You are currently viewing खासगी उद्योजक व बेरोजगार उमेदवारांसाठी 5 सप्टेंबर रोजी रोजगार मेळावा

खासगी उद्योजक व बेरोजगार उमेदवारांसाठी 5 सप्टेंबर रोजी रोजगार मेळावा

खासगी उद्योजक व बेरोजगार उमेदवारांसाठी 5 सप्टेंबर रोजी रोजगार मेळावा

सिंधुदुर्गनगरी

 जिल्ह्यातील खासगी उद्योजक व बेरोजगार उमेदवारांसाठी Apprenticeship रोजगार मेळावा मंगळवार दि. 5 सप्टेंबर रोजी आयोजित केले आहे. आयटीआय पूर्ण केलेल्या उमेदवारांनी यांचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता चे प्र. सहायक आयुक्त ग.पां. चिमणकर यांनी  केले आहे.

         जिल्ह्यातील आयटीआय पूर्ण केलेल्या नोकरी इच्छूक उमेदवारांना खासगी क्षेत्रातील नोकरीच्या संधी उपलब्ध होण्याकरिता जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र व मूलभूत प्रशिक्षण तथा अनुषंगिक सूचना केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 5 सप्टेंबर 2023 रोजी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र सिंधुदुर्ग, प्रशासकीय संकुल, तळ मजला, ए ब्लॉक, जिल्हाधिकारी कार्यालय परीसर, ओरोस येथे सकाळी 10 ते दु. 1 या वेळेत Apprenticeship रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

एकूण 42 पदांसाठी रिक्तपदे (Vacancies) प्राप्त झालेली आहेत. तरी नोकरी इच्छुक आयटीआय पूर्ण केलेल्या उमेदवारांनी आपल्या शैक्षणिक कागदपत्रांच्या छायाप्रती, बायोयाटा व पासपोर्ट साईस फोटोसह स्वखर्चाने जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र सिंधुदुर्गनगरी, ओरोस येथे उपस्थित राहून संधीचा लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी दूरध्वनी क्र. 02362 228835, ईमेल आयडी- sindhudurojgar@gmail.com  वर संपर्क साधावा.

        या रोजगार मेळाव्यामध्ये आयटी आयमध्ये विविध कोर्सचे प्रशिक्षण पूर्ण केलेल्या उमेदवारांना खालील खासगी आस्थापनेवर रोजगार उपलब्ध होणार आहेत.

 अ.क्र कंपनीचे नावठिकाणट्रेडचे नाव पदांची संस्खा
1Synenergy Techno SoftKudalL& CTSM3
2Maitree Engineering Welder+ Electrician3+1=4
3 Bhagirthee Enterprises MIDC Kudal Fitter/ Turner3
4 Mauli EnterpriseMIDC Kudal Electrician+ front office4+1=5
5 Jaitapkar AutomobileOros Diese/ MMV3
6 Goa Engineering  kudalKudal Welder2
7Credit Gramin RojgarPune All Trade15
8 Accurate ServicesMIDC Kudal Welder+ Electrician3+1=4
9 TVS Next  DriveKudalDiesel Mechanic3

 

प्रतिक्रिया व्यक्त करा