You are currently viewing बांदा केंद्रशाळेच्या विद्यार्थ्यांनी भित्तीपत्रकातून‌ साकारला चांद्रविजय

बांदा केंद्रशाळेच्या विद्यार्थ्यांनी भित्तीपत्रकातून‌ साकारला चांद्रविजय

*बांदा केंद्रशाळेच्या विद्यार्थ्यांनी भित्तीपत्रकातून‌ साकारला चांद्रविजय*

*बांदा*

चंद्रावर स्वारी करून‌ ऐतिहासिक महाविक्रमाला गवसणी घातलेल्या चांद्रयान ३ या मोहीमेचे बांदा न.१ केंद्रशाळेतील विद्यार्थ्यांनी कोलाजकामातून भित्तीपत्रक साकारले.
बुधवारी ३ लाख ८४ हजार किलोमीटरचे अंतर कापून चंद्रापर्यंत पोहोचलेल्या चांद्रयानने चंद्रावर तिरंगा फडकवला असून चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा भारत हा पहिला देश ठरला आहे . विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या जोरावर अंतराळाचा वेध घेण्यासाठी सज्ज झालेल्या भारतीयांसाठी ही अभिमानास्पद बाब ठरली आहे. या अविस्मरणीय कार्याचे वृत्तपत्रीय बातम्यापासून‌ बांदा केंद्रशाळेच्या विद्यार्थ्यांनी कोलाजकामातून‌ भित्तीपत्रक साकारले आहे. या भित्तीपत्रकात चांद्रयान मोहिमेचे वैशिष्ट्ये,,भारताचा अवकाश संशोधन इतिहास, चांद्रयानचा ४०दिवसांचा प्रवास, चांद्रयान ३चे यशाचे शिल्पकार आदि महत्त्वपूर्ण घडामोडींचा समावेश या भित्तीपत्रकात आहे . उपशिक्षक जे.डी.पाटील यांच्या संकल्पनेतून साकारलेले भित्तीपत्रक बनविण्यासाठी विद्यार्थ्यांना सर्व शिक्षकांचे मार्गदर्शन मिळाले..या भित्तीपत्रकाचे मुख्याध्यापिका उर्मिला मोर्ये, केंद्रप्रमुख संदीप गवस , विस्तार अधिकारी दुर्वा साळगावकर यांनी अभिनंदन केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा