पुनर्वापर केला जातो. अंदाजे 19-23 दशलक्ष टन दरवर्षी तलाव, नद्या आणि महासागरांमध्ये मिसळतात. मायक्रोप्लास्टिक्स – 5 मिमी व्यासापर्यंतचे छोटे प्लास्टिकचे कण – अन्न, पाणी आणि हवेत मिसळतात. असा अंदाज आहे की ग्रहावरील प्रत्येक व्यक्ती वर्षाला 50,000 पेक्षा जास्त प्लास्टिकचे कण श्वासाव्दारे ग्रहण करतो, आणि बरेच काही. फेकून दिलेले किंवा जाळलेले एकदा वापरलेले प्लास्टिक मानवी आरोग्य आणि जैवविविधतेला हानी पोहोचवते आणि पर्वताच्या शिखरापासून समुद्राच्या तळापर्यंत प्रत्येक परिसंस्थेला प्रदूषित करते.

*संवाद मिडिया*

*सुवर्ण संधी!सुवर्ण संधी!!फिजियोथेरेपी डॉक्टर होण्याची सुवर्ण संधी!!!*

*बॅचलर ऑफ फिजियोथेरेपी(B.P.Th)* करण्याची सुवर्णसंधी.

Affiliated to MUHS,Nashik,DMER व महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त कॉलेज मध्ये

*प्रवेश सुरु -शैक्षणिक वर्ष 2023-2024*

*श्री रामराजे कॉलेज ऑफ फिजियोथेरेपी , दापोली.*

*COLLEGE CODE-6191*

*बॅचलर ऑफ फिजियोथेरेपी(B.P.Th)*
Eligibility- 12th Science (PCB)With NEET and Must Registered with CET Cell can apply.

• Duration : 4.5 Years

*👉मागासवर्गीय विद्यार्थांना शिष्यवृत्ती.(शासन नियमानुसार).*

*पत्ता:*
प्रांत ऑफिस जवळ,दापोली, ता. दापोली, जिल्हा रत्नागिरी, 415712

*संपर्क:*
📲 9145623747/ 9420156771/7887561247*

*जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/107166/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा