You are currently viewing मालवणात नारळी पौर्णिमा मोठया उत्साहात साजरी

मालवणात नारळी पौर्णिमा मोठया उत्साहात साजरी

*मालवणात नारळी पौर्णिमा मोठया उत्साहात साजरी*

*आ. वैभव नाईक, व्यापारी संघाचे अध्यक्ष उमेश नेरुरकर यांच्या हस्ते समुद्राला नारळ अर्पण*

मालवण तालुका व्यापारी संघ व मच्छीमारांच्या वतीने आज मालवणात नारळी पौर्णिमा मोठया उत्साहात साजरी करण्यात आली. कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत,मालवण व्यापारी संघाचे अध्यक्ष उमेश नेरुरकर यांच्या हस्ते समुद्राची विधिवत पूजा करून समुद्राला नारळ अर्पण करण्यात आला.

यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर,व्यापारी संघाचे उपाध्यक्ष नाना पारकर, माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, माजी बांधकाम सभापती मंदार केणी, नितीन वाळके, शहरप्रमुख बाबी जोगी, युवासेना तालुका समन्वयक मंदार ओरसकर, उपशहर प्रमुख सन्मेश परब, युवासेना उपतालुका प्रमुख अमित भोगले,महिला तालुका प्रमुख दिपा शिंदे, किरण वाळके, महेश जावकर,तपस्वी मयेकर, हेमंत मोंडकर,महेंद्र म्हाडगुत, नरेश हुले, सुहास वालावलकर,नवनाथ धुरे यांसह व्यापारी संघाचे पदाधिकारी, मालवण मधील ग्रामस्थ व मच्छिमार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

two × 1 =