You are currently viewing लोकाभिमुख सेवा दिल्या बद्दल उपजिल्हा रुग्णालयातील लिपिक मनोहर परब यांचा सेवानिवृत्तीपर माजी नगराध्यक्ष समीर नलावडेंकडून सत्कार..

लोकाभिमुख सेवा दिल्या बद्दल उपजिल्हा रुग्णालयातील लिपिक मनोहर परब यांचा सेवानिवृत्तीपर माजी नगराध्यक्ष समीर नलावडेंकडून सत्कार..

कणकवली

येथील उपजिल्हा रुग्णालयामध्ये कनिष्ठ लिपिक या पदावर गेली अनेक वर्ष सेवा बजावणाऱ्या मनोहर परब हे सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांचा आज कणकवली चे माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्यासह भाजपा पदाधिकाऱ्यांनी सत्कार केला. गेले अनेक वर्ष श्री परब हे कनिष्ठ लिपिक म्हणून कार्यरत असताना लोकाभिमुख सेवा देण्यावर भर दिला होता. उपजिल्हा रुग्णालयात सर्वसामान्यांसाठी हक्काचा माणूस म्हणून त्यांची ओळख होती. नेहमीच रुग्णांच्या मदतीसाठी धावून जाणे तसेच अडीअडचणींना सहाय्य करणे ही त्यांची खासियत होती… त्यांच्या सेवानिवृत्तीमुळे उपजिल्हा रुग्णालयात निश्चितच काही प्रमाणात पोकळी निर्माण होईल. मात्र समाजसेवेचा वारसा ते नियमित सुरू ठेवतील असा विश्वास माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी व्यक्त केला. या सत्कार प्रसंगी माजी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, माजी नगरसेवक अभिजीत मुसळे, बंडू गांगण, किशोर राणे माजी गटनेते संजय कामतेकर आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा