‘ब्रेक अप ‘ केल्याच्या रागातून प्रियकराकडून प्रेयसीचा ‘निर्घूण खून ‘; आंबोली घाटात टाकला मृतदेह
रेस्क्यू टीमच्या सहकार्याने मृतदेह काढला बाहेर
आंबोली
पोलिसांत तक्रार दिल्याच्या रागातून म्हापसा येथील कामाक्षी शंकर उड्डापनोव (२८) या स्वतःच्याच प्रियसीचा प्रियकराने खून करून तिचा मृतदेह आंबोली घाटात फेकल्याचा प्रकार गोवा पोलिसांच्या तपासात शुक्रवारी उघड झाला. प्रकाश चुंचवाड (२२) असे संशयित आरोपीचे नाव असून यामध्ये अन्य एकाचा समावेश असल्याचे गोवा पोलिसांचे म्हणणे असून निरूपदी कड (२२) नामक साथीदारालाही आंबोली येथे आणण्यात आले होते. संशयित आरोपीने पोलिस तपासात दिलेल्या माहितीनंतर गोवा व सिंधुदुर्ग पोलिसांचे पथक आंबोली घाटात पोहोचले त्यानंतर संशयितांनी मृतदेह टाकल्याची जागा दाखविली तेथे शोध घेतल्यानतर त्यांना तो मृतदेह निदर्शनास आला. त्यानंतर आंबोली रेस्क्यू टीमच्या सहकार्याने ७० फूट खोल दरीतून सदरचा मृतदेह बाहेर काढण्यात आला.
याबाबत अधिक माहिती अशी की, कामाक्षी उड्डपनोव ही तिच्या गोवा पर्वरी येथील फ्लॅटवर एकटी राहात होती. पर्वरीत गॅरेज चालविणारा प्रकाश चुंचवाड (२२) याचे कामाक्षीवर प्रेम जडले होते. कालांतराने त्यांच्यात वाद होऊ लागल्याने कामाक्षीने प्रेम प्रकरण पुढे चालू ठेवण्यास नकार दिला. मात्र, प्रकाशला ही गोष्ट रुचली नाही. तो तिला सारखा सतावू लागला.
मंगळवार २९ ऑगस्ट रोजी मध्यरात्री प्रकाश याला समज देण्यासाठी कामाक्षीने म्हापसा येथे बोलविले होते. तिथे त्यांच्यात भांडण झाले यावेळी कामाक्षीचा मित्र आणि मैत्रीण सोबत होते. यावेळी झालेल्या बाचाबाचीत रागाने प्रकाशने कामाक्षीला मारहाण केली. तर या झटापटीत प्रकाशचा आयफोन मोबाइल फुटला.
त्या नंतर कामाक्षीने म्हापसा पोलीस स्थानकात प्रकाशच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीची दखल घेऊन पोलिसांनी दोघांना बोलावून कडक शब्दांत समज दिली होती. त्याच्याकडून लेखी हमी घेतली. त्यानंतर प्रकाशला सोडून दिले.
दरम्यान, तिने त्याच्याशी प्रेम संबंध तोडल्याने त्याच रागाने ती फ्लॅटवर एकटी असल्याची संधी साधून बुधवारी ३० ऑगस्ट रोजी दुपारच्या सुमारास संशयित प्रकाशने चाकूने भोसकून तीचा खून केला. त्यानंतर तो मृतदेह गाडीतून आणून त्याच दिवशी रात्री आंबोली घाटात फेकला.
दरम्यान, आपली बहीण बेपत्ता झाल्याची तक्रार तिच्या भावाने २९ ऑगस्टला म्हापसा पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. त्यानुसार म्हापसा पोलिसांनी तपास सुरु केला. यात चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलेल्या संशयित प्रकाश याने तीचा खून केल्याची कबुली दिली.
‘मी कामाक्षीचा फ्लॅटवर खून करून आंबोली घाटात नेऊन जमिनीत गाडला. तिने माझ्याशी प्रेमसंबंध तोडून दुसऱ्याशी सूत जुळवले होते म्हणून हे कृत्य केले’, असे त्याने पोलिसांना सांगितले. त्यानुसार त्याला सोबत ताब्यात घेऊन गोवा पोलिसांचे एक पथक शुक्रवारी आंबोली येथे दाखल झाले.
त्यानंतर घाटात शोध मोहीम राबविण्यात आली. या शोध मोहिमेत तीचा मृतदेह खोल दरीत दिसून आला. मात्र, आंबोली घाटात मोठ्या प्रमाणात पाऊस असल्याने मृतदेह वर काढण्यात अडचणी येत होत्या. अखेर आंबोली रेस्क्यू टीमच्या सहाय्याने सदरचा मृतदेह दरीतून बाहेर काढण्यात आला.
सावंतवाडी पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सदरचा मृतदेह दोन दिवसापूर्वीच टाकण्यात आला आहे. या प्रकरणी संशयित आरोपीला अन्य एका मित्राने सहाय्य केले असल्याचे स्पष्ट केले. दरम्यान, हा गुन्हा गोवा येथे दाखल झाला असल्याने गोवा पोलिस सर्व सोपस्कार हे तिकडेच करणार असल्याचे पोलीस निरीक्षक त्रषिकेश अधिकारी यांनी सांगितले तसेच मृतदेहाची उत्तरीय तपासणी ही गोवा बांबुळी येथे करण्यात येणार असल्याचेही पोलिसांकडून सांगण्यात आले.
यावेळी पोलीस विभागीय अधिकारी संध्या गावडे, पोलिस निरीक्षक त्रषीकेश अधिकारी, म्हापसा पोलिस निरीक्षक आनंद गावकर यांच्यासह सावंतवाडी व गोवा पोलिस उपस्थित होते. यावेळी उपपोलीस निरीक्षक अमित गोते, . सहा. पो. ऊप निरीक्षक जगदिश दुधवाडकर,हवालदार दत्तात्रय देसाई, दिपक शिंदे, महेश निरवडेकर, हवालदार सावळ, आंबोली रेक्सु टीमचे सदस्य दिपक मेस्त्री, अजित नार्वेकर , उत्तम नार्वेकर, विशाल बांदेकर,मनिष नार्वेकर, हेमंत नार्वेकर, संतोष पालेकर, प्रथमेश गावडे, शशिकांत गावडे, संतोष पडवळ, सिद्देश भिसे आणि आंबोली ग्रामस्थांनी सहकार्य केले.
*संवाद मीडिया*
🚇🚆🚆रेल्वेकडून विशेष सहलीची योजना, इन्डियन रेलवे केटरिंग व टूरिज़म कडून ‘ *उत्तर भारत देवभूमी यात्रा* भारत गौरव स्पेशल पर्यटन रेल्वे’ लोकांच्यासाठी स्वस्तात सहलीचे आयोजन 🚊🚉
चला मग, भारत गौरव ट्रेनने *हरिद्वार, ऋषिकेश, अमृतसर आणि माता वैष्णोदेवीचे दर्शन आणि मथुरा* फिरुया.
स्लीपर SL व 3AC, 2AC क्लास – ज्यामध्ये रेल्वे व बस प्रवास, भोजन व राहण्याचा खर्च शामिल आहे
निर्गमन- दि. 28/10/23 ते 05/11/23 (08 रात्र आणि 09 दिवस)
प्रवास खर्च फक्त:-
Package Category
1) Economy (SL)
₹ 15,300/-
2) Comfort (3AC)
₹ 27,200/-
3) Deluxe (2AC)
₹ 32,900/-
ज्यामध्ये भेटीची ठिकाणे-
28/10/23 – पुणेहुन प्रवास सुरुवात
29/10/23 – हरिद्वार येथे आगमन. हॉटेल चेक इन (हरिद्वार येथे रात्री मुक्काम). 30/10/23 – सकाळी न्याहारी नंतर ऋषिकेशचे स्थानिक प्रेक्षणीय स्थळ आणि हर की पौरी येथे गंगा आरती. नंतर अमृतसरकडे प्रस्थान. (रात्रभर ट्रेनचा प्रवास).
31/10/23 – अमृतसरला आगमन आणि सुवर्ण मंदिर, बाघा बॉर्डरला भेट. नंतर कटरा साठी प्रस्थान. (रात्रभर ट्रेनचा प्रवास).
01/11/23- कटरा येथे आगमन. सकाळी 10.30 वाजता हॉटेल चेक इन करून आणि माता वैष्णोदेवी दर्शनासाठी पूर्ण दिवस (कटरा येथे रात्री मुक्काम).
02/11/23 – संध्याकाळी मथुरा साठी प्रस्थान. (रात्रभर ट्रेनचा प्रवास).
03/11/23 – मथुरा येथे आगमन, फ्रेश होऊन नंतर वृंदावन आणि कृष्णजन्म-भूमीला भेट देणे संध्याकाळी उशिरा परतीचा प्रवास सुरू (रात्रभर ट्रेनचा प्रवास).
04/11/23 – ट्रेन प्रवास
05/11/23 गोड आठवणीने प्रवास समाप्त पुणे
बोर्डिंग आणि डी-बोर्डिंग पॉईंट्स: पुणे-लोणावळा-कर्जत-कल्याण-वसई रोड-वापी-सुरत-वडोदरा
समाविष्टितसेवा व् सुविधा-
1) Economy Category – Sleeper class Train Journey, Basic Onboard & Offboard Meals, Stay in Non AC Hotels on TWIN/ TRIPLE, Wash n Change on Multi Share in Non AC Hotel Room (Maximum 5 PAX in One Room), Non AC Transport
2) Comfort Category 3AC Train Journey, Basic Onboard & Offboard Meals, Stay in AC Budget Hotels on TWIN/ TRIPLE, Wash n Change on TWIN/ TRIPLE, in AC Hotel Room, AC Transport
3) Deluxe Category –2AC Train Journey, Basic Onboard & Offboard Meals, Stay in AC Budget Hotels on TWIN/ TRIPLE, Wash n Change on TWIN/ TRIPLE, in AC Hotel Room, AC Transport
*अधिक माहिती व बुकिंग करिता संपर्क* – *संजना टूर्स अँड ट्रॅव्हल्स* 🚘🚎✈️🚆
☎️ *7350 7350 91/7350 534 534*
*जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/107588/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*