You are currently viewing लेखक….अभिनेता….कलाकार….वास्तवतेतून भूमिकेत शिरून बाहेर पडतात…

लेखक….अभिनेता….कलाकार….वास्तवतेतून भूमिकेत शिरून बाहेर पडतात…

रसिक प्रेक्षक मात्र खऱ्या खोट्याचा फेऱ्यात गुरफटतात

“खरे” आणि “खोटे”
दोन्ही भाव ज्याला सहजपणे मांडता येतात तोच खरा लेखक….अभिनेता,,,
तोच खरा कलाकार…
मग ते नाटकात असोत वा वैयक्तिक जीवनात..
बऱ्याचवेळा माणूस मनापासून बोलतो,,
मनातल्या भावना सहज कागदावर उतरवतो.
कागदावर उतरलेल्या भावनाही बोलक्या असतात,,,
काहीवेळा बरंच काही सांगून जातात…
कधीकधी दुसऱ्याच्या हृदयालाही पाझर फोडून जातात,,
तर कधी एखाद्याच्या पापण्यांच्या कडा ओलावून जातात…
नकळतपणे अश्रूंना गालावरची वाट मोकळी करून देतात,,
पण ….
जर त्या भावना कागदावरच उतरण्यासाठीच जन्मलेल्या असल्या तर????
काहीवेळा लेखकाचं समोर न येणारं सत्यही उघड करून जातात,,
एखादवेळी असंही होतं…
लेखक लिहून जातो,,,,
नाटकाचा एखादा अंक लिहावा,,
अगदी तसाच……
भावपूर्ण….. भावस्पर्शी…..!
काही मनं हळहळतात,,
पापण्याही ओलावतात…
कित्येक हृदयांना पाझरही फुटतात..
अंक संपतो…
पडदा पडतो,,,,
नाटकातील पात्रही…
वेष पालटून निघून जातात…
काळोख दूर होऊन नाट्यगृहाच्या लाईट्स लागतात…
गुंतलेली बरीच मनं भानावर येतात,,,
तोंडातल्या तोंडात पुटपुटत नाट्यगृह सोडतात….
पापण्यांच्या कडा पुसून जड मनाने निघूनही जातात,,
तेच विचार,,,, तो प्रसंग,,,,
मनाच्या कुठल्यातरी एका कोपऱ्यात साठवून..
पण,,,
लेखक मात्र विसरून गेलेला असतो…
लिहिलेला तो पहिला अंक…
पुन्हा एक नवं नाट्य लिहिण्यासाठी….!!!

(दिपी)

प्रतिक्रिया व्यक्त करा