You are currently viewing मिलाग्रीस प्रशालेमध्ये पावसाळी क्रीडा स्पर्धा उत्साहात संपन्न…

मिलाग्रीस प्रशालेमध्ये पावसाळी क्रीडा स्पर्धा उत्साहात संपन्न…

मिलाग्रीस प्रशालेमध्ये पावसाळी क्रीडा स्पर्धा उत्साहात संपन्न…!

सावंतवाडी

मिलाग्रीस हायस्कूल सावंतवाडी या प्रशालेमध्ये शाळेचे मुख्याध्यापक फादर रिचर्ड सालदान्हा यांच्या संकल्पनेतून दि.२८ व २९ अॉगस्ट रोजी मिलाग्रीस हायस्कूल च्या पटांगणावर पावसाळी क्रीडा स्पर्धा उत्साहात संपन्न झाल्या.
या स्पर्धेचे उद्घाटन तालुका क्रीडा अधिकारी विजय शिंदे यांच्या हस्ते झाले. मुलांच्या अंगी खिलाडू वृत्ती विकसित व्हावी व त्यांनी खेळातील आपले कसब सिद्ध करावे हा या स्पर्धांमागचा हेतू होता.या स्पर्धा १७ वर्षांखालील गट व १४ वर्षांखालील गट अशा दोन गटांत घेण्यात आल्या.
मुलांसाठी फुटबॉल, हॉलीबॉल, कबड्डी,रिले, रस्सीखेच या स्पर्धा तर मुलींसाठी लंगडी, डॉजबॉल, रिले, रस्सीखेच या स्पर्धा घेण्यात आल्या. चारही हाऊसमधून बोस हाऊसने प्रथम क्रमांक पटकावला तर नेहरू हाऊसने द्वितीय क्रमांक पटकावला. तसेच टागोर हाऊसने तृतीय क्रमांक व विवेकानंद हाऊसने चतुर्थ क्रमांक पटकावला.

या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी प्रशालेच्या क्रीडा शिक्षिका शेरॉन अल्फान्सो व सर्व शिक्षकांनी मेहनत घेतली.
स्पर्धा समारोपावेळी प्रशालेचे मुख्याध्यापक फादर रिचर्ड सालदान्हा यांनी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

three + 18 =