You are currently viewing वीज ग्राहक संघटना सिंधुदुर्गची बैठक ग्रामपंचायत आंब्रड येथे संपन्न

वीज ग्राहक संघटना सिंधुदुर्गची बैठक ग्रामपंचायत आंब्रड येथे संपन्न

*वीज वितरण कुडाळचे अभियंता श्री.दानोरे व श्री.मिसाळ यांची उपस्थिती*

 

कुडाळ :

 

वीज ग्राहक संघटना सिंधुदुर्ग यांच्या आयोजनातून वीज ग्राहकांच्या बैठकीचे आयोजन आंब्रड दशक्रोशीत करण्यात आले होते. या बैठकीच्या माध्यमातून सणासुदीच्या काळात खंडित होणारा वीजपुरवठा, वाढीव वीज बिले, जिर्ण पोल बदलणे, आंब्रड घोडगे दशक्रोशीसाठी वेगळे सबस्टेशन, आंब्रड कुंदे सह आजूबाजूच्या गावांना बोर्डवे येथून महावितरण स्कीम अंतर्गत वेगळी वीज जोडणी, आंब्रड या विस्ताराने मोठ्या व १४०० वीज जोडण्या असलेल्या गावासाठी अतिरिक्त वायरमन देणे, वीज वाहिन्यांना लागणाऱ्या झाडांची छाटणी करणे अश्या अनेक समस्यांवर चर्चा करण्यात आली व महत्त्वाच्या समस्येवर चतुर्थीपूर्वी मार्ग काढून वीज पुरवठा सुरळीत सुरू ठेवण्याचे महावितरण आश्वासन महावितरणच्या अधिकाऱ्यांकडून देण्यात आले.

दरम्यान आंब्रड गाव व दशक्रोशी मोठी असल्याने सबस्टेशनाची मागणी दशक्रोशीतील सर्व गावंच्या वतीने करण्यात आली. या बैठकीसाठी महावितरण कडून कार्यकारी अभियंता महावितरण विभागीय कार्यालय कुडाळ सन्मा.श्री.अजितपाल सिंग दिनोरे साहेब, एक्झिक्युटिव्ह इंजिनिअर सन्मा.श्री.मिसाळसाहेब, उप अभियंता कडावल सन्मा.श्री.भोये साहेब तर वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष सन्मा.श्री.श्रीराम शिरसाट, वीजग्राहक संघटना जिल्हा समन्वयक सन्मा.श्री.नंदन वेंगुर्लेकर, उपाध्यक्ष श्री.दीपक पटेकर, कुडाळ ता.सदस्य साईनाथ आंबेरकर, जि.प.सदस्य लॉरेन्स मान्येकर, सरपंच सौ.मानसी कदम, पोखरण सरपंच जाधव, कुंदे सरपंच सचिन तायशेट्ये, आंब्रड उपसरपंच विठ्ठल तेली, माजी सरपंच संदीप परब, आबा मुंज, स्वप्निल मुंज, पांडुरंग दळवी, पोलीस पाटील देवेंद्र दळवी, तात्या आंगणे व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा