You are currently viewing हत्ती प्रश्न सर्वपक्षीय, नाडकर्णी यांनी भाजपचा साज चढवू नये; हिम्मत असेल तर भाजप च्या लेबलवर आंदोलन करावे.

हत्ती प्रश्न सर्वपक्षीय, नाडकर्णी यांनी भाजपचा साज चढवू नये; हिम्मत असेल तर भाजप च्या लेबलवर आंदोलन करावे.

हत्ती प्रश्न सर्वपक्षीय, नाडकर्णी यांनी भाजपचा साज चढवू नये; हिम्मत असेल तर भाजप च्या लेबलवर आंदोलन करावे.

▪️विधानसभाप्रमुख प्रेमानंद देसाई यांचा सल्ला

दोडामार्ग – प्रतिनिधी
हत्ती प्रश्नावर कोणी काय केले हे तिलारी खोऱ्यातील जनतेला माहिती आहे या भागात ग्रासरूटवर जर कोणी काम केले तर एकमेव दीपकभाई केसरकर यांनीच. दीपकभाई हे चालता बोलता कधी भेट घेत नाहीत तर हितगुज करुन प्रश्न सोडवतात. भाजपचे एकनाथ नाडकर्णी नाहक राजकारण का करू पाहतात? मंत्री केसरकर यांनी बैठक आयोजित केली हे कोणी तज्ञाने सांगण्याची गरज नाही आणि जे मुद्दे मुंबईत चर्चेत आले ते यापूर्वीच ना. केसरकर आणि वनविभाग यांच्यासोबत ठरले होते. केर येथे अन्नत्याग आंदोलन समोर आले तेव्हा त्याचे लेखी पत्र दिले होते ते आम्ही दाखवू शकतो. तिलारी खोऱ्यातील शेतकऱ्यांची हत्ती पकड मोहीम ही एकमेव मागणी होती आणि त्यावर वनमंत्री भूमिका घेतील असे अपेक्षित होते कारण इतर गोष्टी या भागात सुरु आहेत त्याची माहिती श्री. नाडकर्णी यांनी घ्यावी उगाचच ना. केसरकर यांच्यावर टीका करू नये. भाजपचे लेबल लावण्याअगोदर भाजपच्या मंत्री महोदयांनी किती वेळा प्रत्यक्ष नुकसान पाहिली हे बघावं सत्ता आहे त्याचा उपयोग हत्ती हत्ती पकड मोहिमेसाठी करावा उगाचच राजकारण करून स्थानिकांच्या मनात राजकीय भावना निर्माण करू नयेत असे आपले मतं असल्याचे प्रेमानंद देसाई म्हणाले

गेल्या एक मार्च पासून या वर्षांत हत्तीबाधीत क्षेत्रात वनविभाग सोबत उपोषण, आंदोलन, बैठका होत आहेत.या परिसरातील सर्व आजीमाजी सरपंच यांनी एकत्रित येऊन आंदोलन चा इशारा दिलेला होता. त्यावर सावंतवाडी उपवनसंरक्षक यांचे कार्यालयात, दोडामार्ग वनविभाग च्या कार्यालयात ३१मार्च पुर्वी बैठकीत वनविभाग ने काल झालेल्याच चर्चेत झालेल्याच गोष्टींवर आश्वासन दिल्यानंतर आंदोलन स्थगित केलेले होते.१० ऑगस्ट ला झालेले आंदोलन हे सर्व पक्षीय आंदोलन होते त्यावर मा.ना.दिपकभाई केसरकर यांनी वनमंत्री मुनगंटीवार साहेब यांचेशी चर्चेत ठरल्यानुसार आंदोलन स्थगित करून २५ ऑगस्ट पुर्वी मंत्रालय येथे बैठक आयोजित करण्याच्या हमीवर आंदोलन सर्वांनी स्थगित केले होते आणी म्हणूनच २४ ऑगस्ट ला मा.ना.मुनगंटीवार साहेब यांनी बैठक आयोजित केली होती ती बैठक पालकमंत्री यांनीच रद्द करून राजकारण केले असे नाडकर्णी यांना सुचवायचे आहे का?हे प्रथम जाहीर करावे. २४तारीखची बैठक रद्द करून २९ तारीख ला ठेवण्यात आली असे वनमंत्री यांचे स्विय सहाय्यक यांनी आधीच कळविले होते मग १० मिनिटांसाठी घोटगेवाडी त आणण्याचं राजकारण भाजप ने केलेय व सर्वसामान्य शेतकऱ्यांकडून झालेला उठाव भाजप च्याच पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आलाय असं सुचित करायच असेल तर तसं सांगावे मग आम्हीपण शिवसेना म्हणून आंदोलनात उतरतो मग त्याची जबाबदारी भाजप ने घ्यावी. फुकटात श्रेयवादासाठी उठाठेव करू नये .हिम्मत असेल तर भाजप च्याच लेबलवर आंदोलन करावे आम्ही सज्ज आहोत असा सल्ला प्रेमानंद देसाई शिवसेना सावंतवाडी मतदारसंघ प्रमुख यांनी दिला आहे

*संवाद मीडिया*

🚇🚆🚆रेल्वेकडून विशेष सहलीची योजना, इन्डियन रेलवे केटरिंग व टूरिज़म कडून ‘ *उत्तर भारत देवभूमी यात्रा* भारत गौरव स्पेशल पर्यटन रेल्वे’ लोकांच्यासाठी स्वस्तात सहलीचे आयोजन 🚊🚉
चला मग, भारत गौरव ट्रेनने *हरिद्वार, ऋषिकेश, अमृतसर आणि माता वैष्णोदेवीचे दर्शन आणि मथुरा* फिरुया.

स्लीपर SL व 3AC, 2AC क्लास – ज्यामध्ये रेल्वे व बस प्रवास, भोजन व राहण्याचा खर्च शामिल आहे
निर्गमन- दि. 28/10/23 ते 05/11/23 (08 रात्र आणि 09 दिवस)
प्रवास खर्च फक्त:-
Package Category
1) Economy (SL)
₹ 15,300/-
2) Comfort (3AC)
₹ 27,200/-
3) Deluxe (2AC)
₹ 32,900/-

ज्यामध्ये भेटीची ठिकाणे-
28/10/23 – पुणेहुन प्रवास सुरुवात
29/10/23 – हरिद्वार येथे आगमन. हॉटेल चेक इन (हरिद्वार येथे रात्री मुक्काम). 30/10/23 – सकाळी न्याहारी नंतर ऋषिकेशचे स्थानिक प्रेक्षणीय स्थळ आणि हर की पौरी येथे गंगा आरती. नंतर अमृतसरकडे प्रस्थान. (रात्रभर ट्रेनचा प्रवास).
31/10/23 – अमृतसरला आगमन आणि सुवर्ण मंदिर, बाघा बॉर्डरला भेट. नंतर कटरा साठी प्रस्थान. (रात्रभर ट्रेनचा प्रवास).
01/11/23- कटरा येथे आगमन. सकाळी 10.30 वाजता हॉटेल चेक इन करून आणि माता वैष्णोदेवी दर्शनासाठी पूर्ण दिवस (कटरा येथे रात्री मुक्काम).
02/11/23 – संध्याकाळी मथुरा साठी प्रस्थान. (रात्रभर ट्रेनचा प्रवास).
03/11/23 – मथुरा येथे आगमन, फ्रेश होऊन नंतर वृंदावन आणि कृष्णजन्म-भूमीला भेट देणे संध्याकाळी उशिरा परतीचा प्रवास सुरू (रात्रभर ट्रेनचा प्रवास).
04/11/23 – ट्रेन प्रवास
05/11/23 गोड आठवणीने प्रवास समाप्त पुणे
बोर्डिंग आणि डी-बोर्डिंग पॉईंट्स: पुणे-लोणावळा-कर्जत-कल्याण-वसई रोड-वापी-सुरत-वडोदरा

समाविष्टितसेवा व् सुविधा-
1) Economy Category – Sleeper class Train Journey, Basic Onboard & Offboard Meals, Stay in Non AC Hotels on TWIN/ TRIPLE, Wash n Change on Multi Share in Non AC Hotel Room (Maximum 5 PAX in One Room), Non AC Transport

2) Comfort Category 3AC Train Journey, Basic Onboard & Offboard Meals, Stay in AC Budget Hotels on TWIN/ TRIPLE, Wash n Change on TWIN/ TRIPLE, in AC Hotel Room, AC Transport

3) Deluxe Category –2AC Train Journey, Basic Onboard & Offboard Meals, Stay in AC Budget Hotels on TWIN/ TRIPLE, Wash n Change on TWIN/ TRIPLE, in AC Hotel Room, AC Transport

*अधिक माहिती व बुकिंग करिता संपर्क* – *संजना टूर्स अँड ट्रॅव्हल्स* 🚘🚎✈️🚆
☎️ *7350 7350 91/7350 534 534*

*जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/107588/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा