You are currently viewing शाहरुख खानच्या ‘मन्नत’ बाहेर आंदोलन; पोलिसांनी वाढवली सुरक्षा

शाहरुख खानच्या ‘मन्नत’ बाहेर आंदोलन; पोलिसांनी वाढवली सुरक्षा

*शाहरुख खानच्या ‘मन्नत’ बाहेर आंदोलन; पोलिसांनी वाढवली सुरक्षा*

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) :

बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान त्याच्या आगामी ‘जवान’ चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. आता चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी अवघे काही दिवस उरले आहेत. दरम्यान, काही संघटनांनी किंग खानच्या ‘मन्नत’ घराबाहेर निदर्शने केली. पण मुंबई पोलिसांनी त्यांना मनमानी करू दिली नाही आणि अभिनेत्याच्या घराबाहेर सुरक्षा वाढवली.

जाणकार्‍यांच्या माहितीनुसार, ऑनलाइन गेमिंग अॅपला सपोर्ट केल्याबद्दल अभिनेत्याचा निषेध करण्यासाठी काही लोक जमले होते. याबाबतची माहिती मुंबई पोलिसांना मिळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचून पाच जणांना अटक केली आणि तेथील बंदोबस्त वाढवला. या आंदोलकांनी दुपारी एकच्या सुमारास शाहरुख खानच्या घराबाहेर आंदोलन करण्याचा प्रयत्न केला. सध्या शाहरुख खानच्या घराबाहेर कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

वास्तविक, ही बाब ऑनलाइन गेमिंग जाहिरातीशी संबंधित आहे. शाहरुख खानने काही दिवसांपूर्वी ऑनलाइन गेमिंग अॅपची जाहिरात केली होती. ज्यामुळे त्याच्या विरोधात निदर्शने झाली होती. या जाहिरातींमध्ये प्रसिद्ध अभिनेते, अभिनेत्री काम करतात, हे समाजाची दिशाभूल करण्याचे काम असल्याचे आंदोलकांचे म्हणणे आहे, असे फाऊंडेशनचे अध्यक्ष कृष्णचंद्र अदल यांनी सांगितले.

शाहरुख खान सध्या त्याच्या आगामी ‘जवान’ चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. त्याचा चित्रपट ७ सप्टेंबर २०२३ रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. ज्यामध्ये किंग खान व्यतिरिक्त अनेक साऊथ सुपरस्टार देखील महत्त्वाच्या भूमिका साकारताना दिसणार आहेत. शाहरुख खान पहिल्यांदाच विजय सेतुपती आणि नयनतारा सोबत दिसणार आहे. यासोबतच दीपिका पदुकोणही या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. सध्या शाहरुख खानच्या जवानाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.

संवाद मिडिया*

*सुवर्ण संधी!सुवर्ण संधी!!फिजियोथेरेपी डॉक्टर होण्याची सुवर्ण संधी!!!*

*बॅचलर ऑफ फिजियोथेरेपी(B.P.Th)* करण्याची सुवर्णसंधी.

Affiliated to MUHS,Nashik,DMER व महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त कॉलेज मध्ये

*प्रवेश सुरु -शैक्षणिक वर्ष 2023-2024*

*श्री रामराजे कॉलेज ऑफ फिजियोथेरेपी , दापोली.*

*COLLEGE CODE-6191*

*बॅचलर ऑफ फिजियोथेरेपी(B.P.Th)*
Eligibility- 12th Science (PCB)With NEET and Must Registered with CET Cell can apply.

• Duration : 4.5 Years

*👉मागासवर्गीय विद्यार्थांना शिष्यवृत्ती.(शासन नियमानुसार).*

*पत्ता:*
प्रांत ऑफिस जवळ,दापोली, ता. दापोली, जिल्हा रत्नागिरी, 415712

*संपर्क:*
📲 9145623747/ 9420156771/7887561247*

*जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/107166/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा