कुडाळ:
शनिवार दिनांक २८ ऑगस्ट रोजी घावनळे आईनमळा या शाळेमध्ये कुमारी युविका आनंद परब हिचा वाढदिवस साजरा करण्यात आला. सुरुवातीला मान्यवरांचे स्वागत आणि त्यानंतर केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान माननीय माजी उपसरपंच व विद्यमान सदस्य दिनेश वारंग यांना देण्यात आले. तर यावेळी विद्यमान उपसरपंच योगेश घाडीगावकर, तंटामुक्ती अध्यक्ष राजाराम उर्फ अमोल पालव, शिवसेना घावनळे गाव संघटक संघटक नाना कोरगावकर, अक्षय लाड, आनंद परब, शिक्षक, अंगणवाडी सेविका, मदतनीस व ग्रामस्थ उपस्थित होते. या कार्यक्रमादरम्यान आपल्या शाळेत यंदाच बदली होऊन आलेले शिक्षक धोंडी अर्जुन मसूरकर यांचाही शाल व श्रीफळ देऊन स्वागत सत्कार करण्यात आला.
वाढदिवसाचे औचित्य साधून आनंद परब यांनी शाळेतील मुलांना प्रत्येकी चार वह्या व एक पेन अशाप्रकारे वस्तू स्वरूपात वाटप केले. त्याचप्रमाणे शाळेच्या परिसरात लावण्यासाठी दहा झाडे देण्यात आली. आदरणीय दिनेश वारंग यांचं विशेष सहकार्य या नियोजनासाठी लाभले, असे उद्गार यावेळी आनंद परब यांनी काढले.
वेगळ्या पद्धतीने वाढदिवस साजरा करून आनंद परब यांनी एक नवीन प्रेरणा पालकांना दिली आहे. ज्यांना शक्य असेल त्यांनी अश्याच प्रकारे मुलांना शिक्षण उपयोगी वस्तूंचे वाटप करावे . असे आवाहन मान्यवरांनी यावेळी केले.
आनंद परब हे घावनळे गावातील सुप्रसिद्ध युवा भजनी बुवा आहेत. त्याचप्रमाणे ते युवासेना शखाप्रमुख देखील आहेत. आनंद परब यांचे धन्यवाद मानले. अश्याच प्रकारचे अभिनव उपक्रम राबवून विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी , गावाच्या विकासासाठी हातभार लावणे गरजेचे आहे.