You are currently viewing कासार्डेचे संजय पाताडे यांना ‘सिंधुदुर्ग जिल्हा भूषण’ पुरस्कार’ जाहीर..

कासार्डेचे संजय पाताडे यांना ‘सिंधुदुर्ग जिल्हा भूषण’ पुरस्कार’ जाहीर..

*२७ ऑगस्ट रोजी पूणे येथे होणार सन्मान सोहळा*

 

तळेरे: प्रतिनिधी

 

सिंधुदुर्ग जिल्हा उत्कर्ष मंडळ पिंपरी चिंचवड पुणे यांच्या वतीने दिला जाणारा सिंधुदुर्ग जिल्हा भूषण पुरस्कार कासार्डे दक्षिण गावठण येथील सामाजिक कार्यकर्ते श्री संजय संभाजी पाताडे यांना जाहीर आहे.

सिंधुदुर्ग जिल्हा उत्कर्ष मंडळ पिंपरी – चिंचवड, पुणे मंडळाच्या वतीने मंडळामध्ये काम करत जिल्ह्यांतर्गत काम करणाऱ्या कार्यकर्त्याला ‘सिंधुदुर्ग भूषण पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात येते.

श्री संजय पाताडे हे पुणे येथे स्थायिक असताना त्यांनी मंडळाच्या उत्कर्षासाठी खूप मोठे योगदान दिलं होतं त्याचप्रमाणे ते जनकल्याण प्रतिष्ठान, राष्ट्रतेज मित्र मंडळ, पतीत पावन संघटना या संस्थांच्या माध्यमातून सामाजिक कार्यामध्ये ही कार्यरत होते.

तसेच कोकणामध्ये स्थलांतरित झाल्यानंतरही ते विविध क्षेत्रांमध्ये कार्यरत आहेत तसेच कासार्डे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कासार्डे, सिनियर कॉलेज, कासार्डे, कासार्डे विकास मंडळ, मुंबई या शैक्षणिक संस्थांमध्ये ते सध्या स्थानिक व्यवस्था समितीचे कार्याध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत.

येत्या 27 ऑगस्टला आचार्य अत्रे रंगमंदिर,पुणे येथे मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम पार पडणार आहे.

श्री‌ संजय पाताडे यांना मानाचा ‘ सिंधुदुर्ग जिल्हा भूषण पुरस्कार जाहीर झाल्याने त्यांचे विविध स्तरांतून अभिनंदन होत आहे.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा