You are currently viewing “गझल हा अभिव्यक्तीचा उत्कट काव्यप्रकार!” – मसूद पटेल

“गझल हा अभिव्यक्तीचा उत्कट काव्यप्रकार!” – मसूद पटेल

*”गझल हा अभिव्यक्तीचा उत्कट काव्यप्रकार!” – मसूद पटेल

पिंपरी

“गझल हा अभिव्यक्तीचा उत्कट काव्यप्रकार आहे!” असे मत ज्येष्ठ गझलकार मसूद पटेल यांनी खुशबू, सिल्व्हर गार्डन, चिंचवडगाव येथे शनिवार, दिनांक २६ ऑगस्ट २०२३ रोजी व्यक्त केले. समरसता साहित्य परिषद, पिंपरी – चिंचवड शाखा आयोजित ‘साहित्य संवाद’ या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून मसूद पटेल बोलत होते. सतीशसिंह मालवे (अमरावती) आणि नीलेश शेंबेकर (पिंपरी – चिंचवड) यांच्या गझलांचे सादरीकरण आणि त्यावर ज्येष्ठ गझलकार रघुनाथ पाटील यांनी केलेले भाष्य असे कार्यक्रमाचे स्वरूप होते. ज्येष्ठ साहित्यिक प्रा. तुकाराम पाटील, नंदकुमार मुरडे, प्रदीप गांधलीकर, सुहास घुमरे, प्रा. दिनेश भोसले, प्रशांत पोरे, हेमंत जोशी, संदीप जाधव, समरसता साहित्य परिषद पिंपरी – चिंचवड शाखेचे उपाध्यक्ष अरविंद दोडे यांची प्रमुख उपस्थिती होती. समरसता साहित्य परिषद पिंपरी – चिंचवड शाखाध्यक्ष उज्ज्वला केळकर यांनी प्रास्ताविकातून उपक्रमाची माहिती दिली.

यावेळी सतीशसिंह मालवे आणि नीलेश शेंबेकर यांनी सादर केलेल्या गझलांना उपस्थितांनी उत्स्फूर्त दाद दिली. भाष्यकार रघुनाथ पाटील म्हणाले की, “आयुष्य समर्पित करून सुरेश भटसाहेबांनी मराठीत गझल रुजवली. त्यामुळे मराठी गझलकारांच्या सशक्त पिढ्या निर्माण झाल्या आहेत. “गावाकडे भले माझे शिवार नाही…” ही मालवे यांची रचना रानकवी ना. धों. महानोर यांच्या कवितेची आठवण करून देते.‌ ‘माणसे’ ही गझल माणसातील वृत्ती-प्रवृत्तींचे दर्शन घडवते; तर ‘पक्षी’ ही रचना प्रत्येक कष्टकरी बापाला मानवंदना देते. “या नभाचे त्या नभाशी काही न देणे घेणे…” ही शेंबेकर यांची अतिशय तरल अभिव्यक्ती ते नव्या पिढीतील एक दमदार गझलकार आहेत, या गोष्टीचा प्रत्यय देणारी आहे.

अभय पोकर्णा, मीना पोकर्णा, कैलास भैरट, जयश्री श्रीखंडे, राजेंद्र भागवत, सुप्रिया लिमये यांनी संयोजनात सहकार्य केले. समृद्धी सुर्वे यांनी सूत्रसंचालन केले. शोभा जोशी यांनी आभार मानले.

– प्रदीप गांधलीकर
९४२१३०८२०१
७४९८१८९६८२

*संवाद मीडिया*

🚇🚆🚆रेल्वेकडून विशेष सहलीची योजना, इन्डियन रेलवे केटरिंग व टूरिज़म कडून ‘ *उत्तर भारत देवभूमी यात्रा* भारत गौरव स्पेशल पर्यटन रेल्वे’ लोकांच्यासाठी स्वस्तात सहलीचे आयोजन 🚊🚉
चला मग, भारत गौरव ट्रेनने *हरिद्वार, ऋषिकेश, अमृतसर आणि माता वैष्णोदेवीचे दर्शन आणि मथुरा* फिरुया.

स्लीपर SL व 3AC, 2AC क्लास – ज्यामध्ये रेल्वे व बस प्रवास, भोजन व राहण्याचा खर्च शामिल आहे
निर्गमन- दि. 28/10/23 ते 05/11/23 (08 रात्र आणि 09 दिवस)
प्रवास खर्च फक्त:-
Package Category
1) Economy (SL)
₹ 15,300/-
2) Comfort (3AC)
₹ 27,200/-
3) Deluxe (2AC)
₹ 32,900/-

ज्यामध्ये भेटीची ठिकाणे-
28/10/23 – पुणेहुन प्रवास सुरुवात
29/10/23 – हरिद्वार येथे आगमन. हॉटेल चेक इन (हरिद्वार येथे रात्री मुक्काम). 30/10/23 – सकाळी न्याहारी नंतर ऋषिकेशचे स्थानिक प्रेक्षणीय स्थळ आणि हर की पौरी येथे गंगा आरती. नंतर अमृतसरकडे प्रस्थान. (रात्रभर ट्रेनचा प्रवास).
31/10/23 – अमृतसरला आगमन आणि सुवर्ण मंदिर, बाघा बॉर्डरला भेट. नंतर कटरा साठी प्रस्थान. (रात्रभर ट्रेनचा प्रवास).
01/11/23- कटरा येथे आगमन. सकाळी 10.30 वाजता हॉटेल चेक इन करून आणि माता वैष्णोदेवी दर्शनासाठी पूर्ण दिवस (कटरा येथे रात्री मुक्काम).
02/11/23 – संध्याकाळी मथुरा साठी प्रस्थान. (रात्रभर ट्रेनचा प्रवास).
03/11/23 – मथुरा येथे आगमन, फ्रेश होऊन नंतर वृंदावन आणि कृष्णजन्म-भूमीला भेट देणे संध्याकाळी उशिरा परतीचा प्रवास सुरू (रात्रभर ट्रेनचा प्रवास).
04/11/23 – ट्रेन प्रवास
05/11/23 गोड आठवणीने प्रवास समाप्त पुणे
बोर्डिंग आणि डी-बोर्डिंग पॉईंट्स: पुणे-लोणावळा-कर्जत-कल्याण-वसई रोड-वापी-सुरत-वडोदरा

समाविष्टितसेवा व् सुविधा-
1) Economy Category – Sleeper class Train Journey, Basic Onboard & Offboard Meals, Stay in Non AC Hotels on TWIN/ TRIPLE, Wash n Change on Multi Share in Non AC Hotel Room (Maximum 5 PAX in One Room), Non AC Transport

2) Comfort Category 3AC Train Journey, Basic Onboard & Offboard Meals, Stay in AC Budget Hotels on TWIN/ TRIPLE, Wash n Change on TWIN/ TRIPLE, in AC Hotel Room, AC Transport

3) Deluxe Category –2AC Train Journey, Basic Onboard & Offboard Meals, Stay in AC Budget Hotels on TWIN/ TRIPLE, Wash n Change on TWIN/ TRIPLE, in AC Hotel Room, AC Transport

*अधिक माहिती व बुकिंग करिता संपर्क* – *संजना टूर्स अँड ट्रॅव्हल्स* 🚘🚎✈️🚆
☎️ *7350 7350 91/7350 534 534*

*जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/107588/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा

12 − 1 =