You are currently viewing मसुरे देऊळवाड्यात शिवसेनेचा भाजपला धक्का…

मसुरे देऊळवाड्यात शिवसेनेचा भाजपला धक्का…

*मसुरे देऊळवाड्यात शिवसेनेचा भाजपला धक्का…*

*आ. वैभव नाईक यांच्या उपस्थितीत भाजपच्या अनेक कार्यकर्त्यांनी केला शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश*

मालवण तालुक्यातील मसुरे देऊळवाडा येथील भाजपच्या अनेक कार्यकर्त्यांनी आज आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला. आ.वैभव नाईक यांचे समाजकार्य, शिवसेनेशी त्यांची असलेली निष्ठा तसेच सर्वसामान्य जनतेला गेली अनेक वर्षे अपेक्षित असलेला विकास हा आमदार वैभव नाईक यांनी आपल्या कुडाळ मालवण मतदार संघात केलेला आहे. मालवण नगरपालिकेतील अनेक वर्षे प्रलंबित असलेली अनेक कामे हि आमदार वैभव नाईक यांनी वेळोवेळी आवश्यक तो पाठपुरावा करून पूर्णत्वास नेलेली आहेत. या सर्व गोष्टीचा विचार करून त्यांच्या कार्यपद्धतीवर विश्वास ठेवून भाजप कार्यकर्त्यांनी शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. देशात व राज्यात जरी भाजपची सत्ता असली तरी सर्वसामान्य जनता हि शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्यासोबतच आहे. शिवसेनेचे कार्य व उद्धवजींचे नेतृत्व याच्यावर विश्वास ठेऊन शिवसेनेत प्रवेश करणाऱ्यांचा ओघ वाढतच आहे.
याप्रसंगी बोलताना आमदार वैभवजी नाईक म्हणाले शिवसेना हा सर्वांना मान सन्मान देणारा पक्ष आहे, आपण जो आज आमच्यावर विश्वास दाखवून प्रवेश करत आहात पक्षात आपणालाही योग्यतो मानसन्मान या पुढील काळात दिला जाईल. पक्षप्रमुख मा उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेचे काम चालू आहे, आज अनेक आमदार, खासदार, मंत्री व पदाधिकारी शिवसेना सोडून गेले तरी शिवसेनेची ताकद संपलेली नाही उलट शिवसेना वाढतच आहे. अजूनही स्वतःच्या स्वार्थासाठी अनेकजन शिवसेना सोडतील परंतु त्याचा शिवसेनेला कोणताही फरक पडणार नाही असे यावेळी सांगितले.
यावेळी मसुरे देऊळवाडा येथील साल्वादिर जुझे लोबो, रेमेत गिरगोल फर्नांडिस, जोसेफ गिरगोल फर्नांडिस, आयवान जोसेफ फर्नांडिस, मार्शेल फर्नांडिस, ग्रासीन फर्नांडिस, क्रिस्तीन फर्नांडिस, फिसलू रेमेत फर्नांडिस, सिसिल फर्नांडिस, सॅलबीटा फर्नांडिस, सिल्वेस्टर फर्नांडिस, पियाद फर्नांडिस, विल्सन लोबो, जॉरन लोबो, फ्रॅडी लोबो, मेरी लोबो, रुमालदिन फर्नांडिस, स्टेला लोबो, आगस्टीन लोबो, हिमिल लोबो, हेरोदीन लोबो, पीटर फर्नांडिस, कैतान लोबो, एमी फर्नांडिस, डेविड फर्नांडिस, वावतीस फर्नांडिस, थोमास फर्नांडिस, जॉकी फर्नांडिस यांच्यासह भाजपच्या अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेना पक्षात प्रवेश केला.
याप्रसंगी शिवसेनेचे मंदार केणी, राहुल सावंत, मंदार ओरोसकर, विभाग प्रमुख राजेश गावकर, सरपंच सुरेखा वायंगणकर, उपसरपंच नरेंद्र सावंत, मर्ढे सरपंच संदीप हडकर, वेरळ उपसरपंच दिनेश परब, रेवंडी सरपंच अमोल वस्त, शशांक माने, नरेंद्र सावंत, जीवन कांदळगावकर, दीपक परुळेकर, समिर लब्दे, अमित भोगले, संतोष अमरे, चंदू मुळीक, सुहास पेडणेकर, अशोक मसुरकर, आबा परब, सुरेश मापारी, अदिती मेस्त्री, प्राजक्ता परब, पप्पू परुळेकर, बाबू आंगणे यांच्यासह शिवसेनेचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

*संवाद मीडिया*

🚇🚆🚆रेल्वेकडून विशेष सहलीची योजना, इन्डियन रेलवे केटरिंग व टूरिज़म कडून ‘ *उत्तर भारत देवभूमी यात्रा* भारत गौरव स्पेशल पर्यटन रेल्वे’ लोकांच्यासाठी स्वस्तात सहलीचे आयोजन 🚊🚉
चला मग, भारत गौरव ट्रेनने *हरिद्वार, ऋषिकेश, अमृतसर आणि माता वैष्णोदेवीचे दर्शन आणि मथुरा* फिरुया.

स्लीपर SL व 3AC, 2AC क्लास – ज्यामध्ये रेल्वे व बस प्रवास, भोजन व राहण्याचा खर्च शामिल आहे
निर्गमन- दि. 28/10/23 ते 05/11/23 (08 रात्र आणि 09 दिवस)
प्रवास खर्च फक्त:-
Package Category
1) Economy (SL)
₹ 15,300/-
2) Comfort (3AC)
₹ 27,200/-
3) Deluxe (2AC)
₹ 32,900/-

ज्यामध्ये भेटीची ठिकाणे-
28/10/23 – पुणेहुन प्रवास सुरुवात
29/10/23 – हरिद्वार येथे आगमन. हॉटेल चेक इन (हरिद्वार येथे रात्री मुक्काम). 30/10/23 – सकाळी न्याहारी नंतर ऋषिकेशचे स्थानिक प्रेक्षणीय स्थळ आणि हर की पौरी येथे गंगा आरती. नंतर अमृतसरकडे प्रस्थान. (रात्रभर ट्रेनचा प्रवास).
31/10/23 – अमृतसरला आगमन आणि सुवर्ण मंदिर, बाघा बॉर्डरला भेट. नंतर कटरा साठी प्रस्थान. (रात्रभर ट्रेनचा प्रवास).
01/11/23- कटरा येथे आगमन. सकाळी 10.30 वाजता हॉटेल चेक इन करून आणि माता वैष्णोदेवी दर्शनासाठी पूर्ण दिवस (कटरा येथे रात्री मुक्काम).
02/11/23 – संध्याकाळी मथुरा साठी प्रस्थान. (रात्रभर ट्रेनचा प्रवास).
03/11/23 – मथुरा येथे आगमन, फ्रेश होऊन नंतर वृंदावन आणि कृष्णजन्म-भूमीला भेट देणे संध्याकाळी उशिरा परतीचा प्रवास सुरू (रात्रभर ट्रेनचा प्रवास).
04/11/23 – ट्रेन प्रवास
05/11/23 गोड आठवणीने प्रवास समाप्त पुणे
बोर्डिंग आणि डी-बोर्डिंग पॉईंट्स: पुणे-लोणावळा-कर्जत-कल्याण-वसई रोड-वापी-सुरत-वडोदरा

समाविष्टितसेवा व् सुविधा-
1) Economy Category – Sleeper class Train Journey, Basic Onboard & Offboard Meals, Stay in Non AC Hotels on TWIN/ TRIPLE, Wash n Change on Multi Share in Non AC Hotel Room (Maximum 5 PAX in One Room), Non AC Transport

2) Comfort Category 3AC Train Journey, Basic Onboard & Offboard Meals, Stay in AC Budget Hotels on TWIN/ TRIPLE, Wash n Change on TWIN/ TRIPLE, in AC Hotel Room, AC Transport

3) Deluxe Category –2AC Train Journey, Basic Onboard & Offboard Meals, Stay in AC Budget Hotels on TWIN/ TRIPLE, Wash n Change on TWIN/ TRIPLE, in AC Hotel Room, AC Transport

*अधिक माहिती व बुकिंग करिता संपर्क* – *संजना टूर्स अँड ट्रॅव्हल्स* 🚘🚎✈️🚆
☎️ *7350 7350 91/7350 534 534*

*जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/107588/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा