You are currently viewing सुरक्षेसाठी झटत ‘बंधुत्वाचे’ कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांना राष्ट्रवादीतर्फे ‘रक्षाबंधन’

सुरक्षेसाठी झटत ‘बंधुत्वाचे’ कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांना राष्ट्रवादीतर्फे ‘रक्षाबंधन’

सुरक्षेसाठी झटत ‘बंधुत्वाचे’ कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांना राष्ट्रवादीतर्फे ‘रक्षाबंधन’

उपविभागीय पोलीस अधिकारी संध्या गावडे यांच्यासह पोलीस बांधवांना बांधली राखी

राष्ट्रवादी महिला व युवती काँग्रेसचा अनोखा उपक्रम

सावंतवाडी

आपण समस्त देशबांधव विविध सण उत्सव साजरे करत असताना आपले पोलिस बांधव व भगिनी मात्र आपल्या सुरक्षेसाठी अहोरात्र ‘ऑन ड्युटी’ असतात. देशबांधवांची रक्षा करून खऱ्या अर्थाने बंधुत्वाचे कर्तव्य पोलिस बांधव अथकपणे पार पाडत असतात. त्यांच्या या सेवेप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठीच राष्ट्रवादी महिला काँग्रेस व राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्यावतीने रक्षाबंधनाचे औचित्य साधून यशवंतराव चव्हाण सेंटर, विभागीय कार्यालय, सावंतवाडी येथे पोलिस बंधू भगिनींना राखी बांधण्याचा सोहळा आयोजित करण्यात आला.

यावेळी पोलिस उपअधीक्षक संध्या गावडे यांच्यासह पोलिस कर्मचारी गोविंद हिर्लेकर, रामदास चव्हाण, अमित राऊळ यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महिला पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या हस्ते राखी बांधली. नागरिकांच्या सुरक्षेसाठी त्यांच्या हातून घडत असलेल्या सेवेबद्दल कृतज्ञता व्यक्त करून पोलीस प्रशासनाला संपूर्ण सहकार्याचे आश्वासन या वेळी दिले.

या प्रसंगी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या कोकण विभाग अध्यक्ष अर्चनाताई घारे यांच्यासह युवती जिल्हाध्यक्ष सावली पाटकर, सावंतवाडी शहराध्यक्ष ॲड. सायली दुभाषी, चराठे ग्रामपंचायत सदस्य गौरी गावडे, अल्पसंख्याक सेल महिला तालुकाध्यक्ष मारिता फर्नांडिस, पुजा दळवी, सिद्धी परब, साईशा साटम आदी पदाधिकारी उपस्थित होत्या.

प्रतिक्रिया व्यक्त करा