*डॉ नरेंद्रनाथ पांडे यांचा जन्मदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा*
—————————————-
*गोरक्षण स्थळी वृक्षारोपण तथा बेलोरा येथे शालेय बालकांना खाऊ वाटप*
—————————————-
*देशातील आय ए एस अधिकाऱ्यांचे कार्य वंदनिय*
— — — — प्रा. गजानन भारसाकळे
—————————————-
*दर्यापूर*: अमरावती विभागात आपल्या कार्यशैलीने वैशिष्टपूर्ण कार्य करून कार्यरत असलेल्या विभागीय आयुक्त डॉ निधी पांडे यांचे वडील माजी आय ए एस अधिकारी नरेंद्रनाथ पांडे यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून स्थानिक गाडगेबाबा मंडळाचे अध्यक्ष प्रा . गजानन भारसाकळे यांनी पर्यावरण तथा शिक्षण सेवेतील उपक्रम राबवून ही सेवा पांडे परिवाराला अर्पण केली . देशातील सर्व कार्यतत्पर तथा कर्तव्यनिष्ठ आय ए एस अधिकारी वर्ग यांचे कार्य देशहिताचे ठरत असल्याने देशवासीयांना वंदनिय असल्याचे भावपूर्ण प्रतिपादन प्रा. भारसाकळे यांनी या प्रसंगा निमित्याने केले . तालुक्यातील माहुली ( धांडे ) येथील गोरक्षणस्थळावर दर्यापूर आसेगांव रोड बाजूंनी बाद झालेल्या वृक्षारोपण जागी पुनःच्य गोरक्षण परीसरातील आजू बाजूच्या शेतातील शेतकरी – शेतमजुर पुरुष – महिला यांचे उपस्थितीत दोन झाडांचे वृक्षारोपण करून प्रा. भारसाकळे यांनी आपल्या या भागातील मागील पाच वर्षाच्या दहा किलोमीटर वृक्षारोपण तथा संगोपण सेवा कार्याला उजाळा दिला . याचवेळी तालुक्यातील याच रोडवरील बेलोरा या जन्मगावी त्यांनी गावातील जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळेत जाऊन शालेय विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करून या बालकांशी शैक्षणिक संवाद साधत पर्यावरण विषयी मार्गदर्शनही केले . यावेळी त्यांनी बालकांना पोळ्यासाठी मातीचे बैल व गणोशोत्सवासाठी मातीचे गणपती तयार करण्याचे आवाहनही केले . या संपूर्ण उपक्रमात वृक्षारोपण कार्यासाठी गो -सेवक संतोष गवई , श्रीकृष्ण पोटे , रघुनाथ भारसाकळे यांच्यासह सर्व शेतकरी शेतमजूर बंधू – भगिनी यांनी तसेच बेलोरा येथील प्राथमिक शाळेत शाळेचे मुख्याध्यापक संजय कळस्कर व शिक्षक सुनिल मोहोड यांच्यासह संतोष रानगट, सौ नानीबाई
रानगट तसेच बेलोरा ग्रा पं कर्मचारी विनोद तराळ तथा गावातील नागरीक गोपाळ भारसाकळे , प्रफुल्ल भारसाकळे , अनिल पंजाबराव भारसाकळे , रामा निंबाळकर यांचे सहकार्य लाभले . शाळेचे मुख्याध्यापक यांनी या विधायक कार्याबाबत प्रा. गजानन भारसाकळे यांचे आभार व्यक्त केले . या उपक्रमाची सांगता प्रा. भारसाकळे यांनी बेलोरा येथील स्मशान भूमी परीसरात वृक्षारोपण करून केली व हा कार्यक्रम डॉ पंजाबराव देशमुख आय ए एस अकादमीचे संचालक प्रा. डॉ नरेशचंद्र काठोळे यांच्या आय ए एस अकादमीला चित्रीत करून सुर्पूद केला . या निमित्याने स्थानिक गाडगेबाबा मंडळाने अमरावती विभागीय आयुक्त डॉ निधी पांडे यांना शुभेच्छा देऊन अभिनंदन केले आहे .
*संवाद मीडिया*
🚇🚆🚆रेल्वेकडून विशेष सहलीची योजना, इन्डियन रेलवे केटरिंग व टूरिज़म कडून ‘ *उत्तर भारत देवभूमी यात्रा* भारत गौरव स्पेशल पर्यटन रेल्वे’ लोकांच्यासाठी स्वस्तात सहलीचे आयोजन 🚊🚉
चला मग, भारत गौरव ट्रेनने *हरिद्वार, ऋषिकेश, अमृतसर आणि माता वैष्णोदेवीचे दर्शन आणि मथुरा* फिरुया.
स्लीपर SL व 3AC, 2AC क्लास – ज्यामध्ये रेल्वे व बस प्रवास, भोजन व राहण्याचा खर्च शामिल आहे
निर्गमन- दि. 28/10/23 ते 05/11/23 (08 रात्र आणि 09 दिवस)
प्रवास खर्च फक्त:-
Package Category
1) Economy (SL)
₹ 15,300/-
2) Comfort (3AC)
₹ 27,200/-
3) Deluxe (2AC)
₹ 32,900/-
ज्यामध्ये भेटीची ठिकाणे-
28/10/23 – पुणेहुन प्रवास सुरुवात
29/10/23 – हरिद्वार येथे आगमन. हॉटेल चेक इन (हरिद्वार येथे रात्री मुक्काम). 30/10/23 – सकाळी न्याहारी नंतर ऋषिकेशचे स्थानिक प्रेक्षणीय स्थळ आणि हर की पौरी येथे गंगा आरती. नंतर अमृतसरकडे प्रस्थान. (रात्रभर ट्रेनचा प्रवास).
31/10/23 – अमृतसरला आगमन आणि सुवर्ण मंदिर, बाघा बॉर्डरला भेट. नंतर कटरा साठी प्रस्थान. (रात्रभर ट्रेनचा प्रवास).
01/11/23- कटरा येथे आगमन. सकाळी 10.30 वाजता हॉटेल चेक इन करून आणि माता वैष्णोदेवी दर्शनासाठी पूर्ण दिवस (कटरा येथे रात्री मुक्काम).
02/11/23 – संध्याकाळी मथुरा साठी प्रस्थान. (रात्रभर ट्रेनचा प्रवास).
03/11/23 – मथुरा येथे आगमन, फ्रेश होऊन नंतर वृंदावन आणि कृष्णजन्म-भूमीला भेट देणे संध्याकाळी उशिरा परतीचा प्रवास सुरू (रात्रभर ट्रेनचा प्रवास).
04/11/23 – ट्रेन प्रवास
05/11/23 गोड आठवणीने प्रवास समाप्त पुणे
बोर्डिंग आणि डी-बोर्डिंग पॉईंट्स: पुणे-लोणावळा-कर्जत-कल्याण-वसई रोड-वापी-सुरत-वडोदरा
समाविष्टितसेवा व् सुविधा-
1) Economy Category – Sleeper class Train Journey, Basic Onboard & Offboard Meals, Stay in Non AC Hotels on TWIN/ TRIPLE, Wash n Change on Multi Share in Non AC Hotel Room (Maximum 5 PAX in One Room), Non AC Transport
2) Comfort Category 3AC Train Journey, Basic Onboard & Offboard Meals, Stay in AC Budget Hotels on TWIN/ TRIPLE, Wash n Change on TWIN/ TRIPLE, in AC Hotel Room, AC Transport
3) Deluxe Category –2AC Train Journey, Basic Onboard & Offboard Meals, Stay in AC Budget Hotels on TWIN/ TRIPLE, Wash n Change on TWIN/ TRIPLE, in AC Hotel Room, AC Transport
*अधिक माहिती व बुकिंग करिता संपर्क* – *संजना टूर्स अँड ट्रॅव्हल्स* 🚘🚎✈️🚆
☎️ *7350 7350 91/7350 534 534*
*जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/107588/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*