*वीज ग्राहकांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी सोमवारी महावितरण अधिकाऱ्यांची घेणार भेट*
सावंतवाडी :
आज वीज ग्राहक संघटनेची, सावंतवाडी तालुका कार्यकारिणी बैठक संपन्न झाली. आजच्या बैठकीत तालुका *उपाध्यक्षपदी श्री.आनंद नेवगी तर सहसचिव पदी श्री दीपक पटेकर* यांची सर्वानुमते नियुक्ती करण्यात आली. यावेळी शहरासह तालुक्यातील विविध गावातून नागरिकांनी हजेरी लावली व वीज ग्राहकांना उद्भवणाऱ्या विविध समस्या सोडविण्या संदर्भात आपली मते मांडली व वीज ग्राहक संघटनेत सहभाग नोंदविला. सावंतवाडी शहरासह आजूबाजूच्या अनेक गावातील सरपंच, ग्रामस्थांनी यावेळी आपापल्या गावातील समस्या संघटनेकडे मांडल्या. सर्वांच्या समस्यांची दखल घेऊन रीतसर मार्गाने सोमवारी सकाळी ११.०० वाजता महावितरण कार्यालय सावंतवाडी येथे कार्यकारी अभियंता श्री.चव्हाण यांची भेट घेण्याचे ठरविण्यात आले. आजच्या प्रमाणेच सोमवारी तालुका वीज ग्राहक संघटना आणि सदस्य तक्रारदारांनी महावितरण सावंतवाडी कार्यालयात यावे असे आवाहन सावंतवाडी तालुका वीज ग्राहक संघटने तर्फे करण्यात आले. प्रास्ताविक श्री.निखिल नाईक यांनी तर आभार श्री.आनंद नेवगी यांनी मानले.
यावेळी श्री .जगदीश मांजरेकर , श्री. आनंद चंद्रकांत नेवगी, श्री.पुंडलिक दळवी, अध्यक्ष श्री. संजय लाड, सहसचिव श्री. दीपक पटेकर, पत्रकार श्री संतोष सावंत, श्री. सुभाष भीमसेन सावंत , श्री. उल्हास सावंत, श्री. नकुल पार्सेकर, श्री. मोतीलाल कामत , सौ. माधुरी वालावलकर, श्री. सुनील धोंडी सावंत, श्री. निलेश शिवाजी परब, श्री. कृष्णा जयराम गवस, श्री. शैलेश वा कुडतरकर, श्री. उल्हास नारायण सावंत, श्री. नंदु मोहन परब, श्री. संतोष हनुमंत तावडे, श्री. रामचंद्र महादेव राऊळ, श्री. अनिकेत सदानंद म्हाडगुत, संतोष तावडे, श्री.अनिल बाबुराव गोवेकर, श्री.उमाकांत वारंग, श्री.शिंदे, श्री.बाळा बोर्डेकर, श्री.तेंडोलकर आदी उपस्थित होते.