You are currently viewing मळगाव इंग्लिश स्कूलचे निवृत्त शिक्षक मारुती बांदेकर यांचे निधन

मळगाव इंग्लिश स्कूलचे निवृत्त शिक्षक मारुती बांदेकर यांचे निधन

सावंतवाडी

मळगाव इंग्लिश स्कूलचे निवृत्त शिक्षक मारुती म-याप्पा डुक्करवाडीकर उर्फ बांदेकर (वय 88, रा. मळगाव रस्तावाडी, मुळ रा. बेळगाव वडगाव) यांचे काल गुरुवारी रात्री 10.30 च्या सुमारास मळगाव येथील राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले.

मळगाव इंग्लिश स्कूल मळगाव हायस्कूलमध्ये १९६९ ते १९९४ या कालावधीत ते शिक्षक म्हणून कार्यरत होते. इतिहास, हिंदी, शारीरिक शिक्षण आदी विषय ते शिकवत असत. तसेच आरएमपी डॉक्टर म्हणूनही त्यांनी त्यावेळी मळगाव तसेच परिसरात सेवा दिली होती. गेले काही दिवस त्यांचो तब्येत जास्तच बिघडली आणि त्यातच काल रात्री त्यांचे निधन झाले. मळगाव येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कर करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, सुन, नातवंडे असा परिवार आहे. बांदा येथील खेमराज मेमोरीयल हायस्कूल आणि जुनिअर कॉलेजचे शिक्षक पृथ्वीराज बांदेकर यांचे ते वडील होत

प्रतिक्रिया व्यक्त करा