You are currently viewing दोडामार्ग तालुक्यात अवैध दारू विक्री जोमात….

दोडामार्ग तालुक्यात अवैध दारू विक्री जोमात….

दोडामार्ग
दोडामार्ग तालुक्यात राजरोस पणे दारू विक्री चालू आहे,विक्रेत्यांना कुणाचा वरदहस्त आहे हेच शोधणं गरजेचे आहे,कारण याच दारूमुळे आज कितीतरी कुटुंब उद्वस्त झाली आहेत. तालुक्यात गेल्या कित्येक दिवसांपासून अवैध दारू विक्री केली जात आहे,दोडामार्ग तालुक्याला गोवा राज्याची सिमा लागून असल्यामुळे तिकडून तालुक्यात दारू येत असते तरी मात्र प्रशासनाकडून डोळ्यावर हात ठेवण्याची भूमिका घेतली जात असल्यामुळे अवैध रित्या दारू विक्री जोमात सुरू असल्याचे चित्र तालुक्यात आहे. प्रशासन मात्र दारू तस्करीवर थातुरमातुर कारवाई करून आपण केलेली कारवाई योग्य असल्याची वरीष्ठ अधिकाऱ्यांना भासवून येथील अट्टल दारू विक्रेत्याकडे प्रशासन का दुर्लक्ष करीत आहे हा सामान्य नागरिकांमध्ये चर्चेचा विषय बनला आहे. मद्यपी आपली हौस भागवण्यासाठी ठरवून दिलेल्या किंमती पेक्षा दुप्पट पैसे देऊन दारू विकत घेत आहेत, अश्यातच दारू विक्रेता दुप्पट नफा कमावित असल्याने नीट उभा होत असलेला सुखी संसाराचा डोलारा पुन्हा कोसळायला सुरुवात होणार काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे. तालुक्यात अवैध दारू विक्री करणाऱ्यावर प्रशासन कधी तरी कठोर कारवाई करणार का ? या प्रश्नाचे उत्तम अनुत्तरितच आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा