You are currently viewing रॉनी रॉड्रिग्स यांच्या पीबीसी एज्युकेशन अँड फायनान्शिअल सर्व्हिसेसचा शुभारंभ

रॉनी रॉड्रिग्स यांच्या पीबीसी एज्युकेशन अँड फायनान्शिअल सर्व्हिसेसचा शुभारंभ

*रॉनी रॉड्रिग्स यांच्या पीबीसी एज्युकेशन अँड फायनान्शिअल सर्व्हिसेसचा शुभारंभ*

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) :

प्रसिद्ध उद्योजक आणि सिनेबस्टर मॅगझिनचे मालक रॉनी रॉड्रिग्स यांनी शिक्षण क्षेत्रात पाऊल टाकले आहे. मुंबईतील जे. डब्ल्यू. मेरियट हॉटेलमध्ये झालेल्या एका शानदार कार्यक्रमात त्यांनी पीबीसी एज्युकेशन अँड फायनान्शिअल सर्व्हिसेस प्रा. लि. चा शुभारंभ केला. डॉ. राजा रॉय चौधरी हे या सर्व्हिसेसचे प्रमुख सल्लागार आहेत. यावेळी प्रसिध्द निर्माता, दिग्दर्शक धीरज कुमार, अभिनेता दर्शन कुमार, अभिनेत्री नायर बॅनर्जी, दिलीप सेन, पंकज बेरी, आरती नागपाल यांच्या बरोबर अनेक मान्यवर पाहुणे उपस्थित होते.

सांताक्रुझ येथील पीबीसी एज्युकेशन अँड फायनान्शिअल सर्व्हिसेस प्रा. लि. च्या कार्यालयाचे उद्घाटन केल्यानंतर मेरियट मधील पत्रकार परिषदेत बोलताना आपली कंपनी प्रामाणिकपणे उच्च शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन आणि आर्थिक सेवा मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असेल असा विश्वास रॉनी रॉड्रिग्स यांनी व्यक्त केला. अनेकदा परदेशी शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन मिळत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना अनाठायी भरपूर खर्च करावा लागतो. काही कन्सल्टंट इच्छुक विद्यार्थ्यांकडे शेवटच्या क्षणी अवाढव्य रकमेची मागणी करतात. आधी एक रक्कम सांगून ऐन मोक्याच्या क्षणी २०-२५ लाखांची मागणी एका विद्यार्थ्यांकडे केल्याचे मी स्वतः पाहिले आहे. यामुळे विद्यार्थी विनाकारण कर्जाच्या ओझ्याखाली दबले जातात. आपल्या कंपनीचे तत्वच आम्ही ईमानदारीने काम करण्यावर विश्वास ठेवतो असे असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
आपल्या नव्या शैक्षणिक कंपनीच्या माध्यमातून नाममात्र दरात सेवा उपलब्ध होईल, तसेच सक्षम विद्यार्थ्यांना कडक नियम वगळून कर्ज उपलब्ध करून देण्याची योजना असल्याचेही त्यांनी सांगितले.

कंपनीकडे पीजी कॅम्पसचे कुलगुरू आणि इंदौरच्या प्रेस्टिज इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्चच्या डिपार्टमेंट ऑफ लॉचे संचालक डॉ. राजा रॉय चौधरी यांच्यासारखे विशेषज्ञ आहेत. त्यांचा शिक्षण क्षेत्रातला अनुभव विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त ठरू शकतो.

कंपनीचे काम सुकर होण्यासाठी अमेरिका, सिंगापूरमधील कंपन्या जोडल्या गेल्या असून पुढच्या टप्प्यात युके, कॅनडा, युरोपपर्यंत विस्तार होणार आहे. आयआयटीचे डॉ. किरण कदम अमेरिकेतील कार्यालयाचे स्थानिक संचालक आहेत, तर धर्मराज थंगराज सिंगापूरचे व्यवस्थापन सांभाळणार आहेत. तर रॉनी रॉड्रिग्स हे अमेरिका आणि सिंगापूर येथील दोन्ही कंपन्यांचे संचालक आहे. भारतात निशा वर्मा कंपनीचे काम पाहणार असून कीर्तिकुमार कदम हे पीबीसी एज्युकेशन अँड फायनान्शिअल सर्विसेस प्रायव्हेट लिमिटेड, पीबीसी एज्युकेशन अँड फायनान्शिअल सर्विसेस एलएलसी (यूएसए) और पीबीसी एज्युकेशन अँड फायनान्शिअल सर्विसेस प्रायव्हेट लिमिटेड, (सिंगापूर) या तीन कंपन्यांचे संचालक असून मुंबई कार्यालयाचे कामही पाहणार आहेत. नाजनीन बराय शैक्षणिक कर्जा संदर्भात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतील, तर
सुज़ाना अलफोंसो मार्केटिंग आणि दिपेश सोमैया ट्रॅव्हल पार्टनर म्हणून काम पाहणार आहेत.

*संवाद मिडिया*

*सुवर्ण संधी!सुवर्ण संधी!!फिजियोथेरेपी डॉक्टर होण्याची सुवर्ण संधी!!!*

*बॅचलर ऑफ फिजियोथेरेपी(B.P.Th)* करण्याची सुवर्णसंधी.

Affiliated to MUHS,Nashik,DMER व महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त कॉलेज मध्ये

*प्रवेश सुरु -शैक्षणिक वर्ष 2023-2024*

*श्री रामराजे कॉलेज ऑफ फिजियोथेरेपी , दापोली.*

*COLLEGE CODE-6191*

*बॅचलर ऑफ फिजियोथेरेपी(B.P.Th)*
Eligibility- 12th Science (PCB)With NEET and Must Registered with CET Cell can apply.

• Duration : 4.5 Years

*👉मागासवर्गीय विद्यार्थांना शिष्यवृत्ती.(शासन नियमानुसार).*

*पत्ता:*
प्रांत ऑफिस जवळ,दापोली, ता. दापोली, जिल्हा रत्नागिरी, 415712

*संपर्क:*
📲 9145623747/ 9420156771/7887561247*

*जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/107166/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा