You are currently viewing ज्ञानदीप शिक्षण मंडळाकडून पंचरत्नांचा गौरव

ज्ञानदीप शिक्षण मंडळाकडून पंचरत्नांचा गौरव

*ज्ञानदीप शिक्षण मंडळाकडून पंचरत्नांचा गौरव*

सावंतवाडी :

‘ज्ञानदीप’ शिक्षण मंडळाचे कार्य नेहमीच प्रेरणादायी राहिले आहे. गुणवंत विद्यार्थ्यांच्या पाठीवर थाप देणे, हा ज्ञानदीपचा विशेष गुण असून आतापर्यंत शेकडो गुणीजणांचा गौरव करून ज्ञानदीपने आपले आदर्श कार्य समाजासमोर ठेवले आहे, असे गौरवोद्गार सुप्रसिद्ध इतिहासकार व साहित्यिक डॉ. जी. ए. बुवा यांनी येथे व्यक्त केले. ज्ञानदीप मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘पंचरत्नांचा सन्मान’ कार्यक्रमात डॉ. बुवा बोलत होते.

येथील शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक व क्रीडा क्षेत्रात अग्रगण्य असलेल्या ज्ञानदीप शिक्षण विकास मंडळातर्फे आज विविध क्षेत्रात विशेष प्राविण्य मिळवलेल्या गुणवंतांचा सन्मान करण्यात आला आहे. यात अभिनव वैज (कृषी अधिकारी), रुपेश कांबळे ( कृषी अधिकारी), तनया वाडकर (LLB विशेष प्रविण्य), कु. आरती चिटणीस (AIR – 5 In PG Medical) कु. स्वरंगी खानोलकर (R. D. Pared Delhi, NCC ) यांचा सन्मान शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन करण्यात आला. मानाचा फेटा हा या सन्मानाच विशेष स्वरूप होत.

सावंतवाडीतील श्रीराम वाचन मंदिरात हा सन्मान सोहळा संपन्न झाला. आरती मंगेश चिटणीस हिने अखिल भारतीय आयुष स्नातकोत्तर प्रवेश परीक्षेत (एमडी) देशात पाचवा क्रमांक पटकाविला. स्वरांगी संदीप खानोलकर एनसीसी कॅडेट ही दिल्ली येथे झालेल्या मुख्य गणतंत्र दिवस परेडमध्ये सहभागी झाली होती. ज्युनियर डिव्हिजन एनसीसी मुलींमधून अशी कामगिरी करणारी जिल्ह्यातील ती पहिलीच विद्यार्थीनी ठरली. तनया रामचंद्र वाडकर बी.ए.एलएलबी परिक्षेत सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या मॉडर्न लाॅ काॅलेज पुणे येथून डिस्टिंक्शनसह प्रथम वर्गात उत्तीर्ण झाली तसेच पाचही वर्ष पहिली येण्याचा बहुमान पटकावला. अभिनव वैज हा महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या महाराष्ट्र कृषी सेवा परीक्षा 2022 मधून तालुका कृषी अधिकारी राजपत्रित गट ब (वरिष्ठ) कृषी विभाग महाराष्ट्र शासनाच्या पदी निवड झाली. रूपेश कांबळे हा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची तालुका कृषी अधिकारी परिक्षा उत्तीर्ण झाला. या पंचरत्नांचा सत्कार ज्ञानदीप शिक्षण विकास मंडळाच्यावतीने करण्यात आला.

दरम्यान ज्ञानदीपचे संस्थापक अध्यक्ष वाय. पी. नाईक म्हणाले, गेली सतरा वर्षे ज्ञानदीप मंडळ समाजाभिमुख कार्य करीत आले असून समाजातील तळागाळातील गुणीजनांचा सन्मान करून त्यांना भविष्यात चांगले काम करण्याची ऊर्जा मिळेल हेच ध्येय ठेवून ज्ञानदीप अविरत कार्य करीत आहे. आगामी काळातसुद्धा समाजातील गुणवंतांचा सन्मान करून त्यांना योग्य ते मार्गदर्शनही करण्याची जबाबदारी ज्ञानदीप समर्थपणे पुढे नेणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी सत्कारमूर्ती अभिनव वैज, संतोष वैज व सहाय्यक शिक्षक श्री भुरे यांनीही मनोगत व्यक्त केली.

कार्यक्रमास ज्येष्ठ इतिहास तज्ज्ञ डॉ. जी. ए. बुवा, ज्ञानदीप शिक्षण विकास मंडळाचे संस्थापक अध्यक्ष वाय. पी. नाईक, विद्याधर भागवत, अध्यक्ष जावेद शेख, उपाध्यक्ष प्रा. रुपेश पाटील, सहसचिव विनायक गांवस, खजिनदार एस. आर. मांगले, रामचंद्र वाडकर, भरत गावडे, विठ्ठल कदम, प्रज्ञा मातोंडकर, प्रा. प्रतिभा चव्हाण, संतोष वैज, श्री. भुरे, ऋतुजा सावंत-भोसले, रतेश कांबळे, दत्ताराम सावंत, रामदास पारकर व इतर मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. रुपेश पाटील यांनी केले. सूत्रसंचालन विनायक गांवस तर आभार प्रज्ञा मातोंडकर यांनी मानले.

*संवाद मिडिया*

*🎊विशेष सूट…!!🎊विशेष सूट…!!🎊विशेष सूट…!!🎊*🏃‍♀️🏃‍♂️

🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
*खास स्वातंत्र्यदिनानिमित्त तब्बल *💫50% सूट..!!💫*

*_🏢सावंतवाडीचे प्रसिद्ध*

*👗किया फॅशन👘*

*कपड्याचे दालन घेऊन आले आहेत प्रत्येक खरेदीवर तब्बल 💫५० टक्के पर्यतची सूट..!!💫*

*_👼👧🧒लहान मुलांसह महिलांना 👩‍⚖️ लागणारे फॅन्सी कपडे 👘 २०० पासून अगदी २ हजारापर्यंत🤗_*

*_रेडीमेड ड्रेस 👘, लेगिन्स👖, प्लाझो👖, कुर्ती👘, कॉटन पॅन्ट👖, नाईटी 👘आणि बरेच काही…!!🤗_*

*_त्याचबरोबर नवजात बालकांपासून👶🏻 पंधरा वर्षापर्यंतच्या मुलांचे 👦🏻कपडे उपलब्ध…!!🤗_*

*🎴आमचा पत्ता:-*
*दत्तात्रय निवास-गांधी चौक, सावंतवाडी, शॉप नंबर १५, तारा हॉटेल समोर*

*◾प्रोप्रा:-*
*सौ. निकीता नंदादिप चोडणकर*

*📲संपर्क:-*
*9403920802*

*जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/106270/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा