You are currently viewing  जिल्हास्तरीय शालेय तलवारबाजी क्रीडा स्पर्धेचा निकाल

 जिल्हास्तरीय शालेय तलवारबाजी क्रीडा स्पर्धेचा निकाल

 जिल्हास्तरीय शालेय तलवारबाजी क्रीडा स्पर्धेचा निकाल

सिंधुदुर्गनगरी

 जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामार्फत जिल्हास्तरीय शालेय तलवारबाजी क्रीडा स्पर्धा विद्यामंदीर प्रशाला कणकवली येथे आयोजन करण्यात आल्या होत्या,या स्पर्धेचा निकाल पुढील प्रमाणे आहे.

या स्पर्धेचे उद्घाटन  तहसीलदार दीक्षांत देशपांडे, कणकवली कॉलेज कणकवली चे प्राचार्य युवराज महालिंगे, यांचे हस्ते झाले.

यावेळी तालुका क्रीडा अधिकारी विजय शिंदे, कनिष्ठ लिपीक पंढरीनाथ चव्हाण, व तलवारबाजी संघटनेचे अध्यक्ष अच्युतराव वणवे, सचिव एकनाथ धनवटे हे उपस्थित होते.

ही स्पर्धा पार पाडण्यासाठी मुख्याध्यापक पी. जे. कांबळे, क्रीडा शिक्षक सुदिन पेडणेकर, संजय सावळ, जयश्री कसालकर, निलेश फोंडकर, अमोल चौगुले उपस्थित होते. या स्पर्धेचे पंच व तांत्रिक अधिकारी, ऍड. अक्षय कुलकर्णी, अंकुर जाधव, भावना ठाकूर हुमेरा मनसुरी, प्रथमेश घाडी, साहिल बाईत यांचे सहकार्याने स्पर्धा संपन्न झाल्या.

स्पर्धेचा निकाल पुढील प्रमाणे

14 वर्षाखालील मुले (फॉईल) प्रथम- लतिकेश संतोष धनवटे, व्दितीय- साहिल अडुळकर, तृतीय- तेज नारायण देसाई, सोहम संतोष देसाई.

14 वर्षाखालील मुली (ईपी) प्रथम- जिया जयदिप तळगांवकर, व्दितीय- भार्गवी मिथील दळवी, तृतीय- जान्हवी सचिन राणे.

14 वर्षाखालील मुली (फॉईल) प्रथम- राधिका पुरुषोत्तम कांबळी, व्दितीय- तनिष्का विकास मुद्रास,

17 वर्षाखालील मुले (सेबर) प्रथम- दिव्यांक विजय कोरगांवकर, व्दितीय- भार्गव प्रशांत गुळेकर, तृतीय- साहिल संग्राम अडुळकर, रोहन रतनलाल कुमावत.

17 वर्षाखालील मुले (ईपी) प्रथम- कुणाल निलेश नारकर, व्दितीय, साईराज विनायक वावरे,तृतीय- सौरभ प्रमोद नाईक, ऋतुराज कल्लापा होसूरकर.

17 वर्षाखालील मुले (फॉईल) प्रथम- प्रथमेश संग्राम अडुळकर व्दितीय- साईराज विनायक वावरे, तृतीय-  सौरभ प्रमोद नाईक, स्मित सुहास कदम

17 वर्षाखालील मुली (फॉईल) प्रथम – सबुरी मंगेश नानचे, व्दितीय- धन्वंतरी मनोज राणे, तृतीय – सोनिया संजय ढेकणे, सृष्टी प्रकाश मौर्य.

17 वर्षाखालील मुली (सेबर) प्रथम- ऋतुजा राजेश शिरवलकर व्दितीय – यशिका कल्पेश म्हाडेश्वर,तृतीय- प्रज्योती श्रीकांत जाधव ,सोनिया संजय ढेकणे

19 वर्षाखालील मुले (फॉईल) प्रथम- निवांत राजन चव्हाण, व्दितीय- गिरीष मनोज घाडीगांवकर

तृतीय-  ऋग्वेद रुपेश पिळणकर, तन्मय मिकाजी सावंत .

19 वर्षाखालील मुली (ईपी) प्रथम- मेहकीश इरफान मुल्ला, व्दितीय – संघमित्रा मनोज कदम

तृतीय –  रिया शांताराम कामतेकर, मधुरा शांताराम शिंदे.

या स्पर्धेमध्ये 9 शाळांमधुन एकुण 67 खेळाडु उपस्थित नोंदविली होती. तसेच प्राविण्य प्राप्त खेळाडूंचे अभिनंदन जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस यांनी केले.

००००

Regards :

District Information Office,
Sindhudurg.
diosindhudurg@gmail.com
02362-228859

Pl follow us on : 

Twitter :  https://twitter.com/InfoSindhudurg

blog :  https://diosindhu.blogspot.com

Facebook : https://www.facebook.com/profile.php?id=100009944297016

प्रतिक्रिया व्यक्त करा