ओटवणे रवळनाथ मंदिरात उद्या जिल्हास्तरीय निमंत्रित भजन स्पर्धा…
सावंतवाडी
ओटवणे येथील रवळनाथ मंदिरात रविवारी ३ सप्टेंबर रोजी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर पुरस्कृत आणि माजगाव विभागीय शिवसेना आयोजित जिल्हास्तरीय निमंत्रित भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
ओटवणे गावात प्रथमच जिल्हास्तरीय निमंत्रित भजन स्पर्धा होत असुन या भजन स्पर्धेसाठी जिल्ह्यातील निवडक १० भजन संघांना निमंत्रित करण्यात आले आहे. भजन स्पर्धेचे उद्घाटन दुपारी १ :३० वाजता शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अशोक दळवी सावंतवाडी तालुकाप्रमुख नारायण राणे, सावंतवाडीचे माजी उपनगराध्यक्ष राजन पोकळे, आबा केसरकर आदी मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात येणार आहे. तर भजन स्पर्धेचे पारितोषिक वितरण स्पर्धा संपल्यानंतर लगेच होणार आहे.
स्पर्धेची वेळ व सहभागी भजन मंडळे पुढीलप्रमाणे सायंकाळी ३ वाजता साटम महाराज प्रासादीक भजन मंडळ निरवडे ( बुवा नरेंद्र बोद्रे ), दसायंकाळी ४ वाजता श्री देवी सातेरी प्रासादीक भजन मंडळ सातुळी ( बुवा अमित परब ), सायंकाळी ५ वाजता श्री देवी सातेरी प्रासादीक भजन मंडळ वेंगुर्ले ( बुवा विशाल घोगळे ), सायंकाळी ६ वाजता श्री देव रवळनाथ प्रासादीक भजन मंडळ पाडलोस ( बुवा अजित गावडे ), सायंकाळी ७ वाजता श्री स्वामी समर्थ प्रासादीक भजन मंडळ कलंबिस्त ( बुवा संतोष धर्णे ) रात्री ८ वाजता श्री देव सावंत वस प्रासादीक भजन मंडळ इन्सुली ( बुवा वैभव राणे ), रात्री ९ वाजता प्राथमिक शिक्षक कलामंच प्रासादीक भजन मंडळ कुडाळ ( बुवा राजेश गुरव ), रात्री १० वाजता विठ्ठल रखुमाई प्रासादीक भजन मंडळ आंदुर्ले ( बुवा अथर्व होडावडेकर ), रात्री ११ वाजता सनामदेव प्रासादीक भजन मंडळ सांगेली ( बुवा खेमराज सनाम ), रात्री १२ वाजता श्री रवळनाथ प्रासादीक भजन मंडळ पिंगुळी ( बुवा रूपेश यमकर )
या स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक ७००० रुपये व सन्मानचिन्ह,द्वितीय ५००० रूपये व सन्मानचिन्ह, तृतीय ३००० रूपये व सन्मानचिन्ह उत्तेजनार्थ ३००० व इतर बक्षिसे तसेच उकृष्ट गायक, पखवाज वादक, तबला वादक आणि स्पर्धेत सहभागी १० संघांना प्रत्येकी १००० रुपयाचे पारीतोषिक देण्यात येणार आहे.
या भजन स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी उमेश गावकर 8080939226
यांच्याशी संपर्क साधावा. तसेच भजन रसिकांनी या स्पर्धेचा लाभ घ्यावा असे आवाहन संजय गावडे यांनी केले आहे.