You are currently viewing शिल्लक राहिलेल्या लाभार्थ्यांना “आयुष्यमान कार्ड” मिळणार…

शिल्लक राहिलेल्या लाभार्थ्यांना “आयुष्यमान कार्ड” मिळणार…

आजपासून मोहीम सुरू; जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांची माहिती…

ओरोस

केंद्र शासनाच्या आयुष्मान भव मोहिमेला जिल्ह्यात आजपासून प्रारंभ झाला आहे. ही मोहीम ३१ डिसेंबर पर्यंत चार महिने चालणार आहे. या कालावधीत शिल्लक राहिलेल्या नागरिकांना आयुष्मान कार्ड वितरण करण्यासाठी आयुष्मान आपल्यादारी, आयुष्मान मेळावा, अंगणवाडी व प्राथमिक शाळांमधील मुलांची आरोग्य तपासणी आदी मोहीम राबविण्यात येणार आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत ९२ हजार लाभार्थ्यांना ही कार्ड वाटप झाली असून शिल्लक ३३ हजार २३९ लाभार्थ्यांना आयुष्मान कार्ड वाटप केली जाणार असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ सई धुरी यांनी दिली.

प्रतिक्रिया व्यक्त करा